13 मार्च राशिफळ : शनि अमावस्येला या 4 राशीवाल्यांनी रहावे सावध, इतरांसाठी असा आहे शनिवार

मेष
आजचा दिवस थोडा त्रासदायक आहे. वाहनाशी संबंधित समस्या समोर येऊ शकतात. परंतु मुलाच्या भविष्यासंबंधी एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवन सुखी होईल. जोडीदाराची भरपूर साथ मिळेल. कुटुंबात अशांततेचे वातावरण असू शकते. परंतु तरीही मन शांत ठेवावे लागेल. विद्यार्थ्यांना भविष्याबद्दल चिंता वाटू शकते.

वृषभ
तुमच्या वैयक्तिक आयुष्यात एखादा वाद सुरू असेल तर तर तो आज संपेल. जर एखादा संपत्तीचा सुरू असेल तर तो आज पूर्ण होऊ शकतो, ज्यामध्ये मित्रांचे सहकार्य मिळू शकते. आर्थिक स्थितीही मजबूत होईल. जर मनात एखादी इच्छा असेल तर ती आज पूर्ण होईल. सायंकाळ एखाद्या सामाजिक कार्यक्रमात घालवाल.

मिथुन
आजचा दिवस उत्तम लाभदायक आहे. काही जुन्या मित्रांची भेटू होऊ शकते, जी फायदेशीर होऊ शकते. छोट्या सदस्यांना किंवा मुलांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, म्हणून खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या, अन्यथा अपचनाचा त्रास होऊ शकतो. गुंतागुंत संपेल. आज मधूर वाणीच्या प्रभावाने सर्व काही मिळवू शकता.

कर्क
आज व्यवसायासाठी एखाद्या जाणकार व्यक्ती भेटू शकता, आणि त्याच्या अनुभवातून काही तरी शिकाल. काही आर्थिक आणि कौटुंबिक संकोच जाणवेल. परिवर्तनाची इच्छा बाळगाल. अत्यधिक उत्साह आणि तातडीने केलेली कामे बिघडू शकतात, म्हणून काळजी घ्या. सायंकाळी धार्मिक कार्याविषयीची रुची वाढेल, ज्यामध्ये पुण्यकार्यासाठी पैसे खर्च होऊ शकतात.

सिंह
आज पैशांच्या व्यवहाराबाबत सावधगिरी बाळगावी लागेल. कारण एखाद्याशी मतभेदामुळे व्यवहारात बदल करावा लागेल, यामुळे अडचणी येऊ शकतात. तुम्ही केलेल्या कामांना आज विरोध होऊ शकतो. कुटूंबाच्या समस्यांविषयी उत्साहात चुकीचा निर्णय घेतला तर तो अडचणी निर्माण करू शकते. जोडीदारा तुमच्या सोबत उभा असेल. विद्यार्थ्यांना चांगले निकाल मिळतील.

कन्या
आजचा दिवस धावपळीचा आहे. धावपळ आणि कठिण मेहनतीनंतर सुद्धा लाभापासून वंचित राहावे लागेल. कामानिमित्त काही अंतराचा प्रवास करावा लागू शकतो. मानसिक समस्यांमुळे ताण राहील. काही जुन्या अपूर्ण कामांना सामोरे जावे लागेल. प्रियजनाची भेट होईल. आज सायंकाळी कुटुंबातील लहान मुलांबरोबर थोडा वेळ घालवाल ज्यामुळे मानसिक ताण कमी होईल.

तुळ
नोकरी व व्यवसाय करणार्‍यांसाठी दिवस चांगला आहे. विविध क्षेत्रात पत वाढेल, ज्यामुळे बरेच अनुभव येतील. आज सर्व कामे वेळेवर होतील, यामुळे मनामध्ये आनंदाची भावना असेल. आज रोजगाराशी संबंधित जातकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. एखाद्याला पैसे देण्याचा विचार करीत असाल तर तसे अजिबात करू नका कारण ते परत मिळण्याची शक्यता कमी आहे.

वृश्चिक
आज घरात एखादा मंगल कार्यक्रम होऊ शकतो, ज्यामध्ये पाहुण्यांचे आगमन होईल. चांगल्या भोजनामुळे प्रकृती चांगली राहील. आज शुभवार्ता येत-जात राहतील, म्हणून तीच कामे करा जी होण्याची आशा आहे. मित्र आणि कुटुंबामुळे घरात तणावाची परिस्थिती उद्भवू शकते. आज आईसाठी एखादी भेटवस्तू खरेदी करू शकता.

धनु
आज धार्मिक कार्यात रुची वाढेल, ज्यामुळे एखाद्या महान व्यक्तीच्या दर्शनाचा लाभ होईल. धावपळी जास्त होईल, ज्यामुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो. वेळेनुसार वाटचाल केल्यास प्रगती होईल, ज्यामुळे कार्यक्षेत्रातही प्रगती कराल. आर्थिक स्थिती मजबूत कराल. संतती भविष्यासाठी एखादा सल्ला मागू शकते. मामाच्या बाजूकडून धनलाभाचा योग आहे.

मकर
मानसिक गोंधळामुळे डोकेदुखी होण्याची शक्यता आहे. किंवा संततीची चिंता असू शकते. शेजार्‍यांमुळे त्रास होऊ शकतो, म्हणून सावधगिरी बाळगा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. दाम्पत्य सुखात वाढ होईल. व्यवसायाला नवीन गती मिळेल. जोडीदाराचा सल्ला कौटुंबिक व्यवसायासाठी प्रभावी ठरेल. आज सायंकाळी जोडीदारासह फिरायला जाऊ शकता.

कुंभ
आज शुभ परिणाम मिळतील. विनाकारण शंका आणि तर्क-वितर्कामुळे पैसा आणि वेळ दोन्हीची हानी होईल, ज्यामुळे थोडी चिंता असेल. लाभाच्या संधीही मिळतील. आज सायंकाळी एखाद्या प्रभावशाली व्यक्तीस भेटू शकता. आज व्यवसायात पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. वाहन चालवताना खबरदारी घ्या.

मीन
आज विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करण्याची आवश्यकता आहे, तरच यशस्वी होण्याची आशा आहे. व्यापाराचा भार वाढेल. बांधकामांच्या कामाची गरज भासेल. पक्ष आणि विरोधी पक्ष दोन्हीचे सहकार्य मिळेल. एखादी महत्वाकांक्षी योजना आजपासून सुरू होईल, जी भविष्य बळकट करेल. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि बाहेर खाणे-पिणे टाळा.