13 नोव्हेंबर राशीफळ : 7 राशींसाठी ‘धनत्रयोदशी’चा दिवस शुभ, ‘असा’ असेल शुक्रवार

पोलीसनामा ऑनलाइन

मेष
आजचा दिवस आनंद देईल. वाढत्या खर्चापासून मुक्ती मिळेल. उत्पन्न वाढेल, ज्यामुळे आनंदी व्हाल. वैवाहिक जीवनात आनंदी क्षण येतील. आई-वडिलांचा पाठिंबा मिळेल, व्यवसायालाही वेग मिळेल. लव्ह लाइफमध्ये अडचणींचा सामना करावा लागेल. कामामुळे प्रिय व्यक्तीला भेटू शकणार नाही. उत्पन्न वाढल्यामुळे मन प्रसन्न होईल. कार्यक्षेत्रात अधिक मेहनत करण्याची आवश्यकता असेल. कौटुंबिक वातावरण सहाय्यक असेल. घरात आनंद होईल.

वृषभ
मानसिक ताण सोडल्यास आजचा दिवस खूप चांगला आहे. उत्सवासाठी भरपूर खरेदी कराल. ज्यामुळे काही खर्च वाढेल. उत्पन्नात घट दिसून येईल, ज्यामुळे खूप दबाव जाणवेल. आरोग्याच्या बाबतीत ठीक राहाल. आरोग्यात सुधारणा होईल. दूरचा प्रवास चांगला असेल. वैवाहिक जीवनात तणावामुळे मन प्रसन्न राहणार नाही. कौटुंबिक जीवनात समाधानी असाल. संततीकडून चांगली बातमी मिळेल. दिवस उच्च शिक्षणासाठी अनुकूल ठरणार आहे. प्रेमसंबंधात आनंदाची भावना असेल. कार्यक्षेत्रात कोणावरही अवलंबून राहणे टाळले पाहिजे. यामुळे नुकसान होऊ शकते.

मिथुन
आजचा दिवस एखादी नवीन आशा घेऊन येईल. प्रिय व्यक्तीसोबत चांगल्या क्षणांचा आनंद घ्याल. त्यांच्याबरोबर दिवस घालवण्याचा प्रयत्न कराल, कारण तुम्हाला उर्जा मिळेल. जीवन जगण्याचा नवीन दृष्टीकोन मिळेल. दिवस आनंदात व्यतीत होईल. परंतु खर्च होईल. वैवाहिक जीवनात वेळ व्यतीत होईल. कामात चांगल्या कार्यक्षमतेचा फायदा होईल. बॉस आनंदी होईल.

कर्क
आजचा दिवस अनुकूल आहे. कुटूंबाकडून प्रेम मिळेल. याचा परिणाम कामा होईल. मात पूर्ण उत्साहाने उतराल. चांगले परिणाम मिळतील. विरोधकांना मागे टाकाल. आनंद उपभोगण्याच्या इच्छेसाठी अधिक खर्च कराल. प्रवासासाठी दिवस अनुकूल नाही. आरोग्य चांगले राहील. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला असेल. जोडीदार एखाद्या गोष्टीवर चर्चा करेल. ज्यामुळे काही समस्या उद्भवू शकतात, परंतु त्यांचे ऐकणे आणि समजून घेणे वैवाहिक जीवन आनंदी करेल.

सिंह
आज खूप व्यस्त असाल. कुटुंबातील तरुण सदस्य खूप आनंदी दिसतील. त्यांच्याशी आपले नाते सुधारेल. डिलांना एखादा चांगला फायदा मिळू शकतो. कौटुंबिक सदस्यांकडूनही सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनासाठी दिवस अनुकूल आहे. प्रेम वाढेल. लव्ह लाइफसाठी दिवस थोडा कमजोर आहे. नोकरीसाठी दिवस अनुकूल असेल. कामाचे कौतुक होईल.

कन्या
आज धनलाभ झाल्याने दिवस चांगला जाईल. पैसे बँकेत जमा करण्यातही यश मिळेल. बोलण्यातून लोकांचे मन जिंकाल. चांगले भोजन मिळेल आणि घरातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल. पण काहीजण तुमच्यावर रागावू शकतात. वैवाहिक जीवन सामान्य असेल. प्रेम संबंधात प्रिय व्यक्तीची ओळख आपल्या कुटूंबाशी करुन देऊ शकता. बँकेकडून कर्ज घेण्यासाठी यश मिळेल. नोकरीत अनेक प्रयत्नांनंतर काम पूर्ण करण्यात यश येईल.

तुळ
आज आव्हाने कमी होतील. खर्चही कमी होईल. आर्थिक ताकदीची जाणीव होईल. कामात चांगले परिणाम मिळतील. कामामुळे मजबूत उभे राहाल. कुटुंबातील सदस्यांचा विश्वास निर्माण होईल, परंतु काहीजण विरोधही करतील. इतरांच्या कामात हस्तक्षेप करणे टाळावे लागेल. अन्यथा परिस्थिती बिघडू शकते. लव्ह लाईफसाठी अनुकूल दिवस आहे. प्रेमाचे क्षण घालविण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात तणाव वाढेल. जोडीदाराशी एखादी चर्चा पूर्ण न केल्याने ते राग दर्शवू शकतात.

वृश्चिक
दिवसाची सुरुवात चांगली राहील. उत्पन्न वाढेल. खर्च नियंत्रणात राहील, परंतु दुपारनंतर स्थिती उलट होईल आणि खर्च वाढेल. सर्दी-खोकला देखील होऊ शकतो. परदेशात जाण्याची चांगली बातमी मिळेल. ज्यामुळे आनंद वाढेल. शिक्षणामध्ये चांगले परिणाम मिळतील. खर्च असूनही मन प्रसन्न होईल. कौटुंबिक जीवन खूप आनंददायक असेल. कामातही प्रचंड यश मिळेल, कारण सोबतच्या लोकांसोबत तुमचा समजूतदारपणा असेल. वैवाहिक जीवनात तणाव असू शकतो. लव्ह लाइफमध्ये प्रिय व्यक्तीसाठी भेटवस्तू आणू शकता.

धनु
धनतेरसचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. उत्पन्न वाढेल, यामुळे काहीतरी चांगले विकत घेण्याची संधी मिळेल. आरोग्य थोडे कमजोर होईल, कारण एकापेक्षा जास्त गोष्टी तुमचे लक्ष वेधून घेतील, ज्यामुळे निर्णयापर्यंत पोहोचण्यास असमर्थ वाटेल. कुटुंबातील सदस्य सोबत राहतील आणि आधार देतील. विशेषत: लहानांकडून पाठबळ मिळेल, ज्यामुळे बळकटी मिळेल. कामासाठी दिवस अनुकूल आहे. चांगले परिणाम मिळतील. भाग्य साथ देईल, ज्यामुळे उत्पन्न वाढेल. लव्ह लाईफसाठी दिवस चांगला आहे. खास मित्राला प्रपोज करू शकता. वैवाहिक जीवनात तणावातून मुक्त व्हाल. जोडीदाराबरोबर खरेदी करण्यासाठी जाल.

मकर
आजचा दिवस सामान्य आहे. कामात चांगले परिणाम मिळतील. कामावर अधिक लक्ष केंद्रित कराल. ज्यामुळे कामगिरीत सुधारणा होईल. बॉसशी संबंध मधून असतील, ज्यामुळे चांगले फायदे मिळतील. सरकारी क्षेत्राकडून नफा होईल. इगोपासून दूर राहणे चांगले. खर्च खूप जास्त होईल. कौटुंबिक जीवन चांगले राहील. वैवाहिक जीवनातही आनंद मिळेल. जोडीदार कामात मदत करेल. प्रेमसंबंधासाठी दिवस अनुकूल नसेल, प्रिय व्यक्त्ी भांडू शकते, काळजी घ्या.

कुंभ
मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत व्हाल. आव्हाने कमी होतील. कामांमध्ये यश मिळेल. भाग्य साथ देईल. मेहनत यशस्वी होईल. प्रवासाला जाण्याचा योग आहे. उत्पन्नामध्ये वाढ होईल, ज्यामुळे आध्यात्मिक शक्ती वाढेल. शारीरिकदृष्ट्या सक्षम राहाल. प्रेमसंबधात दिवस चांगला जाईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराबरोबर दिवसाचा आनंद घ्याल. कौटुंबिक जीवन खूप चढउतारांनी भरलेले असेल.

मीन
दिवसाची सुरुवात खूप चांगली होईल आणि प्रत्येक कामात यश मिळवाल. परंतु दुपारनंतर स्थिती बदलण्यास सुरवात होईल. दुपारपर्यंत महत्वाची कामे मार्गी लावा. आरोग्य कमजोर होऊ शकते. सर्दी टाळण्याचा प्रयत्न करा. क्षेत्रातील स्थिती अनुकूल असेल, परंतु एखाद्या वरिष्ठामुळे काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक जीवन चांगले राहील. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडे काहीतरी चांगले खाण्यासाठी मागणी करू शकतात. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीसोबत खरेदी करायला जाऊ शकता.