14 मे राशीफळ : अक्षय तृतीयाच्या दिवशी मेष, वृश्चिक आणि मकर राशीवाल्यांना होईल धनलाभ, इतरांसाठी असा आहे शुक्रवार

0
31
horoscope today 14 May 2021 dainik rashifal daily horoscope aaj che rashifal astrology today in marathi
file photo

मेष
उत्तम फलदायक दिवस आहे. सर्व कामे सहजपणे मार्गी लागतील, प्रसन्नता वाटेल. घरातील गरजा सहज पूर्ण कराल. स्वतासाठी सुद्धा काही खरेदी कराल. खर्च करताना खिशाचा विचार करा. रखडलेले पैसे येतील. मोठ्या प्रमाणात पैसा हातात आल्याने आनंद होईल. मित्राच्या मदतीने काम पुढे जाईल.

वृषभ
आज विशेष प्रकारे सावध रहा. शत्रु त्रास देण्याचा प्रयत्न करतील. यासाठी नोकरी आणि व्यवसायात डोळे, कान दोन्ही खुले ठेवा, अन्यथा नुकसान होईल. सायंकाळी मंगलकार्यात सहभागी व्हाल. राजकीय क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. आई किंवा मित्राशी वैचारिक मतभेद होतील.

मिथुन
दिवस उत्तम फलदायक आहे. महत्वाच्या योजना सुरू करू शकता, भविष्यात यश मिळेल, रखडलेली कामे मार्गी लावू शकता. जमीन, मालमत्तेत गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम आहे, व्यापारात डील फायनल करताना विचार करा, अन्यथा भविष्यात अडचणी येऊ शकतात.

कर्क
महत्वाचे निर्णय आज घेऊ शकता, व्यापार, कुटुंब किंवा विवाहासंबंधी असू शकतात. नोकरीची संधी मिळू शकते. नोकरीत इतर ठिकाणाहून ऑफर मिळू शकते. विचारपूर्वक पुढे जा. रोजच्या गरजांसाठी पैसे खर्च कराल. जोडीदाराला घेऊन बाहेर फिरायला जाऊ शकता.

सिंह
संमिश्र दिवस आहे. संबंध प्रेम आणि सहकार्याने पूर्ण होतील. आरोग्य चांगले असल्याने कामांमध्ये यशस्वी भाग घ्याल, समाजासाठी काम कराल. घरातील एखाद्या सदस्यासाठी रात्री सरप्राईज प्लॅन कराल. ज्यामुळे आनंदी रहाल, छोटी मुले सुद्धा आनंदी असतील. खुप दिवसांपासूनचा तणाव दूर होईल.

कन्या
यश देणारा दिवस आहे. सहकार्‍यांच्या मदतीने एखादा प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकतो. सहकार्‍यांना खुश करण्याचा पूर्ण प्रयत्न कराल. महान व्यक्तीच्या हस्तक्षेपाने घरातील वाद संपेल. निर्णय घ्यायाचा असेल तर मन आणि डोक्याचा वापर करा, तरच लाभ होईल.

तुळ
अनुकूल परिणाम मिळतील. भागीदारीच्या व्यापारात लाभ मिळेल. सायंकाळी घरात पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. वडीलांच्या आरोग्याबाबत सतर्क रहा, बाहेरचे खाणे टाळा. सासरच्या बाजूकडील व्यक्तीला उधार देणे टाळा, अन्यथा परत मिळणार नाही, संबंध बिघडतील. नव्या उर्जेसह पुढे जाल. रखडलेली कामे पूर्ण कराल.

वृश्चिक
ठोस परिणामांचा दिवस आहे. काही कारणामुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असू शकता पण तरीही काम धाडसाने कराल, त्यामध्ये उत्तम यश मिळेल. कार्यक्षेत्र आणि कुटुंबात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, परंतु अस्वस्थ होऊ नका. सायंकाळपर्यंत सर्व संपेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग खुला होईल. संततीच्या भविष्यासाठी थोडी धावपळ करावी लागेल. सासरच्या बाजूकडून धनलाभ होऊ शकतो. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात.

धनु
आरोग्याच्या बाबतीत सतर्क रहा, भविष्यात त्रास होऊ शकतो. काही त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. सध्यस्थिती पहाता भविष्यासाठी बचत करण्याचा विचार करावा लागेल. दुसर्‍यांच्या कामासाठी जास्त उर्जा वाया घालवू नका. कारण यामुळे लोक एका पाठोपाठ एक कामे देत राहतील. यामुळे तुमची कामे अर्धवट राहतील.

मकर
दिवस काहीसा खास आहे. मोठे बदल समोर येऊ शकतात आणि एखाद्या कठिण प्रसंगातून सुद्धा जाऊ शकता. एखादी अशी बातमी ऐकायला मिळेल, जिच्याबद्दल कधी विचार केला नव्हता. परदेशी व्यापारात शुभवार्ता समजेल. संततीचे चांगले काम पाहून आनंद होईल. अडकलेले पैसे परत मिळतील.

कुंभ
दिवस उत्तम फलदायक आहे. मनाचे ऐकून काम कराल. यश मिळेल. व्यापरात निर्णय घेण्यात सक्षम असाल. भागीदाराची व्यापारात पार्टनरवर लक्ष ठेवा. गडबड करू शकतो. जीवनात काही कटू अनुभव घेतले पाहिजेत आणि ते मागे टाकून पुढे गेले पाहिजे. ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत करता येईल.

मीन
ठोस परिणाम देणारा दिवस आहे. कुटुंबातील लोकांशी वाद होऊ शकतो. यासाठी शांत रहा किंवा तिथून निघून जा. व्यापारात जी आशा होती ती पूर्ण न झाल्याने अस्वस्थ होऊ शकता. कार्यक्षेत्रात वाणी आणि वागण्यात संयम ठेवा, तरच सहकार्‍यांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांना सिनियर्सची मदत लागेल. सायंकाळी कुटुंबातील सदस्यांशी चर्चा कराल.