15 मार्च राशीफळ : ‘या’ राशींना होणार ‘फायदा’, ‘मान-सन्माना’सह होणार ‘धनलाभ’

मेष
आजचा दिवस थोडा कमजोर आहे. मानसिक तणाव वाढेल. कामात अडथळे येतील. तरीसुद्धा तुम्ही काम योग्यपद्धतीने पूर्ण कराल आणि भरपूर मेहनत कराल, ज्यामुळे चांगले परिणाम दिसून येतील. कुटुंबाचे वातावरण चांगले राहिल. मात्र एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. प्रेमसंबंधात आजच्या दिवशी मनातील गोष्टी समोर मांडा. वैवाहिक जीवनात आज आनंदाचे क्षण लाभतील.

वृषभ
आजचा दिवस खुप चांगला आहे. व्यापारात नफा होईल. आरोग्य कमजोर राहिल, आजारी पडू शकता. सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ शकतो. नोकरीत तुमच्या योजना उपयोगी पडतील आणि सहकार्‍यांनाही मदत कराल. वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. जोडीदाराच्या विचार लक्षपूर्वक ऐकाल. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे.

मिथुन
तुमच्यासाठी दिवस चढ-उताराचा आहे. नोकरीत चांगले परिणाम मिळतील आणि तुमचे प्रतिष्ठा वाढेल. खर्च वाढल्याने चिंता वाढतील. मानसिक तणाव राहिल, आरोग्य कमजोर राहू शकते. वैवाहिक जीवनात तणाव वाढेल आणि जोडीदाराचे म्हणणे ऐकुन न घेतल्याने नात्यात दुरावा येईल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. कामात यश मिळेल. संततीकडून लाभ होईल.

कर्क
तुमच्यासाठी आजचा दिवस खुपच चांगला आहे. नोकरीत चांगले काम करण्यात यशस्वी व्हाल. तुमचे पूर्ण लक्ष संततीकडे असेल. तुमच्या मनात एक प्रेमाची भावना कायम राहिल. एखादे मनासारखे काम झाल्याने समाधान लाभेल आणि धनलाभ सुद्धा होईल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. व्यापारात चांगले परिणाम मिळतील आणि दाम्पत्य जीवनात जोडीदाराशी संबंध सामान्य राहतील.

सिंह
तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कामाकडे पूर्ण लक्ष द्याल, ज्यामुळे कामात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कुटुंबाकडे पूर्ण लक्ष द्याल. कुटुंबातील व्यक्तींचे प्रेम तुम्हाला लाभेल. तुमच्या आशा, इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे. नोकरीत काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विवाहितांना दिवस आनंदाचा आहे.

कन्या
तुमच्यासाठी दिवस सामान्य आहे. उत्पन्न वाढण्यासाठी आज खुप प्रयत्न कराल. यासाठी एखादा प्रवासदेखील कराल. हा प्रवास पुढे जाण्याचा मार्ग दाखवेल. कामात बुद्धीच्या बळावर कमी वेळात अधिक काम केल्याने प्रशंसा होईल. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे. प्रिय व्यक्तीशी असे काहीही बोलू नका, ज्यामुळे ती नाराज होईल. वैवाहिक जीवनात चढ-उतार राहिल. यासाठी जोडीदाराशी भांडण टाळा. त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐका. कुटुंबातील वातावरण त्रासदायक ठरू शकते.

तुळ
आजचा दिवस ठिक आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहिल. जोडीदाराचे प्रेम मिळेल. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील. आपले एकमेकांसमोर मांडल्याने यश मिळेल. ज्यामुळे एकमेकांना समजून घेता येईल. कामात केलेले प्रयत्न चांगला फायदा देतील. कुटुंबातील छोट्यांकडून काही अडचणी येऊ शकतात आणि त्यांचे आरोग्य बिघडू शकते.

वृश्चिक
तुमच्यासाठी आजचा दिवस सामान्य आहे. एखाद्या गोष्टीवरून चिंतेत राहाल. यामुळे प्रकृतीवर परिणाम होईल. वैवाहिक जीवनातही काही अडचणी येऊ शकतात. प्रेमसंबंधात सुद्धा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आपल्या प्रिय व्यक्तीच्या वागण्यात झालेल्या बदलाने संयम ठेवावा लागेल. कामात एखादा नवा प्रस्ताव मिळू शकतो. कुटुंंबाचे वातावरण चांगले राहिल, यामुळे बरे वाटेल.

धनु
तुमच्यासाठी आजचा दिवस कमजोर आहे. यासाठी लक्ष द्या. मानसिकदृष्ट्या तणावाला तोंड द्यावे लागेल. खर्च अचानक वाढेल, ज्याचा भार खिशावर पडेल. कामात चांगले परिणाम मिळतील आणि प्रयत्नांचा फायदा मिळेल. व्यापारात लाभाचे योग आहेत. दाम्पत्य जीवनासाठी दिवस कमजोर आहे. कोणत्याही परिस्थितीत वातावरण बिघडू देऊ नका. प्रेमसंबंधात दिवस चांगला आहे. तुम्हाला प्रेमाची अनुभूती होईल.

मकर
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. तुमच्या काही इच्छा पूर्ण होतील. खर्चात वाढ होईल. कामात व्यस्तदेखील रहाल. चिंता देखील सतावतील. विरोधकांना घाबरण्याचे कारण नाही. तुमचे आरोग्य चांगले राहिल आणि कुटुंबाचे वातावरणही आनंद देईल. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील आणि तुमची प्रिय व्यक्ती तुम्हाला भेट देऊ शकते. दाम्पत्य जीवनासाठी दिवस चांगला आहे. जोडीदार आनंद देईल. कामात मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील.

कुंभ
आजचा दिवस खुप चांगला आहे. कामात चांगले परिणाम मिळतील. कुटुंबाचे वातावरण चांगले राहिल. कुटुंबाकडे जास्त लक्ष द्याल. घरखर्च वाढेल. उत्पन्नात वाढ होईल. संपत्तीचा लाभ होऊ शकतो. प्रेमसंबंधात दिवस कमजोर आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येतील. तुमचे आरोग्य बिघडू शकते, कमजोरी जाणवू शकते, यासाठी काळजी घ्यावी लागेल.

मीन
आजचा दिवस भाग्य वाढवणारा आहे. भाग्य उजळल्याने उत्पन्नात वाढ होईल. कामात तुमची पकड मजबूत होईल. कुटुंबाचे वातावरण चिंता देऊ शकते. परंतु घाबरण्याची गरज नाही. वैवाहिक जीवनासाठी दिवस सामान्य आहे. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे. स्वभावातील बदलांकडे लक्ष द्या आणि जास्त रागावण्याची सवय कमी करा.