15 मार्च राशिफळ : या 2 राशीवाल्यांनी रहावे सावध! मिळतील त्रासदायक परिणाम, इतरांसाठी असा आहे सोमवार

मेष
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. व्यवसायात धैर्याने आणि समर्पणाने काम करावे लागेल, तरच कामे होतील. आत्मबळ आणि विश्वास पाहून विरोधक निस्तेज होतील. संतती संबंधित एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे उत्साह वाढेल. धर्माच्या कार्यातही सहभागी होऊ शकता. एखादे नवीन काम सुरू करायचे असल्यास त्यासाठी वेळ चांगली आहे.

वृषभ
आजचा दिवस उत्तम आहे. जुन्या मित्राची भेट होईल, जी फायदेशीर ठरेल. कौटुंबिक बाबींबद्दल काळजी वाटू शकते. कौटुंबिक जीवन थोडे तणावपूर्ण असेल. आर्थिक स्थिती देखील चिंतेचे कारण असू शकते. चुकीच्या मार्गाने पैसे कमविणे टाळा. समजूतदारपणे वागावे लागेल, अन्यथा व्यवसायातील कुणाशीही वादविवाद होऊ शकतो.

मिथुन
आजचा दिवस कौटुंबिक जीवनासाठी त्रासदायक ठरेल. कुटुंबात काही समस्या उद्भवू शकतात, परंतु विचारपूर्वक निर्णय घ्या, अन्यथा नंतर अडचणीचा सामना करावा लागू शकतो. मान-सन्मान वाढेल. पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. व्यवसाय आणि व्यवसायातील कामास विरोध होऊ शकतो, परंतु त्रस्त होऊ नका. उच्च अधिकार्‍यांच्या कृपेने कामात यश मिळेल.

कर्क
आजचा दिवस सूख आणि दु:ख दोन्ही घेऊन येईल. परंतु, तुम्हाला त्रस्त होण्याची गरज नाही. एखाद्याच्या सल्ल्याने आणि समजून घेऊन अपूर्ण कामे पूर्ण करू शकता. नोकरी आणि व्यवसायात ज्या क्षेत्रात प्रयत्न करीत आहात ते यशस्वी होतील. अनेक लोक मानसिकदृष्ट्या त्रस्त दिसून येतील. प्रेमसंबंध मजबूत होतील. मुले आज अपेक्षा पूर्ण करतील. संध्याकाळी मित्रांसह जवळपासचा प्रवास करू शकता.

सिंह
आजचा दिवस व्यवस्थांमध्ये अनुभवाचा आणि वाढीचा आहे. व्यवसायात ओळख वाढेल आणि एखादा नवीन करार फायनल कराल, ज्यामुळे आर्थिक स्थिती बळकट होईल. अनेक दिवसांपासून जी कामे अपूर्ण आहेत, आज ती पूर्ण करण्याची वेळ आली आहे. आर्थिक बाबतीत दिवस खर्चाचा आहे. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असल्यास, त्यासाठी दिवस चांगला आहे. भाग्याची भरपूर साथ मिळेल. जोडीदारासोबत वाद होऊ शकतो.

कन्या
आज एखाद्या मंगलकार्यात सहभागी होऊ शकता, ज्यामुळे दिवस परिपूर्ण होईल आणि मनात शांतीची भावना असेल. कौटुंबिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य आणि ताळमेळ राहील. संततीच्या भविष्याबद्दल थोडे चिंताग्रस्त असू शकता. नोकरी आणि व्यवसायात बुद्धिमत्तेसह केलेल्या कामात यश मिळेल. वडिलांच्या सल्ल्याची आवश्यकता भासेल. आज शेजार्‍यांशी वादात पडू नका.

तुळ
आज कार्यक्षेत्रात सन्मान आणि प्रभावाने काहीतरी प्राप्त करू शकता. अनके दिवसांपासून रखडलेली प्रकरणे आज मार्गी लागतील. डोळे आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे महत्त्वपूर्ण कामे रखडू शकतात. परंतु बोलण्यात वेळ घालवू नका. वेळेवर काम केल्यास चांगल्या संधी मिळतील. जोडीदारासाठी एखादी भेटवस्तू आणू शकता.

वृश्चिक
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आर्थिक प्रगतीसाठी काही लोक गुंतवणुकीच्या नवीन योजना बनवू शकतात, ज्या भविष्यात मोठे फायदे देतील. संततीच्या शिक्षणाबद्दल थोडे चिंतेत दिसाल, पण सरस्वती देवीची पूजा शूभ ठरेल. शेजार्‍यांशी कोणत्याही मुद्द्यावरून वाद घालणे टाळा. नातेवाईकांमध्ये ताळमेळ राहील. जोडीदाराकडून आवश्यक सहकार्य मिळेल. काही कठीण कामेसुद्धा मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळेल.

धनु
आज कामाच्या ठिकाणी वातावरण सुखद असेल. अधिकार्‍यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही बनवलेल्या धोरणावर लोकांना काम करताना मनात आनंदाची भावना निर्माण होईल. संततीसाठी भेटवस्तू खरेदी करू शकता. कुटुंबात एखाद्या मंगल कार्याबद्दल चर्चा होऊ शकते. काही बाबतीत वडिलांच्या सल्ल्याची आवश्यकता भासेल. व्यापारात रोखीची कमतरता भासू शकते.

मकर
आजचा दिवस धावपळीचा आहे. व्यस्तता असूनही प्रेमासाठी वेळ काढाल. ज्यामुळे जोडीदार आनंदी होईल. समर्पण, धैर्य आणि मेहनत घेऊन लक्ष्य साध्य करू शकता. ज्यांच्या कुटुंबात काही काळापासून समस्या सुरू आहे, त्या आज संपतील. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करण्याची आवश्यकता आहे. सामाजिक आणि राजकीय कार्यात रस वाढेल.

कुंभ
आज व्यवसायाच्या कामांवर पूर्ण लक्ष केंद्रित करावे लागेल, तरच कामे होतील. तर्क-वितर्कामुळे त्रास होईल, त्यामुळे त्याच्यात अडकू नका. पिता आणि पितृबाजूकडून सहकार्य मिळेल. योजना आखून काम केले तर भरपूर यश मिळेल. आर्थिक दृष्टीने दिवस अनुकूल आहे. कुटुंबात मित्र आणि नातेवाईकांचे आगमन होऊ शकते, कुटुंबातील सर्व सदस्य व्यस्त दिसतील.

मीन
आज आरोग्यात थोडी घसरण होऊ शकते, म्हणून खाण्यापिण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, अन्यथा अपचन आणि वायु विकारासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आज विद्यार्थ्यांमध्ये उत्साह असेल. कौटुंबिक जीवनात परस्पर ताळमेळ राहील, परंतु कामाची जबाबदारी जास्त असेल. एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असल्यास, आजचा दिवस उत्तम आहे.