15 ऑक्टोबर राशिभविष्य : ‘या’ 5 राशीच्या जातकांचा नोकरी आणि व्यवसायात होणार ‘फायदा’, असा असेल गुरुवार

 

मेष
आज खूपच चांगल्या मूडमध्ये असाल. गुंतवणूकीपासून दूर रहाणे फायद्याचे ठरेल, अन्यथा पैशाची हानी होऊ शकते. पैशाच्या बाबतीत कुटुंबाकडे दुर्लक्ष करणे हानिकारक ठरूशकते. कामात स्थिती चांगली राहील आणि भाग्याची साथ मिळेल. समाजात एखादे काम करण्यात यश मिळेल, ज्यामुळे तुमचे नाव होईल. वैयक्तिक जीवनात समाधानी दिसाल.

वृषभ
संततीविषयी एखादी समस्या असू शकते. भांडण होऊ शकेल, जे त्रासदायक ठरूशकते. घरातील स्थिती खूप चांगली असेल. आज लक्ष केंद्रित कराल आणि घरगुती वापरासाठी वस्तू खरेदी कराल. उत्पन्नाबाबत स्थिती चांगली असेल, म्हणून आर्थिक स्थितीसाठी काळ चांगला असेल. धार्मिक कार्यात सामील होऊ इच्छिता. कामाची स्थिती चांगली राहील.

मिथुन
आई आणि वडिलांची एखादी गोष्ट लक्ष आकर्षित करेल. आज त्यांचे आरोग्य बिघडू शकते म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कामाबद्दल आत्मविश्वास असेल. मेहनत यशस्वी होईल आणि कामाबद्दल कौतुक होईल. माणसे आज अशी स्तुती करतील, ज्याची कधीच अपेक्षा नव्हती. घरगुती जीवन आनंदी, शांतीपूर्ण असेल. वैयक्ति आयुष्यात आनंदाची बातमी मिळेल.

कर्क
भावनिक होऊन निर्णय घेणे हानिकारक ठरू शकते. कोणतीही मोठी कामे काळजीपूर्वक करा. गुंतवणूकीच्या दृष्टीकोनातून दिनमान खूप सामान्य आहे, म्हणून आज काहीही नवीन गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करु नका. आज उत्पन्न वाढवण्याची संधी असू शकते, संधी जाऊ देऊ नका. काम यशस्वी व्हाल. बदलीचा योग आहे.

सिंह
मनात प्रेम वाढेल. काम कमीतकमी वेळात पूर्ण कराल. काही महत्त्वपूर्ण जुनी कामे पूर्ण कराल. घरात कोणत्याही सरकारी कामांबद्दल चर्चा होईल आणि आज घरात मन रमणार नाही. प्रेमसंबंधात दिवस शांती देईल आणि प्रिय व्यक्ती मनापासून अगदी जवळ येईल. आरोग्याची काळजी घ्या, कारण ही वेळ एखाद्या आजाराचे संकेत देत आहे. सावधगिरी हेच एकमेव संरक्षण आहे.

कन्या
कुटुंबातील एखाद्या धार्मिक कार्याची किंवा पूजा करण्याची तयारी जोमाने सुरू होईल. जोडीदाराला मानसिक ताण असेल. तो आज खूप रागावलेला दिसेल. त्याचा रागाचा पारा वर चढू शकतो. खूप खर्च कराल. खरेदी कराल. कुटुंबात आनंद होईल. प्रेमसंबंधात नात्याच्या स्थितीवर समाधानी दिसाल. आजचा दिवस कामात प्रयत्न करण्याचे सूचित करतो.

तुळ
तुम्हाला जीवनात संतुलन आवडते आणि आज त्यात यशस्वी व्हाल. वैयक्तिक जीवन असो की व्यावसायिक जीवन, आज या दोघांमध्ये तुमचे संतुलन उपयोगी पडेल. वैवाहिक जीवनात खुप सजग राहाल, आतापर्यंत जी आव्हाने होती त्यापासून मोठ्या प्रमाणात मुक्त व्हाल आणि परस्पर संबंध वाढतील. प्रेमसंबंधात नात्यात वाढत असलेल्या प्रणयामुळे खूप आनंदित व्हाल. अंतःकरणातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. कामाची स्थिती प्रवासाचा योग बनवत आहे. खर्चाकडे थोडेसे लक्ष द्या.

वृश्चिक
आज बॉसशी भांडण करू नका, यातच तुमचे हित आहे. कारण आजचा दिवस थोडा कमजोर आहे. कामाची स्थिती आज अतिशय काळजीपूर्वक काम करण्याकडे इशारा करत आहे. थोडे दुर्लक्ष झाले तर त्रास होऊ शकतो, म्हणून लक्ष द्या. आळसापासनू दूर राहा. कुटुंबासाठी आनंदी दिवस असेल. काहींच्या लग्नाची बोलणी पक्की झाल्याने मनात उत्साह असेल. वैयक्तिक आयुष्याबाबत दिवस थोडा कमजोर आहे, म्हणून कोणत्याही नात्यात वादाला महत्त्व देऊ नका. स्वत:मध्ये हरवलेले असाल.

धनु
जीवनात लक्ष्य असेल तर ते मिळवणे सोपे जाते. आज तुमच्या सोबत असेल होईल. संपूर्ण दिवस एखाद्या विशिष्ट हेतूसाठी घालवाल आणि संध्याकाळपर्यंत यश मिळेल. कामात स्थिती गोंधळात टाकणारी असेल. योग्य वेळी योग्य गोष्ट करणे कठीण जाईल, म्हणून लक्ष केंद्रीत करून काम करा. वैयक्तिक जीवन आनंदाने पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल. खर्चही नियंत्रणात असेल. पण झोपेचा अभाव असेल.

मकर
आजचा प्रवास करणे चांगले ठरणार नाही, म्हणून तो टाळण्याचा प्रयत्न करा. तसे शक्य नसेल तर आपल्या सामानाची एक यादी आपल्याकडे ठेवा आणि संपूर्ण तयारीसह प्रवासाला जा. कारण आज आपले सामान हरववले जाण्याची शक्तता आहे. मानसिक ताण दूर होईल. दृढ आत्मविश्वास जाणवेल. या कारणास्तव, कामात यश मिळेल. वैयक्तिक जीवन देखील आज सांमजस्य दिसून येईल.

कुंभ
आजचा दिवस खूप चांगला नाही, परंतु संध्याकाळपर्यंत स्थिती ठिक होईल. आज मानसिक ताण असेल. कामाचा दबावही असेल. यामुळे प्राधान्यक्रम ठरवावे लागतील. प्रथम कोणती कामे करावीत, नंतर कोणते काम करावे, यावर लक्ष देणे आवश्यक आहे. थोडा खर्च होईल. कुटुंबात मालमत्तेसंदर्भात एखाा वाद उद्भवू शकतो. त्यात सहभागी होऊ नका. वैवाहिक जीवनाची स्थिती खूप चांगली राहील. आजचा दिवस लव्ह लाइफमध्ये आनंद देईल. प्रिय व्यक्तीबरोबर दूरच्या प्रवासाची योजना कराल.

मीन
वैवाहिक जीवनात तणावाची स्थिती होती, परंतु काळजी करण्याची आवश्यकता नाही. रिअल इस्टेट आणि मालमत्तेशी संबंधित बाबी आज लक्ष वेधून घेतील. त्यामध्ये यश मिळेल. नोकरीत स्थिती उत्तम असेल. नोकरीत चांगल्या कामासाठी कौतूक होऊ शकते. वैयक्तिक आयुष्यात निराश असू शकता. खर्च वाढेल. पण एखादी गोष्ट खूप आनंद देईल, ती म्हणजे वडिलांकडून एखादे काम शिकायला मिळेल.