16 जानेवारी राशिफळ : या 6 राशींसाठी धमाकेदार आहे दिवस, इतरांसाठी ‘असा’ असेल शनिवार

मेष
ग्रहस्थिती तुमच्या बाजूने राहील, परंतु काहीतरी गडबड होऊ शकते. काहीसे चिंतेत मग्न असू शकता, जीवनात निराशा व आळस येईल. परंतु दुपारनंतर उर्जा परत येईल, खर्च कमी होईल, चिंता कमी होतील. कामासाठी चांगला दिवस आहे. मेहनत कराल. कुटुंबातील तणाव कमी होईल. प्रेमसंबंधात अडचणी येतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराचा आधार आणि विश्वास वाटेल, एकत्र फिरायला जाल.

वृषभ
आजचा दिवस चांगला आहे. कारण ग्रहस्थिती साथ देईल. चांगले वर्तन कराल, ज्यामुळे लोक आकर्षित होतील. कुटुंबातील ज्येष्ठांशी एखाद्या गोष्टीवर चर्चा कराल. एखाद्याचे बिघडलेले आरोग्य चिंतेचे कारण होईल. उत्पन्न ठीक होईल. प्रेमसंबंधात आनंद मिळेल. प्रेमात नवीन योजना बनवाल. कुटुंबातील सदस्य सहकार्य करतील, उत्पन्न वाढविण्यात योगदान देतील. वैवाहिक जीवनात जोडीदारासाठी काहीतरी करावे लागेल कारण त्यांना थोडे कंटाळवाणे वाटत आहे.

मिथुन
ग्रह तुम्हाला आज काहीतरी नवीन शिकवतील. काही नवीन योजनांवर काम कराल. कामात चांगले परिणाम मिळतील. कामात पूर्णपणे गुंतलेले पाहून सहकारीही तुमचे कौतुक करतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. काम वाढविण्यात कुटुंबिय मदत करतील. चांगले परिणाम मिळतील. परदेशातून फायदा होईल. खर्चात वाढ होईल, परंतु उत्पन्नही चांगले होईल.

कर्क
आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबातील लहान सदस्यांसमवेत बराच वेळ घालवाल. मित्रांना फोनवर मनातील गोष्टी सांगाल. आरोग्यही मजबूत राहील. कामात यश मिळेल. नोकरीतील अडचणींपासून मुक्त व्हाल. व्यवसायात परिणाम आनंददायक असतील. कौटुंबिक वातावरणही चांगले राहील. उत्पन्नही चांगले होईल. स्वत:साठी वेळ काढाल आणि हलके वाटेल. जास्त दबाव असणार नाही.

सिंह
ग्रहांची स्थिती आज पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल. दुपारपर्यंत तुम्ही खुप आत्मविश्वासाने काम कराल. पण दुपारनंतर कामात काही अडचणी येतील. पण, प्रयत्नाने या अडचणींवर देखील मात कराल. व्यवसायातही खूप फायदा होईल. नोकरीत चांगले परिणाम मिळतील. अनावश्यक बोलून वैयक्तिक जीवन खराब करणे टाळा. आरोग्य कमजोर होऊ शकते. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीची साथ मजबूती देईल. नाते चांगले असल्याचे जाणवेल.

कन्या
आजचा दिवस काही प्रमाणात अनुकूल आहे. संध्याकाळी छान जेवणाचा आनंद घ्याल. कामात बुद्धीचा पूर्ण उपयोग कराल आणि व्यवहार कौशल्याने सर्वांवर छाप पाडाल. नोकरीसाठी दिवस चांगला आहे. व्यवसायात दिवस प्रगतीचा आहे. कुटुंबात काही अडचणी येतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रेमसंबंधात विरोधाचा सामना करावा लागू शकतो.

तुळ
ग्रह तुमच्या बाजूने असतील ज्याचा चांगला परिणाम होईल. कौटुंबिक जीवनात जवळीक वाढेल. जोडीदाराबरोबर बराच वेळ घालवाल. कौटुंबिक जीवनात ताणतणाव वाढत जाईल, ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. प्रेमसंबंधात आज काही अडचणींना सामोरे जावे लागेल. तीक्ष्ण बुद्धी आणि हुशारीचा उपयोग केल्याने व्यवसायात फायदा होईल.

वृश्चिक
आजचा दिवस यशदायक आहे. भाग्य प्रबळ असल्याने कमी मेहनतीत अनेक कामे सहजपणे हातावेगळी कराल. कामात मेहनत आवश्यक करा, चांगले फळ मिळेल. चांगल्या नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यापारासाठी दिवस उत्तम आहे. वैवाहिक जीवनातही प्रेम वाढेल. कुटुंबही तणावातून बाहेर पडून शांतीच्या मार्गावर जाईल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीच्या मनातील ऐकावे लागेल, अन्यथा समस्या वाढू शकतात.

धनु
आज स्वत:कडे जास्त लक्ष द्याल आणि स्वत:साठी एखादी नवीन योजना बनवाल. काही सवयीं बदलण्याचा विचार कराल, ज्यामुळे चांगले परिणाम मिळतील. कुटुंबाची देखील पूर्ण काळजी घ्याल. घरगुती खर्च कराल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. वैवाहिक जीवनात तणावातून मुक्तता मिळेल. प्रेमसंबंधासाठी दिवस सामान्य आहे. व्यापारात घाई टाळा. आज कोणतेही मोठे कामे हाती घेऊ नका.

मकर
आजचा दिवस अनुकूल आहे. मानसिकदृष्ट्या मजबूत राहाल. पूजाविधीत मन लागेल. मानसिक शांती मिळेल. छोट्या छोट्या गोष्टीवरही राग येऊ शकतो, म्हणून सावधगिरी बाळगा. कौटुंबिक जीवनात चढ-उताराची स्थिती असेल. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील. नोकरीसाठी दिवस चांगला आहे. चांगुलपणाचा फायदा मिळेल. रखडलेली कामे होतील.

कुंभ
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. दिवसाच्या सुरूवातीस अनावश्यक चिंतांनी त्रस्त असाल. यामुळे आरोग्य देखील कमजोर होऊ शकते. अशक्तपणा जाणवेल. कामात अडथळा आल्यामुळे वाईट वाटेल. पण दुपारनंतर स्थिती उलट होईल. मानसिक ताणही नाहीसा होईल. कुटुंब देखील सहकार्य करेल. खर्च वाढेल, परंतु उत्पन्नही चांगले होईल. प्रेमसंबंध सामान्य राहतील. प्रिय व्यक्तीला भेटण्याचा प्लॅन कराल.

मीन
ग्रहांच्या कृपेने आजचा दिवस तुमच्या बाजूने राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल, मनातल्या सर्व गोष्टी त्यांच्यासमोर उघड कराल, ज्यामुळे नात्यात आपलेपणा वाटेल. त्यांचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. उत्पन्न वाढल्यामुळे मन प्रसन्न होईल. कुटुंबातील छोट्यांशी प्रेमाने वागाल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्ती नाराज होण्याची शक्यता आहे.