17 फेब्रुवारी राशिफळ : सोमवारचा दिवस ‘या’ 6 राशींसाठी असेल ‘शुभ’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुम्ही तुमचे काम पूजा समजून कराल. काही लोकांना बदलीची सूचना मिळू शकते. तुम्ही चांगले काम करू शकाल. आर्थिकदृष्ट्या बरेच चांगले परिणाम दिसून येतील. कौटुंबिक जीवनात दिवस चांगला जाईल. आई-वडीलांचे सहकार्य मिळेल आणि त्यांचे आरोग्यही चांगले राहील. आपल्या एखाद्या आवडीला प्रोत्साहन द्याल. प्रेमसंबंधात आनंदाचे क्षण येतील आणि विवाहितांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल.

वृषभ
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असल्याचे संकेत आहेत. कारण आज भाग्याची साथ मिळेल. काही लोकांना मनाप्रमाणे स्थानांतरणाची संधी मिळाल्याने आनंद वाढेल. भाग्य प्रबळ राहिल, यामुळे बिघडलेली कामे देखील होतील. धनप्राप्तीमुळे मन प्रसन्न राहिल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल. कुटुंबात आनंद राहिल. धनप्राप्ती होईल. वैवाहिक जीवनात तणाव राहू शकतो. व्यवसायाच्या संदर्भात प्रचंड लाभाचे योग आहेत. धार्मिक आचरण कराल आणि त्या संबंधित खर्च कराल. प्रेमसंबंधात दिवस कमजोर राहिल.

मिथुन
आजचा दिवस तुमच्यासाठी कमजोर असू शकतो. आरोग्यदेखील कमकुवत राहू शकते. मानसिकदृष्ट्या आपण तणावात रहाल. साडेसातीचा प्रभाव तुमच्यावर दिसेल आणि निर्णय घेण्याची क्षमता प्रभावहिन होईल. वैवाहिक जीवनात चांगले परिणाम दिसतील. जोडीदार धार्मिक आचरण करेल आणि कुटुंबात एखादा पूजाविधी होऊ शकतो. वैवाहिक आयुष्यात सासरच्यांना भेटणे टाळावे, कारण भांडणे होऊ शकतात आणि त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे आरोग्य बिघडू शकते. प्रेमसंबधात आजचा दिवस खूप अनुकूल आहे. तुम्ही तुमच्या विरोधकांवर कुरघोडी कराल. नोकरीसाठी दिवस अनुकूल राहील.

कर्क
आजचा दिवस तुमच्यासाठी अनेक संधी आणू शकतो. व्यवसायात आज तुम्हाला भरपूर फायदा होईल. जोडीदाराचे आरोग्य बिघडू शकते, परंतु आपले नाते अधिक चांगले होईल. एकमेकांबाबत समजूतदारपणा वाढले. जोडीदाराने एखादी चूक केली असेल तर त्याला त्याची चूक लक्षात येईल. यासाठी तो माफी मागू शकतो. तुम्ही सुद्धा त्याचे म्हणणे समजूल घ्याल. प्रेमसंबंधात दिवस सामान्य राहिल. आरोग्याकडे थोडे लक्ष द्या. कौटुंबिक जीवन सामान्य राहिल. खर्च वाढण्याची शक्यता आहे.

सिंह
दिवसाची सुरुवात सिंह राशीच्या लोकांसाठी थोडी कमकुवत असू शकते, कारण आज तुम्ही मानसिकदृष्ट्या थोडे कमजोर असाल आणि आरोग्यही बिघडू शकते. सांधेदुखी किंवा अ‍ॅसिडिटीची समस्या त्रास देऊ शकते. एखाद्या जुन्या गोष्टीसाठी खुप खर्च होऊ शकतो. आज कोणत्याही वादात अडकणे टाळा. विवाहितांसाठी आजचा दिवस चांगला असेल तुमचे जीवनावरील प्रेम वाढेल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीबरोबर धार्मिक विषयावर चर्चा कराल. यामुळे दोघांना एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी मिळेल. नोकरीत केलेले प्रयत्न यशस्वी होतील आणि व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य माहिती घ्या.

कन्या
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र परिणामाचा असेल. प्रेमसंबंधात चढ-उतार राहिल. जोडीदार आपली चूक मान्य करेल आणि यामुळे संबंध सुधारतील. विवाहितांना चांगले परिणाम मिळतील. जोडीदार आपल्या जबाबदार्‍या चांगल्या प्रकारे पार पाडेल. वैवाहिक संबंध मजबूत होतील. कामात आज तुम्ही कमजोर पडू शकता. हे काम आपल्यासाठी चांगले नाही, असे वाटल्याने नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. प्रवासासाठी दिवस कमकुवत आहे. व्यवसायात चांगला लाभ होऊ शकतो.

तुळ
आजचा दिवस तुमच्यासाठी चढ-उताराचा असेल. कौटुंबिक जीवनात एखादी नवीन गोष्ट समोर येईल किंवा एखाद्या सदस्याचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. याचा परिणाम तुमच्या कामावर होईल, मात्र मनोबल चांगले असल्याने काम पूर्ण कराल. विचार न करता बोलणे त्रासदायक ठरू शकते. प्रेमसंबंधात दिवस अनुकूल आहे, कुटुंबाकडून प्रेम मिळेल. विवाहितांना दिवस अनुकूल आहे, परंतु जोडीदार एखाद्या प्रवासासाठी जाऊ शकतो आणि ही एखादी तीर्थयात्रा देखील असू शकते. तुम्ही सुद्धा त्याच्याबरोबर जाऊ शकता.

वृश्चिक
प्रवासासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रवासामधून नवी उर्जा मिळेल आणि पैसे मिळण्याचीही शक्यता आहे. काही नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल आणि काही जुन्या मित्रांनाही भेटण्याची संधी मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहिल आणि कुटुंबात शांतता आणि आनंद असेल. आरोग्य मजबूत राहिल व उर्जा मिळेल. धनप्राप्तीसाठी दिवस अनुकूल आहे. भाग्य तुम्हाला कर्म करण्यास प्रेरणा देईल. केलेल्या प्रयत्नांमधून लाभ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगले अनुभव येतील आणि यामुळे कामात रूची निर्माण होईल. वैवाहिक जीवनात तणावाची परिस्थिती असू शकते. प्रेमसंबंधात दिवस खूप चांगला आहे.

धनु
आजचा दिवस चांगला अनुभव घेऊन आला येईल. जो मानसिक दबाव जाणवत होता, त्यापासून मुक्ती मिळेल. काही नवीन करण्याबाबत विचार कराल, ज्यामुळे धनप्राप्ती होऊ शकते. खर्च वाढतील, तरीसुद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षमता जाणवेल. कामात चांगले परिणाम दिसून येतील. शासनाचे सहकार्य मिळेल. लाभ होईल. कौटुंबिक वातावरण चांगले राहिल. प्रॉपर्टी संबंधित लाभ होल शकतो. प्रेमसंबंधात आजचा दिवस खुप चांगला आहे. प्रिय व्यक्ती सोबत प्रवासाला जाऊ शकता.

मकर
मकर राशीच्या लोकांना आज खर्चातून मुक्ती मिळेल. यामुळे चांगले वाटेल. उत्पन्न वाढू शकते आणि खर्च कमी होईल. आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकता. आत्मविश्वास प्रचंड वाढले. प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. भाग्याची पूर्ण साथ मिळेल. प्रेमसंबंधात काही लोकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनात चांगले परिणाम दिसून येतील. जोडीदारासोबत भविष्यातील महत्वाच्या गोष्टीवर चर्चा करू शकता. कुटुंबात सर्वजण एकमेकांना खुश करण्याचा प्रयत्न करतील.

कुंभ
आज प्रेमभावनेची जाणी होईल आणि प्रिय व्यक्ती तसेच कामातील सहकारी यांच्याशी प्रेमाने वागाल. यामुळे ताजेतवाने वाटले. कामात आजचा दिवस तुमच्या बाजूने असेल आणि कामही यशस्वीपणे पूर्ण कराल. बॉससुद्धा कामाची स्तुती करेल. एखाद्या दूरच्या प्रवासाला जाण्याचे नियोजन करू शकता. आर्थिकदृष्ट्या दिवस थोडा कमजोर आहे. कारण खर्च अचानक वाढेल. प्रेमसंबंधात दिवस अनुकूल आहे. काहीजण आपल्या प्रिय व्यक्तीला विवाहासाठी प्रपोज करू शकतात. वैवाहिक जीवनासाठीही आजचा दिवस चांगला आहे.

मीन
आजच्या दिवशी एकसोबत अनेक लाभ होऊ शकतात. यामुळे आनंद दुप्पट होईल. भाग्याची साथ मिळेल आणि यामुळे कामात यश मिळेल, आनंद वाढेल. वैवाहिक जीवनात सुखाचे क्षण येतील आणि जोडीदारासोबत एखाद्या पार्टीत जाऊ शकता. जवळच्या मित्रांची भेट होऊ शकते. प्रेमसंबंधात दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तीला मनातील गोष्ट बोलून दाखवाल. कुटुंबातील ज्येष्ठांचे आरोग्य बिघडण्याचे संकेत आहेत. तुमचे आरोग्य चांगले राहिल आणि नवीन उर्जेची अनुभूती मिळेल. कामासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यापारातही यश मिळू शकते.

You might also like