17 जानेवारी राशीफळ : कन्या, तुळ आणि धनु राशीचे भाग्य असेल प्रबळ, इतरांसाठी ‘असा’ आहे रविवार

मेष
ग्रहांच्या कृपेने आजचा दिवस अनुकूल आहे. व्यवसायात यश मिळेल. कामात मन लागेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी प्रेमाने बोलाल. कामात चांगले परिणाम मिळतील. प्रेमसंबंधात तणावाचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य वाढेल. कुटुंबातील एखाद्याचे आरोग्य कमजोर होऊ शकते. तब्येत सुधारेल.

वृषभ
ग्रहांची स्थिती सांगते की, आज चढ-उताराची स्थिती राहिल. मानसिकरित्या चिंतेत राहाल. खर्च वाढेल. परंतु उत्पन्न देखील मिळेल. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. कामात जास्त मेहनत घ्यावी लागेल. बदलीची शक्यता आहे. कुटूंबाकडून सहकार्य मिळेल. कामात पुढे जाल. नवीन गाडी खरेदी करण्याची प्लॅनिंग कराल.

मिथुन
आजचा दिवस चांगला आहे. संततीला वेळ द्याल आणि त्यांची पूर्ण काळजी घ्याल. त्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडेल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनात तणाव दिसून येईल. कामात चांगले परिणाम मिळतील. आरोग्य मजबूत होईल. कामाचे कौतुक होईल.

कर्क
आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबाला वेळ द्याल. आपल्यानुसार स्थितीला तोंड देण्याची सवय लावून घ्याल ज्यामुळे आनंद मिळेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम दिसेल. घरी चांगला वेळ घालवाल. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. नोकरीसाठी दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनात तणाव वाढेल. तब्येत उत्तम राहील. रागापासून दूर राहणे आवश्यक आहे.

सिंह
आजचा दिवस चांगला आहे. प्रवासाला जाऊ शकता, परंतु सावधगिरी बाळगणे फार महत्वाचे आहे. कारण शारीरिक समस्या उद्भवू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने दिवस कमजोर आहे. खर्चातही वाढ होईल, ज्यामुळे मन दुखी होऊ शकते. उत्पन्न ठीक होईल. कुटुंबात सुख-शांती राहील. प्रेमसंबंधासाठी कमजोर दिवस आहे, म्हणून प्रिय व्यक्तीशी भांडण होऊ नये, म्हणून काळजी घ्या.

कन्या
आजचा दिवस अनुकूल आहे. पैशाच्या बाबतीत भाग्यशाली राहाल. पैसे मिळतील. उत्पन्न वाढेल. प्रेमसंबंधासाठी दिवस खूपच कमजोर आहे, प्रिय व्यक्तीची तब्येत बिघडू शकते. वैवाहिक चांगले राहील. जोडीदाराला फायदा होईल. व्यवसायात फायदा होईल. भाग्य प्रबळ राहील. नोकरीसाठी चांगला काळ आहे. व्यवसायावर लक्ष द्या.

तुळ
आजचा दिवस चांगला आहे. प्रत्येक काम चांगल्या प्रकारे पार पाडाल. कामात मन लागेल. आरोग्य बळकट राहील. अचानक कुठूनतरी पैसे आल्यामुळे स्थिती चांगली होईल. कुटुंबात तणाव असू शकतो, परंतु आपण त्यावर मात करण्याचा प्रयत्न कराल. नोकरीत चांगले परिणाम मिळतील. मेहनत यशस्वी होईल. विरोधकांवर मात कराल. प्रेमसंबंधात ताण येऊ शकतो. वैवाहिक जीवनात प्रेम वाढल्याने आनंद वाटेल.

वृश्चिक
आजचा दिवस सामान्य आहे. खर्च वाढेल. आरोग्यही थोडे नाजूक राहील. मानसिक ताण त्रास देईल, ज्यामुळे कामात अडथळा येऊ शकतो. दाम्पत्य जीवनात प्रेम वाढेल. प्रेमसंबंधात सामाधान वाटेल. मनातील एकमेकांशी बोलणे सोपे होईल, ज्यामुळे नातेसंबंधात समजूतदारपणा वाढेल. कुटुंबातील आनंदी वातावरणाने मनात हर्ष राहील.

धनु
आजचा दिवस अनुकूल आहे. कुठूनतरी पैसे मिळतील, ज्यामुळे अडलेली कामे मार्गी लागतील, आणि आनंदी व्हाल. आरोग्य ठिक राहील, पण खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. कुटुंबातील वातावरणही समंजस राहील. सर्वजण एकत्र बसून कुटुंबाच्या चांगल्या गोष्टींबद्दल चर्चा करतील. प्रेमसंबंधासाठी दिवस उत्तम आहे. रोमान्सची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात गैरसमज निर्माण होऊ शकतो.

मकर
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मानसिक तणावामुळे आरोग्य बिघडू शकते. पोट खराब होण्याची शक्यता आहे. अपचनाची तक्रार असू शकते. व्यवसाय वाढेल. कामात चांगले परिणाम मिळतील. कामावर लक्ष द्याल. वैयक्तिक प्रयत्नातून यश मिळेल. प्रेमसंबंधात रोमान्सची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात जोडीदारासाठी काहीतरी खास करण्याचा आजचा दिवस आहे.

कुंभ
आजचा दिवस थोडा कमजोर आहे. आरोग्यात घसरण राहील, ज्यामुळे अस्वस्थता येईल. भाग्यामुळे अनेक कामे होतील. घरात आनंद राहील. कुटुंबासमवेत एकत्र वेळ घालवायला आवडेल. कुटुंबाचा मानसन्मान वाढेल. वैवाहिक जीवनही चांगले राहील. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीसाठी भेट आणणे चांगले ठरेल.

मीन
आजचा दिवस तणावाचा आहे. मनात अनेक प्रकारचे विचार येतील, ज्यामुळे वेगळ्या दिशेन विचार करणे भाग पडले. यामुळे कामात अडथळा येईल. चिंता वाढेल. कामात चांगले परिणाम मिळतील. परंतु, एखाद्या गोष्टीबाबत भिती कायम राहील. उत्पन्न वाढेल. जोडीदाराशी भांडण होणार नाही याची वैवाहिक जीवनात काळजी घ्या. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीच्या घरच्यांना भेटून त्यांच्या शंका दूर केल्या पाहिजेत.