17 ऑक्टोबर राशीफळ : शनिवारच्या दिवशी ‘या’ 5 राशींवर होईल दुर्गामातेच्या कृपेचा वर्षाव

मेष
स्वभावाने गतिमान असल्याने, प्रत्येक गोष्टीत घाई करता, परंतु आज घाई तुम्हाला अडचणीत आणू शकते, म्हणून धीर धरायला शिका. वैवाहिक जीवनात स्थिती खूप चांगली असेल. जोडीदार आधार देताना दिसून येईल. नोकरदार लोक कामात खूप मेहनत करताना दिसतील. तुमच्या कामाकडून मोठ्या अपेक्षा आहेत, परंतु थोडा धीर धरा. शासकीय कामकाजात विलंब होईल. कामाची स्थिती चांगली आहे, म्हणून कामात जेवढी मेहनत करता येईल तेवढी करा, आणखी वेळेचा चांगला उपयोग करून घ्या.

वृषभ
आज आश्चर्यकारक आत्मविश्वास तुमच्यात दिसून येईल. मिळकतही चांगली होईल. आज कुठूनतरी पैसे मिळतील, यामुळे खूप आनंद होईल. पण दुसरीकडे अचानक काही पैसे खर्च करण्याचीही योजना आखू शकता. पैशांची योग्य प्रकारे गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून भविष्यात त्याचा फायदा घेऊ शकाल. कामात स्थिती चांगली व मजबूत होईल. वैयक्तिक जीवनात आनंद असेल.

मिथुन
आज तुमच्या बुद्धीची कदर अनेक लोक करतील. आज एखाद्या बौद्धिक कामात हात टाकाल ज्याचा तुम्हाला लाभ होईल. आयपीएलमध्ये ड्रीम 11 वर आपली टीम तयार करायची असेल किंवा कुठेतरी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर आज सर्व प्रयत्न कराल. विरोधकांबद्दल जरा सावध रहा. कामासाठी दिवस तुमच्या बाजूने पूर्णपणे दिसेल, म्हणून काम योग्य वेळी पूर्ण करा. विवाहित व्यक्तींचे जीवन आज उत्तम स्थितीत असेल. लव्ह लाइफमध्ये आव्हाने कायम राहतील.

कर्क
स्वभावाने भावनिक होणारे तुम्ही आज डोक्याने काम कराल, म्हणून काही कामे मार्गी लावू शकता. आज घेत असलेले निर्णय भविष्यात फायद्याचे मार्ग सुलभ करतील. भाग्य आपल्या पाठीशी उभे असल्याचे दिसून येईल, जेणेकरून कामांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. महत्वाकांक्षा पूर्ण होतील आणि एखाद्या मोठ्या व्यक्तीला भेटण्याची संधी मिळू शकेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रेमसंबंधात गैरसमज दूर होतील. नात्यात पुढे जातील.

सिंह
आजचा दिवस खुप फलदायी ठरेल. खुप दिवसांनी मित्रांना भेटाल. त्यांच्याबरोबर बराच वेळ घालवाल. आज शाळा-महाविद्यालयाबद्दल बोलून जुन्या आठवणींना उजाळा द्याल. यामुळे खूप आनंद होईल. कौटुंबिक जीवनात एखाद्या कमतरतेमुळे थोडे दु:खी होऊ शकता, कामात परिपूर्ण राहाल. चांगले प्रदर्शन कराल. विवाहित जीवनात आनंदाचे मनापासून स्वागत करा. प्रेमसंबंधात नात्याबद्दल खूप परिपक्व व्हाल. प्रिय व्यक्तीला भेट देखील देऊ शकता.

कन्या
आज स्वतःमध्ये हरवाल. स्वताचे कौतुक करणे फायद्याचे ठरेल आणि इतर लोकांनी तुमची स्तुती करावी असे वाटेल. परंतु नुसते गोड बोलण्यापेक्षा काहीतरी चांगले काम करा. आज कुटुंबाच्या जबाबदार्‍या पूर्ण करा. जमीनीसंबंधित बाबीं पार पाडण्यासाठी चांगला दिवस आहे. वैयक्तिक जीवनातल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. कामात स्थिती खूप चांगली असेल, म्हणून शांतता लाभेल.

तुळ
कामाबद्दल आज खूप कौतुक होईल. मेहनत आणि कार्यक्षमता खूप चांगले नाव मिळवून देईल. मानसिकदृष्ट्या, खूप आनंदी आणि सामर्थ्यवान दिसाल. परंतु आतून त्रास होत राहील. आज वाहन चालवू नका, एखादा अपघात होऊ शकतो. कोर्टाशी संबंधित बाबी चांगले फायदे देतील. वैयक्तिक जीवनात आनंद कायम राहील. कामात खूप चांगल्या स्थितीत असाल. फायदा होईल.

वृश्चिक
इतरांना संधी द्या की ते तुम्हाला ओळखतील. तुम्हाला स्वत:ला एका कवचात लपवून ठेवायला आवडते. आज त्या कवचातून बाहेर पडण्याचा आणि जगात किती चांगले आहे हे पहाण्याचा दिवस आहे. मोकळेपणाने खर्च कराल. काही जबाबदार्‍या पार पाडाल. जोडीदारासाठी खेरदी कराल. प्रेमसंबंधात आजचा दिवस थोडासा तणावपूर्ण असेल. प्रिय व्यक्ती रागावू शकते. घरात सुख असेल. व्यवसायात चांगले परिणाम मिळतील.

धनु
आज खूप चांगल्या मूडमध्ये असाल. ज्ञान, अनुभव आणि वस्तूस्थिती जाणून घेण्याची क्षमता उपयोगी ठरेल. एखाद्या अनुभवी व्यक्तीची भेट होईल, जो मित्र होऊ शकतो. दिवस उत्पन्नाविषयी खूप चांगला संकेत देत आहे. वैयक्तिक आयुष्यातही आजचा दिवस आरामदायक असेल. आयुष्यातील जोडीदाराची मित्रांशी ओळख करून देण्याची किंवा पार्टीत जाण्याची संधी मिळेल. स्थिती कामासाठी चांगली असेल. अधिकारीही तुमच्यावर खुश असतील.

मकर
स्वभावाने मेहनती आहात, आज मेहनत कराल. भाग्य पाठीशी उभे आहे, ज्यामुळे समस्या कमी असतील. एखादी चांगली बातमी मिळेल. धैर्याची कमतरता राहणार नाही, ज्यामुळे चुटकीसरशी कामे कराल. वैयक्तिक आयुष्यातही आनंददायी दिवस असेल. उत्पन्न कसे वाढेल यावर थोडेसे लक्ष द्यावे लागेल. कौटुंबिक जीवनात शांतता राहील. गुंतवणूकीबद्दल विचार करू शकता.

कुंभ
आज अंतर्ध्यान मुद्रेत बराच काळा राहाल. स्वत:च्या आत पाहण्याचा प्रयत्न कराल, स्वत:ला वेळ देण्याचा प्रयत्न कराल, आणि हा विचार कराल की आपल्या चूका कुठे झाल्या, जेणेकरून भविष्यात त्या टाळता येतील. आज एखाद्यास मदत देखील करू शकता. कौटुंबिक जीवनात असंतोष असेल, परंतु दाम्पत्य जीवनात आनंद, प्रेम आणि आपुलकीच्या समन्वयाने खूप आनंदी राहाल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीच्या जवळ जाल. तिच्याकडे लग्नाचा प्रस्ताव देऊ शकता. आरोग्य चढ-उतारांनी भरलेले असेल.

मीन
स्वभावाने खूपच भावनिक आहात, परंतु सध्या थोडी चिडचिड होत असेल तर आज थोडा दिलासा मिळेल. आज एखादी मोठी इच्छा पूर्ण होईल. जर कुठे नोकरी करत असाल तर कार्यालयात खुप समाधान मिळेल. सहकारी तुमच्या कामाचे आणि अनुभवाचे कौतुक करतील. ज्यामुळे खूप आनंदित व्हाल. उत्पन्नही चांगले होईल. भाग्याची साथ लाभेल. फक्त आरोग्याची काळजी घ्या. कारण आजारी पडू शकता. यामुळे सर्व कामांमध्ये व्यत्यय येऊ शकतो.