17 सप्टेंबर राशिफळ : सर्वपित्री दर्श अमावस्येचा दिवस ‘या’ 6 राशींसाठी ‘भाग्यशाली’

 

मेष
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. संध्याकाळपर्यंत वेळ चांगली आहे. मनापासून आनंद होईल, परंतु त्यानंतर काही चिंता वाढतील. विरोधक त्रास देतील. खर्च वाढेल. आरोग्यात चढ-उतार होऊ शकते. कामासाठी दिनमान मजबूत आहे. कामाचा आनंद मिळेल. विवाहित लोकांचे जीवनदेखील सुखी असेल. लव्ह लाइफसाठी आजचा दिवस खूप चांगला ठरणार आहे.

वृषभ
आजचा दिवस चांगला आहे. सर्व जबाबदार्‍या पार पाडाल आणि निवांत बसाल. करमणुकीत वेळ व्यतीत होईल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला असेल. सर्जनशीलतेने प्रिय व्यक्तीचे मन जिंकाल, त्यांना आनंदी कराल. विवाहित जीवनात तणाव असेल, तरीही एकमेकांबद्दल जबाबदारी ठेवा. कामासाठी दिवस सामान्य आहे. जास्त मेहनतीवर लक्ष द्या. मनात चांगले विचार येतील.

मिथून
आजचा दिवस चांगला आहे. मेहनतीचे यश मिळेल. दुपारनंतर कुटुंबासमवेत वेळ घालवल्याने हलके वाटेल. तब्येत ठीक होईल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. विवाहित लोकांचे जीवन खूप आनंदी असेल. प्रेमात नात्यात खूप आनंद असेल. प्रिय व्यक्तीशी प्रेमाने बोलाल. कामासाठी दिवस मजबूत आहे.

कर्क
आजचा दिवस चांगला आहे. पैसा येईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. हलका खर्च राहील. नंतर दुपारी कुटुंबातील लहान सदस्यांकडून एखादी कामाची माहिती मिळेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. कामासाठी दिनमान चांगला आहे. कष्टाचे फळ मिळेल. विवाहित लोकांच्या जीवनात प्रेम आणि रोमान्स वाढेल. बुद्धिमत्ता वाढेल. प्रेमात थोडा त्रास होऊ शकतो, परंतु तरीही प्रेम वाढेल.

सिंह
आजचा दिवस चांगला आहे. कुटूंबाशी काही महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल चर्चा कराल. थोडा खर्च होईल, परंतु मनाला आनंद देईल. उत्पन्न चांगले मिळेल. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. विवाहित लोकांचे जीवन खूप चांगले राहील. जोडीदाराच्या चांगल्या गोष्टींचा विचार कराल. लव्ह लाइफमध्ये आजचा दिवस चांगला असेल.

कन्या
आजचा दिवस चांगला आहे. आरोग्य बळकट होईल. समस्या दूर होतील आणि आज खूपच हलकं वाटेल. कुटुंबात एखादे पूजापाठ होऊ शकते. विवाहित व्यक्तींच्या जीवनात दिवस चांगला असेल. जोडीदाराला आनंदी ठेवू शकता. प्रेमासाठी काळ सामान्य असेल. नात्यात रोमान्स असेल. कामात मन रमणार नाही. चांगले परिणाम मिळतील.

तुळ
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. दुपारपर्यंत स्थिती चांगली राहील. उत्पन्न वाढेल पण त्यानंतर खर्चात वाढ होईल. थोडी मानसिक चिंता वाढू शकते. संध्याकाळी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असेल. विवाहित व्यक्तींच्या जीवनात थोडा ताण असेल. प्रेमात आनंद घ्याल. सर्जनशीलतेद्वारे प्रिय व्यक्तीसाठी एक उत्तम भेट आणाल.

वृश्चिक
आजचा दिवस चांगला आहे. आपल्या कामाकडे पूर्ण लक्ष द्याल. कामावरील पकड मजबूत होईल. बॉसही तुमच्यावर प्रभावित होईल. उत्पन्न वाढेल. जर आज पगाराच्या वाढीबद्दल बोललात तर यश मिळण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींचे कौटुंबिक जीवन चांगले असेल. नात्यात रोमान्स असेल. पार्टनरबरोबर घराबाहेर कुठेतरी जाल. लव्ह लाइफसाठी दिवस सामान्य असेल.

धनु
आजचा दिवस चांगला आहे. अचानक बिघडलेली कामे मार्गी लागतील, ज्यामुळे आनंदाला सीमा राहणार नाही. दुपारनंतर कामात मजबूती दिसेल. तुमच्या प्रमोशनवर चर्चा होऊ शकते. मन मजबूत असेल. काही चांगले विचार कराल. विवाहितांसाठी दिनमान चांगले आहे. लव्ह लाइफमसाठी आजचा दिवस चांगला आहे, परंतु कोणत्याही बाबतीत घाई करणे चुकीचे ठरेल. यामुळे नात्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

मकर
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. संध्याकाळपर्यंत एखाद्या गोष्टीबद्दल खूपच काळजीत असाल. मनामध्ये अस्वस्थता असेल. खाणेपिणे योग्य होणार नाही, परंतु त्यानंतर संपूर्ण स्थितीत बदल होईल. जणू आपली एखादी इच्छा पूर्ण झाली असे वाटून आनंदी व्हाल. भाग्य तुम्हाला साथ देईल. कामात यश मिळेल. विवाहित व्यक्तींच्या जीवनासाठी एक खूप रोमँटिक काळ असेल. लव्ह लाइफसाठी आजचा दिवस खूप मजबूत आहे.

कुंभ
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. दुपारपर्यंत लाइफ पार्टनरसोबत चांगले वागाल पण दुपारनंतर स्थिती बदलेल. सासरच्या लोकांशी भांडण होऊ शकते. याचा तुमच्या कौटुंबिक जीवनावरही परिणाम होईल. प्रेमसंबंधासाठी दिनमान चांगले आहे. जे लोक स्वतःवर नियंत्रण ठेवणार नाहीत, त्यांना आरोग्य समस्या त्रास देऊ शकतात. कामासाठी दिनमान चांगले आहे.

मीन
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. दुपारनंतर आव्हाने कमी होतील आणि खर्चही कमी होईल. वैवाहिक जीवनाकडे लक्ष द्या आणि जोडीदाराचे म्हणणे काळजीपूर्वक ऐका आणि त्याचे पालन करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. लव्ह लाइफमसाठी आजचा दिवस खूप रोमँटिक असेल. आरोग्य चांगले राहील.