18 फेब्रुवारी राशिफळ : ‘या’ सात राशींच्या लोकांवर होणार ‘राम’भक्त हनुमानाची ‘कृपा’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मेष : आजचा दिवस अनेक बाबतीत खास असणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल आणि तुमच्यातील प्रेम तसेच आकर्षणसुद्धा वाढेल. एखादी नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्याची इच्छा होऊ शकते. तुमचे विरोधक तुमच्या समोर येण्याची हिम्मत करणार नाहीत. नोकरीत तुमचे परिश्रमच तुम्हाला यश देऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीत जागृत रहा आणि स्पर्धा परीक्षेत जबरदस्त यश मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ
आजच्या दिवशी मानसिक तणाव रोखणे तुमच्यासाठी योग्य ठरेल. अन्यथा स्थिती बिघडू शकते. खर्च वाढलेले राहतील आणि शारीरीकदृष्ट्याही थोडी कमजोरी जाणवेल. वडीलांचे संपूर्ण सहकार्य मिळेल. एखाद्या दूरच्या प्रवासाला जाण्याचा योग आहे, ज्यामुळे फायदा होऊ शकतो. कायक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. म्हणजेच बदलीचे योग आहेत.

मिथून
आजचा दिवस आरोग्याच्या बाबतीत खुपच कमजोर आहे, यासाठी काळजी घ्या आणि आजारांपासून बचाव करा. धनहानी होण्याची शक्यता आहे. पैशांची गुंतवणूक करू नका. जुगारात पैसे कमावल्याने मन दुखी होऊ शकते. कार्यक्षेत्रात चढ-उताराची स्थिती राहिल. वैवाहिक जीवनात थोडे सुख मिळेल. प्रेमसंबंधात आजचा दिवस सामान्य आहे.

कर्क
आजचा दिवस संमिश्र अनुभव घेऊन आला आहे. व्यापारासाठी केलेल काम यश देईल. वैवाहिक जीवनात आश्चर्यकारकरित्या प्रेम आणि आकर्षण वाढेल. जोडीदार रोमँटीक मूडमध्ये राहील. उत्पन्न वाढेल. परंतु, कौटुंबिक जीवनात काही प्रमाणात अशांतता राहिल्याने तुमचे मन तेवढे प्रसन्न असणार नाही. विरोधकांना घाबरण्याची गरज नाही. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

सिंह
आज तुम्ही कोणत्यातरी कारणासाठी कुटुंबापासून दूर जाऊ शकता, ज्यामुळे कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळणार नाही. प्रेमसंबंधात यश मिळेल आणि तुम्ही प्रेमाने तुमच्या प्रिय व्यक्तीला खुश कराल. उत्पन्नात वाढ होईल आणि नवनवीन कल्पना घेऊन पुढे जाल. वैवाहिक जीवनात थोडा तणाव राहू शकतो आणि नोकरी बदलण्यासाठी प्रयत्न करू शकता.

कन्या
आजच्या दिवशी मातेच्याप्रती प्रेम व्यक्त कराल. कुटुंबात सुख आणि शांती मिळेल. वैवाहिक जीवनात थोडा तणाव राहिल आणि जोडीदार एखाद्या गोष्टीवरून रागात राहिल. कार्यक्षेत्रात जबरदस्त यश मिळेल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. घरगुती खर्च वाढतील आणि प्रत्येक कामात घरातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल.

तुळ
आजच्या दिवशी मानसिक तणाव वाढलेला राहिल, परंतु कामात यश मिळाल्याने मन प्रसन्न राहिल. तुम्ही जोखीम घेणे पसंत कराल आणि यामुळे फायदा होऊ शकतो. छोट्या बहिण व भावांशी चांगले संबंध होतील आणि त्यांच्यासोबत वेळ घालवाल. मित्रांची भेट घेण्याची संधी आज मिळेल. तुमची संवाद क्षमता वाढेल, ज्यामुळे यश मिळेल.

वृश्चिक
आजचा दिवस तुमच्यासाठी खुप चांगला आहे. कुटुंबासाठी उपलब्ध रहाल. वैवाहिक जीवनातील तणावापासून मुक्ती मिळेल. कामात यश मिळेल. संततीला सुख मिळेल, ज्यामुळे तुम्ही सुद्धा समाधानी रहाल. एखाद्या प्रकारचा धनलाभ झाल्याने आवक वाढेल. शिक्षणात चांगले परिणाम दिसून येतील.

धनु
आजचा दिवस खुप महत्वपूर्ण राहिल. कार्यक्षेत्र तुमचे लक्ष वेधून घेईल तर दुसरीकडे कुटुंबालाही तुमची आवश्यकता वाटेल. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून वादाची शक्यता आहे. जेवणाकडे योग्य लक्ष न दिल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. वैवाहिक जीवनात थोडा राग राहिल. जोडीदारही रागातच राहिल्याने वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. प्रेमसंबंधात आजचा दिवस अनुकुल आहे. आजचा दिवस चांगला करण्यासाठी तुम्ही तुमच्याकडून सर्व प्रयत्न कराल.
मकर
आजचा दिवस खुप चांगला आहे. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल आणि तुमचे नाते अधिक आनंदी होईल. प्रेमसंबंधात जोडीदाराची साथ मिळेल. वैवाहिक जीवनात संततीकडून समाधान मिळेल आणि संततीबाबत प्रेम व्यक्त कराल. कामात चांगले परिणाम दिसून येतील. व्यापारात आजचा दिवस फायद्याचा आहे. आरोग्य चांगले राहिल. प्रत्येक काम चांगल्या प्रकारे करू शकाल.

कुंभ
कार्यक्षेत्रात आज जास्त डोकं लावण्याची गरज पडणार आहे. कारण काहीतरी गडबड होण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडून वेळेची मागणी होऊ शकते. कारण कौटुंबिक अडचणी असणार आहेत, त्या तुम्हाला सोडवाव्या लागतील, त्यांची मागणी पूर्ण करावी लागेल. कुटुंबातील ज्येष्ठांचे आरोग्य बिघडू शकते. ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या तणावात रहाल. आजच्या दिवशी डोकं शांत ठेवून पुढील वाटचाल करा. तरच परिस्थितीवर तुम्ही नियंत्रण मिळवू शकता. प्रवासासाठी दिवस फार चांगला नाही.

मीन
प्रवासाचा योग आहे आणि तुम्ही एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्यासाठी प्रवास करू शकता. जवळच्या लोकांनाही सोबत घ्याल, यामुळे नवी उर्जा आणि जीवनात पुढे जाण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल आणि प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल. वैवाहिक जीवनात काही समस्या असू शकतात. जोडीदार आणि तुमच्या कुटुंबाच्या काही गोष्टी समोर येऊ शकतात. ज्यामुळे थोडे दुख होऊ शकते. कार्यक्षेत्रात आज स्थिती ठिक राहिल. कामानिमित्त तुम्हाला बाहेर पाठवले जाऊ शकते. कुटुंबात प्रेमाचे आणि आनंदाचे वातावरण राहिल.

You might also like