18 फेब्रुवारी राशिफळ : वृषभ

पोलीसनामा ऑनलाईन टीम – वृषभ : आजच्या दिवशी मानसिक तणाव रोखणे तुमच्यासाठी योग्य ठरेल. अन्यथा स्थिती बिघडू शकते. खर्च वाढलेले राहतील आणि शारीरीकदृष्ट्याही थोडी कमजोरी जाणवेल. वडीलांचे संपूर्ण सहकार्य मिळेल. एखाद्या दूरच्या प्रवासाला जाण्याचा योग आहे, ज्यामुळे फायदा होऊ शकतो. कायक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. म्हणजेच बदलीचे योग आहेत.