18 नोव्हेंबर राशिफळ : 5 राशींना ‘भाग्या’ची साथ आणि ‘धनलाभ’ होण्याचे संकेत, असा असेल बुधवार

मेष
आजचा दिवस चांगला आहे. भाग्य साथ देईल. कुटूंबाची मदत मिळेल, ज्यामुळे चांगले फायदे होतील. आनंद वाढेल. दूरच्या प्रवासाचे योग होत आहेत, परंतु प्रवासादरम्यान काही समस्या उद्भवू शकतात. काळजी घेतली तर प्रवास केल्याचा फायदा होऊ शकतो. प्रेमसंबंध आनंदाने व्यतीत होतील. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत पुढील वर्षासाठी काही प्लॅनिंग कराल. कामासाठी दिनमान चांगले आहे. परंतु तुमच्या बदलीचे योग तयार होत आहेत. आरोग्य नरम राहील.

वृषभ
आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. मनात अनेक गोष्टी येतील ज्या तुम्हाला मानसिक ताणतणावात ठेवतील. अशक्तपणा जाणवेल, ज्यामुळे थोडा त्रास होऊ शकतो. त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. खाण्याकडेही लक्ष द्या. पैशाच्या बाबतीत दिवस कमजोर आहे. गुंतवणूक टाळा. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य कमी होईल. त्यांना जर कंटाळा आला असेल तर कुठेतरी फिरायला घेऊन जा. कौटुंबिक सहकार्य मिळेल. समाजात तुमचे नाव होईल. कामात चढ-उतार येतील. आज खूप धावपळ होईल. प्रेमसंबंधात आनंदी दिसाल.

मिथुन
आज सावधगिरी बाळगा. व्यवसायाच्या संबंधात काही चांगल्या असायनमेंट्स हाताला लागू शकतात. योग्य पद्धतीने काम केल्यास खूप फायदा होईल, परंतु भागीदाराशी वाद सुद्धा होऊ शकतो, म्हणून खूप काळजीपूर्वक विचार करा आणि काम करा. नोकरीसाठी दिनमान अनुकूल आहे. विरोधक शांत होतील. कोर्टाशी संबंधित बाबींमध्ये विजयी व्हाल. प्रेमसंबंधासाठी दिवस सामान्य आहे. विवाहित लोक समाधानी दिसतील.

कर्क
आजचा दिवस फारसा अनुकूल नाही. कारण आरोग्य बिघडू शकते. पोटाची समस्या असू शकते. गॅसच्या तक्रारी देखील त्रास देऊ शकतात. खर्च वाढेल. काही अनावश्यक खर्चही होऊ शकतात. विवाहित व्यक्तीचे जीवन सुसंगततेने भरलेले असेल. जोडीदाराचा गैरसमज दूर करण्यासाठी चांगला दिवस आहे. परस्पर संवाद साधा. कुटुंबातील सदस्यही पूर्ण सहकार्य करतील. एखाद्या गोष्टीवरून कौटुंबातील ज्येष्ठ नाराज होऊ शकतात. प्रेमसंबंधात आनंदी राहाल. कामासाठी दिवस चांगला आहे.

सिंह
आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. संततीच्या प्रगतीवर समाधानी असाल, परंतु त्यांच्या आरोग्याबद्दल चिंता असू शकते. वैवाहिक जीवनासाठी दिवस अनुकूल आहे. लाइफ पार्टनर पूर्णपणे तुमच्या सोबत असेल, यामुळे तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल. प्रेमसंबंधात दिवस थोडा कमजोर आहे. तुम्ही प्रिय व्यक्तीला खुश करायला जाल, आणि ती नाराज होईल, म्हणून काळजी घ्या. कोणताही गैरसमज निर्माण होऊ शकतो. कामासाठी दिवस चांगला आहे.

कन्या
आजचा दिवस अनुकूल आहे. कौटुंबिक जीवनातून समाधान मिळेल. कुटुंबाची जबाबदारी घेण्यास मागे हटणार नाही. घरगुती कामेही कराल. कामात जास्त व्यस्त राहिल्यामुळे कार्यालयीन कामे मागे पडतील. विरोधकांच्या बाबतीत निश्चिंत रहा, पण सोबत काम करणार्‍यांसोबत चांगले वागा. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदार प्रेमाने बोलेल. प्रेमसंबंधात प्रेयसीसाठी सर्जनशीलताने काहीतरी खास कराल, ज्यामुळे प्रेम जीवनात नवीन ऊर्जा येईल.

तुळ
आज प्रवास करणे टाळा. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य बिघडू शकते. खूप नियंत्रित राहून बोलले पाहिजे. तोंडातून एखादा अपशब्द बाहेर येऊ शकतो. कुटुंबात तणाव वाढू शकतो. काळजी घेणे आवश्यक आहे. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. त्यांचे आशीर्वाद उपयोगी येतील. प्रेमसंबंधात आनंदी रहाल. वैवाहिक जीवनात तणाव जाणवेल. तरीही आनंदाचे क्षण सापडतील.

वृश्चिक
आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या, अन्यथा अ‍ॅसिडिटी किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. कौटुंबिक सहकार्यामुळे कामात यश मिळेल. वाहन चालविणे टाळा. प्रेमसंबंधात आपल्या प्रिय व्यक्तीसाठी एखादी सुंदर भेट आणून शकतात. आयुष्य सुखी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. कामासाठी चांगला दिवस आहे. प्रयत्नांनी अधिक चांगले काम कराल. प्रशासनाचेही सहकार्य मिळेल.

धनु
आजचा दिवस अनुकूल आहे. कामात गांभीर्याने काम केल्याने वरिष्ठांना देखील चांगले वाटेल, परंतु एखाद्या गोष्टीवरून थोडे गोंधळलेले असाल, यासाठी प्राधान्य ठरवा. अन्यथा, काहीतरी चूक होऊ शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुठूनतरी आर्थिक लाभ होऊ शकतो. विवाहित लोक उत्साही असतील. प्रेमसंबंधात समस्या येऊ शकतात. एकट्याने प्रवास केल्याने आनंद होईल. कौटुंबिक वातावरणही तुमच्या बाजूने असेल. कामात खूप मेहनत कराल.

मकर
आजचा दिवस थोडा कमजोर होऊ शकतो. खर्च पाहून थोडे टेन्शन येऊ शकते. वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असेल, परंतु जोडीदाराला एखाद्या कामासाठी जावे लागेल आणि तुम्हाला त्यांची कमतरता जाणवेल. मानसिकदृष्ट्या थोडा तणाव असेल. कौटुंबिक वातावरण आनंद देईल. जुन्या प्रलंबित कामेही टाळाल. कुटुंबातील एखाद्याच्या आजारावर खर्च होऊ शकतो. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीच्या नाराजीचा सामना करावा लागेल, परंतु थोड्या वेळाने त्यांचा राग देखील नाहीसा होईल.

कुंभ
आजचा दिवस चांगला आहे. पैसा येईल. ज्यामुळे चेहर्‍यावर हास्य येईल. रखडलेली कामेही पूर्ण होतील. ऑफिसमध्ये बॉसदेखील खुश दिसेल. एखादे चांगले इन्सेटिव्ह किंवा प्रमोशन मिळू शकते. कामासाठी दिवस चांगला आहे. विवाहित लोक आनंदी होतील. प्रेमसंबंधात जोडीदारासोबत छोट्या वादानंतर प्रेमाचे गप्पा माराल. दिवस रोमँटिक होईल. प्रवासासाठी चांगला दिवस आहे.

मीन
आज कष्टाचे फळ मिळेल. आतापर्यंत जे काम केलेत त्याची भरपाई मिळेल. एखादी चांगली बातमी मिळेल. बॉसच्या नजरेत तुमचे मुल्य वाढलेले आहे. त्यांच्याशी संबंध चांगले होतील, ते असे काही बोलतील जे तुमच्या बाजूने असेल. कौटुंबिक वातावरण थोडे त्रासदायक असू शकते, परंतु काळजी करण्याची आवश्यकता नाही. प्रेमसंबंधात चांगले क्षण घालवण्याची आणि प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. बाहेर जेवणसुद्धा करू शकता. वैवाहिक जीवनात निश्चिंत रहाल, पार्टीला जाण्याची संधी मिळू शकते. हातात कोठूनतरी पैसे येऊ शकतात.