19 डिसेंबर राशिफळ : ‘या’ 7 राशींवर ग्रह-नक्षत्र ‘मेहरबान’, ‘धनलाभ’ आणि ‘यश’ मिळण्याचा योग

मेष
आजचा दिवस अनुकूल आहे. तुम्ही तुमची एखादी जुनी इच्छा पूर्ण करू शकता, ज्यामुळे आनंद होईल. सर्जनशीलता वाढेल आणि लोकांना तुमच्या कलेची ओळख करून द्याल. चांगले उत्पन्नही मिळेल. कामात मेहनत यशस्वी होईल. आत्मविश्वास वाढेल, पण वागण्यात थोडा गर्व असेल. यामुळे वैवाहिक जीवनात समस्या उद्भवू शकतात. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील. धनलाभ होईल.

वृषभ
आजचा दिवस चांगला आहे. स्वतःसाठी काहीतरी विचार कराल आणि स्वत:वर पैसे खर्च कराल. शारीरिक सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न कराल. उत्पन्न चांगले होईल. काही कामे अगोदरच ठरवलेली असल्याने खर्च जास्त होईल. आठवडा संततीसाठी शांततापूर्ण असेल आणि त्यांच्याकडून समाधान मिळेल. दाम्पत्य जीवनात प्रेम आणि आपुलकी वाढेल आणि रोमान्सची संधी मिळेल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीला ऐकण्याची आणि समजण्याची संधी मिळेल. लांबचा प्रवास टाळा.

मिथुन
आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. दिवस चांगला करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. भाग्याच्या अभावामुळे काही कामे अडकतील. परंतु अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही. बुद्धिमत्ता आणि कौशल्याच्या बळावर अनेक कामे मार्गी लावाल. मान सन्मान वाढेल. सरकारी क्षेत्रातून लाभ होण्याचे योग आहेत. समाजातील काही महत्त्वपूर्ण लोकांशी परिचय होईल. वैवाहिक जीवनातील तणावातून मुक्तता होईल. प्रेमसंबंधात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

कर्क
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. एखाद्या गोष्टीमुळे चिंताग्रस्त राहू शकता. अनावश्यक भीतीमुळे काळजीत राहाल. आरोग्याची काळजी घ्या. पेय पदार्थांचे जास्त सेवन करा. वैवाहिक जीवनात काही समस्या असू शकतात. परंतु त्या मोठ्या समस्या नाहीत, अल्पकालीन असल्याने निश्चिंत राहा. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीशी प्रेमाने बोलण्याच्या अनेक संधी मिळतील. कामात महत्त्व वाढेल आणि कामाचे कौतुक होईल. चांगल्या कामामुळे सन्मान होऊ शकतो.

सिंह
आजचा दिवस अनुकूल आहे. आपले कुटुंब आणि जोडीदाराच्या गरजांकडे लक्ष द्याल, नातेसंबंधाची गाठ उघडाल. प्रेमसंबंधासाठी दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. नोकरीत खूप मेहनत करावी लागेल. तरच काम मार्गी लागेल. मान सन्मान वाढेल. व्यापारी वर्गाला चांगले परिणाम मिळतील.

कन्या
आजचा दिवस धैर्य देईल आणि आव्हानांतून पुढे जाल. वैवाहिक जीवनात स्थिती तुमच्या बाजूने असेल. प्रेमसंबंधात इतरांना हस्तक्षेप करू देऊ नका, अन्यथा नाते बिघडू शकते. कुटुंबात उत्पन्नाबाबत चर्चा होऊ शकते. आरोग्य मजबूत होईल. कामात चांगले परिणाम मिळतील. पण तुम्ही स्वत: अशा काही गोष्टी करू शकता ज्यामुळे विरोधक मोठे होऊ शकतात.

तुळ
आज थोडे उदास होऊ शकता कारण जोडीदारामुळे काही अडचणी असतील. अशा स्थितीत त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधात सर्जनशीलता दर्शविण्याची संधी मिळेल. प्रिय व्यक्तीचे हृदय जिंकाल. कुटुंबातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील ज्येष्ठांची प्रकृती बिघडल्याने चिंता वाढू शकते. म्हणूनच त्यांच्यावर लक्ष ठेवा. कामात चांगल्या परिणामांची प्रतिक्षा करत राहाल आणि म्हणूनच नोकरी बदलण्याचा विचार करू शकता.

वृश्चिक
आजचा दिवस प्रेमने भरलेला असेल, विशेषत: आपल्या आईला खूप प्रेम द्याल आणि तिचा आशीर्वाद मिळेल. त्यांनाही समाधान वाटेल आणि तुम्हालाही शांती मिळेल. कुटुंबात लक्ष द्याल. कामात केलेले प्रयत्न फायदेशीर ठरतील. प्रेमसंबंधासाठी चांगला काळ आहे. वैवाहिक जीवनात उत्साह आणि रोमान्स असेल. नातेवाईक, मित्र किंवा शेजार्‍यांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. परंतु कोणाशीही वाद घालणे टाळा.

धनु
आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबाला मनातील गोष्टी सांगाल आणि ते तुम्हाला मदत करतील. मनात धार्मिक विचार असतील. देव भक्तीला थोडा वेळ द्याल. प्रेमसंबंधात काही अडचणी येऊ शकतात. कारण प्रिय व्यक्ती भावनिक होऊ शकते. वैवाहिक जीवन चांगले राहील. तणावातून मुक्तता मिळेल. नोकरीत अधिक लक्ष देऊन काम केल्याने फायदा होईल.

मकर
आजचा दिवस चांगला आहे. चांगले पैसे मिळतील. मोठ्याप्रमाणात धन आल्याने स्थिती चांगली होईल. आनंदाने सर्वकामे कराल. कुटुंबातील स्थान मजबूत होई. कार्यक्षेत्रातील प्रयत्नांना यश मिळेल आणि चांगले परिणाम मिळतील. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीशी रोमान्सची संधी मिळेल. त्यांना आनंदी ठेवू शकता. वैवाहिक जीवनात आनंद मिळविण्यासाठी वर्तन बदलण्याचा प्रयत्न करा. कामात चांगले परिणाम मिळतील. उत्पन्नही वाढेल.

कुंभ
आजचा दिवस अनुकूल आहे, फक्त खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. कारण खर्च खूप जास्त असेल. ज्याचा उत्पन्नावर परिणाम होईल. पण तरीही तुम्ही विचलित होणार नाही आणि आव्हानांना ठामपणे सामोरे जाल. प्रेमसंबंधासाठी दिनमान सामान्य आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे महत्व समजेल, ज्यामुळे नाते अधिक चांगले होईल. कुटुंबात सामंजस्य राहील. कामात जास्त प्रयत्न केल्यास यश मिळेल.

मीन
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मानसिक चिंताने ग्रस्त असू शकता. खर्च देखील जास्त असेत, जो तुमच्या समस्यांवर आणखी जोर देईल. उत्पन्न चांगले होईल, परंतु तरीही आर्थिक नियोजन नसल्याने त्रास होईल. प्रेमसंबंधात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आपलीच माणसं आपल्या विरोधात उभी राहू शकतात, म्हणून सावधगिरी बाळगा. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. जोडीदाराला तुमचे म्हणणे समजावून सांगण्याची गरज भासणार नाही, ते स्वतःहून सर्व समजतील आणि स्थिती चांगली होईल. उत्पन्न चांगले होईल.