19 फेब्रुवारी राशिफळ : कर्क

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कर्क : तुमच्यासाठी आजचा दिवस थोडा कमजोर आहे. कामात विलंब होईल. कुणालाही काही वाईट बोलू नका, ज्यामुळे मन दुखावेल. तुमचीच माणसं तुमच्याशी शत्रूसारखी वागतील. भाग्य कमजोर राहिल. प्रत्येक काम यशस्वी करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. प्रेमसंबंधात दिवस कमजोर आहे. आरोग्यसुद्धा थोडे कमजोर राहू शकते. कामाच्या ठिकाणी एखाद्या गोष्टीमुळे मन नाराज राहण्याची शक्यता आहे.