19 फेब्रुवारी राशिफळ : ‘या’ 5 राशींना नफा मिळण्याचा योग

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मेष : तुमच्यासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. कामात यश मिळेल. गुप्त पद्धतीने धन येण्याची शक्यता आहे. आरोग्य थोडे कमजोर राहू शकते. आरोग्य चांगले राहण्यासाठी जेवणाकडे लक्ष द्या. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवाल. वैवाहिक जीवनात जोडीदार तुमच्या कार्यक्षेत्रात मोठी मदत करू शकतो. कौटुंबिक जीवन सुखी राहिल आणि आईचे सहकार्य मिळेल.

वृषभ
तुमच्यासाठी आजचा दिवस चढ-उताराचा राहिल. तुम्हाला आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. पैशाचीही योग्य व्यवस्था करावी लागेल. दोघांसाठी आजचा दिवस कमजोर आहे. कार्यस्थळावर चांगले परिणाम दिसून येतील. संततीच्या बाबतीत काही समस्यांना तोंड द्यावे लागेल. प्रेमसंबंधात आजचा दिवस खुप चांगला आहे. परंतु काही लोक तुमच्या विरोधात उतरू शकतात.

मिथुन
तुमच्यासाठी आजचा दिवस ठिक आहे. तुमच्या दाम्पत्य जीवनात तणावातही प्रेमाच्या गोड गोष्टी होतील. तुमच्या नात्यातील जवळीक वाढेल. प्रेमसंबंधात आजचा दिवस खुप चांगला आहे. कार्यक्षेत्रातही आज तुम्ही काहीतरी चांगले काम कराल, यामुळे तुमची प्रशंसा होईल. व्यापारासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. आरोग्य कमजोर राहिल. विरोधकांना तुम्ही नमवाल. मानसिकदृष्ट्या तणाव जाणवेल.

कर्क
तुमच्यासाठी आजचा दिवस थोडा कमजोर आहे. कामात विलंब होईल. कुणालाही काही वाईट बोलू नका, ज्यामुळे मन दुखावेल. तुमचीच माणसं तुमच्याशी शत्रूसारखी वागतील. भाग्य कमजोर राहिल. प्रत्येक काम यशस्वी करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. प्रेमसंबंधात दिवस कमजोर आहे. आरोग्यसुद्धा थोडे कमजोर राहू शकते. कामाच्या ठिकाणी एखाद्या गोष्टीमुळे मन नाराज राहण्याची शक्यता आहे.

सिंह
तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. उत्पन्न वाढेल. खर्च कमी होतील. सुख-सुविधांमध्ये दिवस व्यतीत कराल. प्रिय जोडीदारा बरोबर वेळ घालवण्याची संधी मिळेल. कुटुंबात एखाद्या ज्येष्ठाचे आरोग्य बिघडू शकते. तुमची इच्छापूर्ती होईल. कामात खुपकाही शिकण्यास मिळेल. विचारपूर्वक काम करावे लागेल.

कन्या
तुमच्यासाठी आजचा दिवस महत्वपूर्ण आहे. कामात आजचा दिवस खुप अनुकूलता घेवून येईल. तुम्ही रोमँटीक मूडमध्ये रहाल. कामात यश मिळेल. तुमच्या प्रिय व्यक्तीला घेऊन कुठेतरी फिरण्यासाठी किंवा मुव्ही पाहण्यासाठी जाऊ शकता. कामात चांगले कार्य कराल. कौटुंबिक जीवनात समस्या येतील आणि आई-वडीलांचे आरोग्य बिघडू शकते. काही लोक तुमच्या प्रॉपर्टीबाबत वाद उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यापासून सावध रहा.

तुळ
तुमच्यासाठी आजचा दिवस उन्नतीदायक आहे. छोट्या प्रवासातून नवीन संबंध निर्माण होतील. कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल. मित्र आणि नातेवाईकांशी संबंध राहिल. कामातील सहकार्‍यांशी चांगले संबंध ठेवल्यास यश मिळेल. प्रेमसंबंधात दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे. दाम्पत्य जीवनात जोडीदाराला शारीरीक समस्या त्रास देऊ शकतात. जोडीदाराच्या माध्यमातून तुम्हाला एखादा लाभ होऊ शकतो.

वृश्चिक
आजचा दिवस धनाच्या बाबतीत खुप अनुकूल राहिल. तुम्हाला धनलाभ होण्याचे योग आहेत. सासरच्यांकडून एखादी शुभवार्ता मिळू शकेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी होऊ शकता. आपल्या रागावर नियंत्रण ठेवल्यास यश तुमच्या सहज हाती येईल. कामातील स्थिती तुमच्या बाजूने राहिल. कुटुंबात छोट्यांकडून सुख मिळेल. दाम्पत्य जीवनात आजचा दिवस अनुकूल राहणार आहे. प्रेमसंबंधात आपल्या प्रिय व्यक्तीकडे प्रेम व्यक्त कराल. यामुळे आनंद मिळेल.

धनु
आजचा दिवस चढ-उताराचा आहे. खर्च वाढतील, परंतु उत्पन्नही वाढेल. आरोग्य कमजोर राहू शकते. मानसिक तणावातून आता मुक्ती मिळण्याची वेळ आली आहे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा, अपघाताची शक्यता आहे. दाम्पत्य जीवनात स्थिती चांगली होईल आणि तुम्ही एकमेकांच्या जवळ याल. कौटुंबिक जीवन चांगले राहिल. प्रेमसंबंधात कडवटता येऊ शकते.

मकर
तुमच्यासाठी आजचा दिवस थोडा कमजोर आहे. कारण तुम्ही मानसिकदृष्ट्या तणावात राहू शकता. खर्चसुद्धा वाढेल. उत्पन्न अपेक्षेपेक्षा कमी होईल. दिवस जसजसा पुढे सरकेल तुमची स्थिती सुधारेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. काळजी घ्या. प्रॉपर्टीच्या प्रकरणात लाभ होईल. कामात स्थिती पूर्णपणे तुमच्या बाजून राहिल. दाम्पत्य जीवन आणि प्रेमसंबंधात आजचा दिवस खुप चांगला आहे.

कुंभ
तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कामात तुमचा प्रभाव राहिल आणि बॉसशी संबंध सुधारतील. तुमचे उत्पन्न वाढेल. व्यापारासाठी केलेला प्रवास यश देईल. उत्पन्न वाढेल. प्रेमात तुम्ही नशीबवान रहाल आणि भरपूर प्रेम मिळेल. दाम्पत्य जीवनात जोडीदाराच्या माध्यमातून लाभ मिळण्याचे योग आहेत. कौटुंबिक जीवनात थोड्या समस्या जाणवतील.

मीन
तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे, परंतु थोडी आव्हाने राहतील. तुमची बुद्धी उपयोगी पडेल. पैशाच्या बाबतीत आजचा दिवस खुप चांगला आहे. वडीलांचे आरोग्य बिघडू शकते. परंतु नंतर आरोग्य ठिक होईल. कौटुंबिक जीवनासाठी अनुकूल वेळ आहे. प्रेमसंबधात प्रेममय दिवस आहे. प्रिय व्यक्तीचे पूर्ण साथ मिळेल. दाम्पत्य जीवनात तणावाला तोंड द्यावे लागेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like