19 फेब्रुवारी राशिफळ : या 5 राशींचे नशिब चमकणार, यश घेईल पायांशी लोटांगण, इतरांसाठी असा आहे शुक्रवार

मेष
आजचा दिवस संमिश्र आहे. मित्रांसह दूरच्या प्रवासाला जाण्याचा विचार करू शकता. परंतु आज रागावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा एखाद्या वरिष्ठ अधिकार्‍याशी वाद नुकसानकारक ठरू शकतो. वैवाहिक जीवन चांगले राहील. नवीन कामात यश मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक व्यवसायात भावाच्या सल्ल्याने प्रगती होईल आणि कौटुंबिक कार्यात वाढ होईल. प्रेमसंबंधात एक नवीन अध्याय सुरू होईल. सामाजिक कार्यात पुढे जाण्याने सन्मान होईल.

वृषभ
आज कार्यक्षेत्रात नवीन योजनांकडे लक्ष द्याल, ज्यामुळे बर्‍यापैकी फायदा होईल. सरकारी नोकरी करणार्‍यांना आज कामात अधिकार्‍यांचा राग सहन करावा लागू शकतो. लव्ह लाइफसाठी व्यस्ततेतून सुद्धा वेळ काढाल, ज्यामुळे प्रिय व्यक्ती आनंदी होईल. भावंडांशी संबंध सुधारतील. संध्याकाळ सामाजिक संबंधांसाठी फायदेशीर ठरेल. वर्तमानपत्राशी संबंधित लोकांन आज जास्त मेहनत करावी लागेल.

मिथुन
आजचा दिवस उत्तम लाभदायक आहे. आज सकाळपासूनच छोटे-मोठे फायदे होत राहतील. आई आणि वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा. एखादे नवीन काम सुरू करायचे असेल तर मेहनतीनंतरच यश मिळवू शकते. उच्च शिक्षणासाठी मोठ्या लोकांची भेट घेणे विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरेल. राजकारणात काम वाढेल. संध्याकाळचा वेळ मित्र आणि कुटूंबासमवेत घालवाल. नोकरी, व्यवसायाशी संबंधित प्रश्नही आज सुटतील.

कर्क
आजचा दिवस खर्चाचा आहे. परंतु खर्चांवर नियंत्रण ठेवले तर दिवस फायदेशीर ठरेल. विरोधकांच्या टीकेकडे लक्ष न देता आपले काम करत राहिल्यास यश पायाशी लोटांगण घालेल. नोकरीत अधिकार वाढतील. सामाजिक संवाद वाढविण्यास यशस्वी ठराल. विवाहासाठी इच्छूक असलेल्यांना काही चांगले प्रस्ताव येतील. आज विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत एखाद्या अडथळ्याचा सामना करावा लागू शकतो.

सिंह
वडिलांचा आशीर्वाद मिळेल. धनसंपत्तीही वाढेल. जे काम अडकले आहे ते भावाच्या मदतीने पूर्ण होईल. अचानक धनलाभाचा योग आहे. कार्यक्षेत्रातील शत्रुत्त्व आणि षड्यंत्र टाळण्याचा प्रयत्न करा. धार्मिक कार्यात खर्च केल्याने कीर्ती वाढेल, मान सन्मानही वाढेल, ज्यामुळे मन प्रसन्न होईल. नवीन यश मिळविण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल, ज्यामुळे नंतर अनेक फायदे मिळतील. अनोळखी व्यक्तीशी पैशाचे व्यवहार टाळा, अन्यथा नुकसान सहन करावे लागेल.

कन्या
आज विद्यार्थी भविष्य मजबूत करण्यासाठी योग्य कौशल्ये निवडतील, जे भविष्यासाठी चांगले परिणाम देईल. कौटुंबिक स्थिती अनुकूल राहील. जोडीदाराचा पाठिंबा देखील पुढे मेहनत करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम करेल, ज्यामुळे मनात प्रेमाची भावना वाढेल. संध्याकाळी स्थितीत सुधारणा झाल्यामुळे अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. घरातील समस्याही हळूहळू सुटतील. नोकरी, उद्योगात तत्परतेने फायदा होईल. प्रतिकूल स्थिती उद्भवल्यास रागावर नियंत्रण ठेवा, नाहीतर प्रकरण वाढेल.

तुला
आज कार्यक्षेत्रात पद आणि अधिकार वाढतील. लव्ह लाइफमध्ये भेट मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मन आनंदित होईल. विद्यार्थ्यांना आपल्या समस्यांवर योग्य तोडगा न निघाल्यास मनात अशांतता राहील. परिवारासह सहलीला जाण्याचा योग प्रबळ होईल. पितृतुल्य लोकांचे सहकार्य लाभदायक ठरेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. भाग्याची चांगली साथ मिळेल. बोलण्यामुळे कुटुंबातील सदस्य प्रभावित होतील. कोर्ट कचेरेची प्रकरणे आज तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. आज धार्मिक कार्यात रुची वाढेल. दान, पुण्य कार्यात सहभागी व्हाल.

वृश्चिक
आज प्रेमसंबंधात एक नवीन उर्जा निर्माण होईल, ज्यामुळे प्रसन्न होईल. कुटुंबातील सर्व सदस्य एखाद्या मंगल कार्यक्रमासाठी विशेष तयारीमध्ये गुंतलेले असतील, ज्यामुळे खर्च देखील जास्त होईल. महिला मित्रामुळे आज व्यवसायात उन्नतीची संधी मिळेल. कार्यक्षेत्रातही अधिकार्‍यांशी असलेल्या संबंधांचा नक्कीच फायदा होईल. एखाद्या सरकारी संस्थेकडून दूरगामी फायद्यासाठी पार्श्वभूमीही तयार होईल. संध्याकाळी संततीकडून एखादी चांगली बातमी येईल. विद्यार्थ्यांना एकाग्रता टिकवावी लागेल, तरच यशस्वी होण्याची अपेक्षा आहे.

धनु
भविष्य मजबूत करण्यासाठी केलेले प्रयत्न आज आयुष्यात शुभता आणतील. नवीन संपर्कामुळे भाग्य प्रबळ होईल. परंतु दररोजच्या कामांकडे दुर्लक्ष करू नका. सरकारी कामांनाही गती मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज अडकलेले पैसे सुद्धा एखाद्या विशेष घटनाक्रमात मिळतील. मन आनंदित होईल. अध्यात्मक आणि धर्मावरील विश्वास वाढेल. समाज सेवेशी संबंधित विद्यार्थ्यांची आज प्रगती होईल. क्षेत्राचा विस्तार होईल.

मकर
आजचा दिवस संमिश्र आहे. वैवाहिक जीवनात सौम्यता असेल. शक्ती वाढल्यामुळे शत्रूंचे मनोबल कमी होताना दिसून येईल. अचानक पाहुण्यांचे आगमन झाल्याने मन आनंदी होईल. परंतु निराशाजनक विचार टाळावे लागतील. भागीदारीच्या कामांमध्ये यश मिळेल. संततीच्या भविष्यासाठी कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांसह भविष्यातील योजनांवर चर्चा कराल. जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि आरोग्याच्या नियमांचे पालन करा. कार्यक्षेत्रात एखाद्या वरिष्ठ अधिकार्‍याशी वाद होऊ नये, यासाठी विशेष काळजी घ्या. कामावर लक्ष केंद्रित करा. अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते.

कुंभ
आज भावंडांसमोर गोंधळ स्थिती निर्माण होईल, चर्चेतून मतभेद दूर होतील. कार्यक्षेत्रात एखादी समस्या निर्माण होईल. जमीन व वाहन खरेदी करण्याचा आज योग आहे. सरकारी कर्मचार्‍यांसाठी बदलीचा योग आहे. ऐहिक सुखांचा आनंद घ्याल. घरगुती वापराची आवडती वस्तू खरेदी करू शकता. बॅक्टेरियाच्या आजारापासून सावध रहा. जुने व्यावसायिक संबंधातून प्रतिभा दर्शविण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधात नावीन्य जाणवेल. कौटुंबिक नात्यांचे व्यवसायात पूर्ण सहकार्य मिळेल.

मीन
आजचा दिवस संततीसंबंधी समस्या सोडवण्यात व्यतीत होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळू शकते. जमीन व निवास संबंधित प्रकरणांत थोडा दिलासा मिळणार आहे. कार्यक्षेत्रात एखाद्या खास संधीने मन प्रसन्न होईल. हवामान बदलाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, यासाठी काळजी घ्या. प्रेमसंबंधात गोडवा राहील. इतरांनाही समजून घेण्याचा प्रयत्न कराल. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी आज अनुकूल वेळ आहे, भाग्याची चांगली साथ मिळेल. जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या.