19 नोव्हेंबर राशिफळ : कर्क शुभ योगात, तर सिंह, मकरसह या 5 राशींसाठी दिवस चांगला

मेष
आजचा दिवस अनेक गोष्टींसाठी अनुकूल आहे. आरोग्य सुधारेल. तंदुरूस्तीचा लाभ घ्याल. प्रवासातून लाभ मिळू शकेल. काही लोक तीर्थयात्रेसाठी जाऊ शकतात, देव दर्शनातून शांती मिळेल आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा घ्याल. घरातील ज्येष्ठांचे आरोग्यही सुधारेल. अनुभवी व्यक्तीकडून कामाचा सल्ला मिळेल, जेणेकरून काम अधिक चांगले करू शकता. नोकरीत बदलीचे योग आहेत. कौटुंबिक जीवन आनंद आणि शांततेने भरलेले असेल. सामान्यपणे आयुष्य व्यतीत कराल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीसाठी काहीतरी विशेष करण्याचा विचार कराल.

वृषभ
आजचा दिवस अपेक्षेपेक्षा किंचित कमजोर असू शकतो. आहाराकडे पूर्ण लक्ष द्या, विशेषत: आरोग्याबद्दल. आवश्यक असल्यास डॉक्टरांकडून औषध घ्या. वैवाहिक जीवनात तणावामुळे थोडे अस्वस्थ दिसाल. कारण त्याचा परिणाम आरोग्यावर तसेच आपल्या कामावर देखील होऊ शकतो. त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला आणि शंका निरसन करा. यामुळे मानसिक तणावाच्या दूर होईल. दिवस प्रवास करण्यास योग्य नाही. पैशाची हानी होऊ शकते. उत्पन्न सामान्य राहील. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. सन्मान वाढेल. वडिलांचा पाठिंबा मिळेल. व्यवसायात अडचण येऊ शकते. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना भेटून आनंदी व्हाल.

मिथुन
आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची आशा आहे. वैवाहिक जीवन सुंदरपणे जगाल. कामात जोडीदाराचा आधार मिळेल. कुटुंबाप्रती असलेली जबाबदारी सुद्धा ते पार पाडतील. नोकरीत चांगले परिणाम मिळतील. आनंदाची बातमी मिळेल. प्रिय व्यक्ती आज खूपच चांगल्या मूडमध्ये दिसेल.

कर्क
आजचा दिवस चांगला आहे. आरोग्याकडे थोडे लक्ष द्या. शुद्ध पाणी पिणे आवश्यक आहे. कारण त्यासंबंधित समस्या होऊ शकतात. आज खर्च वाढेल. अनावश्यक प्रवास होईल, ज्यावर खर्च करावा लागू शकतो. वैवाहिक जीवन थोडे कंटाळवाणे होऊ शकते. कारण जोडीदार नाराज असू शकतो. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीचा मनमानी स्वभाव अस्वस्थ करू शकतो. या सर्व गोष्टींचा परिणाम कामावर होऊ शकतो आणि कामात बरेच प्रयत्न करावे लागू शकतात.

सिंह
आजचा दिवस खुप चांगला आहे. आज लोकांसमोर एखादी कला मांडू शकता. जेणेकरून लोकांना तुमचे कौतूक वाटेल. आणखी काही मार्ग सापडतील ज्यामुळे उत्पन्न वाढू शकते. यामुळे खूप समाधान मिळेल. कौटुंबिक जीवनात मालमत्तेचे विवाद उद्भवू शकतात. त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात वेळ आनंदात घालवू शकता. जोडीदारासमवेत शॉपिंगला जाऊ शकता. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीसोबत बराच वेळ घालवाल. आगामी काळ आणि प्रवासाचे प्लॅनिंग कराल. विरोधकांना घाबरून जाण्याची गरज नाही. तुमचे काहीही बिघडणार नाही. नोकरदारांना चांगले परिणाम मिळतील.

कन्या
आज दिवस तुमच्याकडून खुप काही मागणार आहे. काम आणि प्रमोशनमध्ये संतुलन राखावे लागेल. अन्यथा एक नकारात्मक परिणाम दुसर्‍यावर होऊ शकतो. कामाकडे पूर्ण लक्ष द्या. बॉसच्या समोर चांगले काम करा. कुटुंबातील वडीलधार्‍यांचा आदर करा. त्यांच्याशी संवाद साधा आणि गोष्टी समजून घ्या. कौटुंबिक समस्यांकडे लक्ष द्या. दिवस प्रवासासाठी अनुकूल नाही. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील एखादे जुने कर्ज फेडाल, ज्यामुळे समाधान वाटेल.

तुळ
आजचा दिवस प्रवास करण्यासाठी चांगला आहे. काही नवीन लोकांना भेटाल. नवीन लोकांशी मैत्री करू शकता. जे भविष्यात उपयोगी येतील. कुटुंबाची स्थिती चांगली असेल. कुटुंबाच्या वागण्याने खूप आनंदित व्हाल. शांती मिळेल. चांगले भोजन करण्याची सवय लावून घ्या, तेव्हाच निरोगी रहाल. मानसिकदृष्ट्या बळकट व्हाल. प्रेमसंबंधासाठी शुभेच्छा आहेत. वैवाहिक जीवनात थोडा त्रास राहील, तरीसुद्धा शांती मिळेल. कामात सहकार्‍यांशी चांगले वर्तन करणे आवश्यक आहे. काम उत्तम होईल, ज्यामुळे परिणाम तुमच्या बाजूने असतील.

वृश्चिक
आज सामान्यपणे दिवस घालवाल. कौटुंबिक जीवनात काही गोष्टी ऐकाव्या लागतील. परंतु, वाईट वाटून घेऊ नका, कारण त्यांनी ते मनापासून म्हटलेले नसेल. कामात चांगले परिणाम मिळतील. सहकार्‍यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तब्येत सुधारेल. प्रत्येक काम चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. पैशाच्या बाबतीत दिवस अनुकूल आहे. लव्ह लाइफ सामान्य मार्गाने जाईल. विवाहित जीवनात संघर्ष होऊ शकतो, परंतु तो वाढू देऊ नका.

धनु
आजचा दिवस चांगला आहे. खर्च निश्चितच वाढतील, परंतु तरीही उत्पन्न वाढेल. ज्यामुळे समाधान वाटेल. आर्थिक भार पडणार नाही. प्रवासात सूख मिळेल. आरोग्य बळकट होईल. जुनाट आजारापासून आराम मिळेल. घरचे वातावरण आपल्याला काहीतरी नवीन करण्यासाठी प्रोत्साहित करेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मदतीने अनेक कामे कराल. प्रेमसंबंधात काही समस्या असू शकतात. नोकरीत एखादे नवीन काम वाट पहात आहे.

मकर
आज खूप सावधगिरीने वाटचाल कराल. खर्च नियंत्रित ठेवण्यासाठी आणि उत्पन्नास योग्य दिशा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. ज्यामुळे आगामी काळात काही नवीन योजनांवर काम करण्याची संधी मिळेल. आज एखाद्या खास व्यक्तीची भेट होऊ शकते, जे आपल्याला नवीन काम देऊ शकतात. वैवाहिक जीवनात तणावाचे वातावरण आणखी काही काळ टिकेल. प्रेमसंबंधात संमिश्र परिणाम प्राप्त होतील, परंतु आपल्यातील केमिस्ट्री चांगली राहील. आरोग्यामध्ये सुधारणा होईल. कामात परिपक्वता दिसेल. जबाबदारी वाढू शकते.

कुंभ
आज पैशावर नियंत्रण ठेवण्याची संधी मिळेल. गुंतवणूकीची चांगली संधी मिळू शकते, त्याचा फायदा आर्थिक स्थिती सुधारू शकता. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका. पैशाची योग्य प्रकारे गुंतवणूक करा. कारण अनावश्यक गुंतवणूक केल्यास ते परत मिळण्याची शक्यता कमी होईल. नोकरीत स्थिती तुमच्या बाजूने असेल. बॉसशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. वैवाहिक जीवनात प्रेम असेल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीच्या मूडमध्ये बदल दिसून येईल.

मीन
आज कुटुंबास पूर्ण वेळ द्याल. त्यांच्या सर्व तक्रारी दूर कराल. कुटुंबासमवेत वेळ घालवल्याने हलके वाटेल. घरातील खर्चाकडे लक्ष द्या. प्रेमसंबंधात चांगले अनुभव येतील. प्रिय व्यक्तीची बुद्धीमत्ता पाहून अभिमान वाटेल. वैवाहिक जीवनासाठी दिवस अनुकूल आहे. एखाद्या गोष्टीवरून जोडीदार कटू बोलू शकतो, पण प्रेम कायम राहील. भाग्य प्रबळ राहील, ज्यामुळे कामात यश मिळण्याची शक्यता आहे.