19 ऑक्टोबर राशीफळ : मकर आणि कुंभ राशीसह 5 राशींसाठी सोमवारचा दिवस आहे शानदार

 

मेष
आरोग्यामध्ये चढ-उतार असताना आजचा दिवस तुमच्याकडून जास्त वेळेची मागणी करणारा असेल. एक आदर्श जोडीदार म्हणून तुमचा जोडीदार तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल. प्रेमसंबंधात रोमँटिक असल्याचे दिसून येईल. मालमत्ता संबंधित बाबींवर खर्च होईल. भाग्य प्रबळ असेल, ज्यामुळे कामांमध्ये यशस्वी व्हाल.

वृषभ
आज बोलाल एक आणि करा दुसरेच. कृती आणि बोलण्यातील हे अंतर लोकांना पसंत येणार नाही. यामुळे घरगुती जीवनात थोडा ताण वाढू शकतो. जीवनसाथी मानसिक तणावात असेल. अशा स्थितीत त्यांना तुमच्या आधाराची गरज असेल. प्रेमसंबंधात नात्यातील वाढत्या रागामुळे अस्वस्थ राहाल. प्रिय व्यक्तीला कसे समजावून सांगावे ते समजणार नाही. विरोधकांवर मात कराल. कुटुंबातील स्थिती तणावपूर्ण असेल.

मिथुन
आज कार्यक्षमता आणि बोलण्याचे चातुर्य खुप उपयोग येईल. यातून मोठा फायदा आणि मोठे पद मिळू शकते. नोकरीत अधिक प्रगती कराल. व्यवसायासाठी दिवस खूप फायदेशीर ठरेल. घरगुती जीवन आज आनंदी असेल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीची मित्रांसोबत ओळख करून द्याल. आणि त्यांना आपल्या मनातील सांगाल. कामात मेहनत करावी लागेल.

कर्क
आज भावनिकतेत वाहून गेल्याने खूप अस्वस्थ दिसाल. कुटुंबातील सध्या सुरू असलेला तणाव आपणास मानसिक त्रास देईल, परंतु स्वत: वर विश्वास ठेवून आपण या सर्व आव्हानांवर विजय मिळवू शकता. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस खूप चांगला आहे. मेहनतीचे चांगले फायदे मिळतील. थोडा अशक्तपणा वाटेल. आपणास असे वाटेल की आपले कुणी ऐकत नाही. वैयक्तिक आयुष्याबद्दल स्थिती फारशी चांगली नाही, म्हणूनच आज शांत राहणे चांगले.

सिंह
कौटुंबिक चिंता खूप त्रासदायक ठरतील. आईची तब्येत बिघडू शकते. कुटुंबात खूप गडबड होऊ शकते. आजचा दिवस शांततेत घालवणे योग्य ठरेल. कामात स्थिती चांगली आहे. कामाकडे पूर्ण लक्ष द्या. वैयक्तिक आयुष्यात जास्त विचार करू नका. शांततेत घालवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधात आज साखरपुडा निश्चित करू शकता. आज काही गुप्त मार्गाने पैसे येऊ शकतात.

कन्या
मनात अनेक गोष्टी आहेत ज्याकडे आज लक्ष केंद्रित केले पाहिजे. आज कौटुंबिक जीवन बरेच काही सांगू शकते. भावंडांकडून निराशा होईल. खर्च जास्ती होईल, पण घरातील वडीलधारी माणसं आशीर्वाद देतील. वैयक्तिक आयुष्यात काही अडचणी येतील. जोडीदाराशी भांडण होऊ शकते. प्रेमसंबंधात जास्त बोलू नका. कामात स्थिती चांगली आहे. मेहनत घेतल्यास चांगले परिणाम मिळतील.

तुळ
आज एखाद्या गोष्टीवरून जरा अजब मूडमध्ये दिसाल. कौटुंबिक आणि स्वतःचे आरोग्य चिंतेचा मुद्दा असू शकतो. कुटूंबाच्या गरजा भागविताना नाखूष होऊ शकता, कारण तुमच्यासमोर एक मोठा विवाद येऊ शकतो. उत्पन्न वाढेल आणि कामात चांगले परिणाम मिळतील. जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून संघर्ष करणे हानिकारक ठरेल, म्हणून सावधगिरी बाळगा.

वृश्चिक
आज स्वत: खूप दबावाखाली असल्याचे जाणवेल. ग्रहांची स्थिती अशी आहे की आज आपण खूप निराश व्हाल, परंतु दुपारनंतर परिस्थिती हळूहळू सुधारेल. कामासाठी प्रवास करावा लागेल. परदेशात जाण्याचीही शक्यता दिसत आहे. बुद्धिमत्ता आणि तीक्ष्ण मन विरोधकांवर भारी ठरेल. घरात पूजापाठ होण्याची शक्यता असेल. एखाद्या शुभ कार्यास प्रारंभ होऊ शकतो.

धनु
आज आरोग्याच्या बाबतीत चांगला दिवस असेल, परंतु सर्दी किंवा डोकेदुखीसारखी छोटी समस्या दिवस खराब करू शकते, म्हणून सावधगिरी बाळगा. उत्पन्नासंदर्भात स्थिती खुप मजबूत होईल. कुठूनतरी पैसे मिळू शकतात. कामासंदर्भात खूप चांगले निकाल मिळतील. चांगल्या आणि प्रभावशाली व्यक्तींमध्ये उठ-बस होईल. वैयक्तिक आयुष्याशी संबंधित स्थिती देखील तुमच्या बाजूने दिसेल. वैयक्तिक जीवनाबद्दल एक मोठे स्वप्न पहाल. आपण घरी काहीतरी नवीन खरेदी करू शकता.

मकर
आज कारकीर्दीसंदर्भात चढ-उतार असतील. खूप दबावही असेल. अशा स्थितीत डेडलाईनवर काम करणे आव्हान असेल. एखादी कौटुंबिक चिंता कामात अडथळा आणेल. ती टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. विवाहित लोकांचे जीवन काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा देईल. जोडीदाराचा सल्ला घेत काम केल्याने फायदा होईल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीच्या वागण्याने दु: खी होऊ शकता.

कुंभ
विवाहित लोकांचे घरगुती जीवन काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा देईल. जोडीदाराचा सल्ला घेत काम केल्याने फायदा होईल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीच्या वागण्याने दु:खी होऊ शकता. आज करिअरमध्ये चढ-उतार जाणवतील. एखाद्या गोष्टीचा दबाव असल्याचे जाणवेल. अशावेळी वेळेत काम पूर्ण करण्याची जबाबदारी मोठी असेल. कौटुंबिक चिंता कामात अडथळा ठरतील. अशा चिंता टाळा.

मीन
बिझनेससाठी आज एखादी डिल फायनल होऊ शकते. ज्यातून तुम्हाला मोठा नफा होईल. कामाच्या निमित्ताने प्रवासालाही जावे लागेल. लांबचा प्रवास असेल, ज्यामुळे खूप कंटाळा येईल, म्हणून आरोग्याचीही काळजी घ्या. जिथे काम करता तिथे आज मन कमी लागेल. घराकडे लक्ष लागेल. वडिलांना आरोग्याचा त्रास होऊ शकतो. घरातील वातावरण जास्त चांगले असणार नाही.