1 ऑगस्ट राशिफळ : महिन्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल, जाणून घ्या

मेष
आजचा दिवस सामान्य फलदायी आहे. कामात चढ-उतार येतील. पण भाग्याची साथ मिळाल्याने अनेक कामे मेहनत न करताच पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात एखादी चिंता जाणवेल. थोडासा तणाव असू शकतो. प्रेमसंबंधात आजच्या दिवसाचा आनंद घ्याल. कामासाठी चांगला दिवस आहे. अति आत्मविश्वास टाळा.

वृषभ
आजचा दिवस फलदायी आहे. पूजाअर्चेत मन लागेल. पैशाच्या बाबतीत चिंता राहील. वैवाहिक जीवन सुखी राहील. नात्यात परस्पर प्रेम असेल. प्रेमसंबंधात थोडीशी निराशा वाटू शकते. कामासाठी दीनमान ठीक आहे. प्रवास करणे टाळा.

मिथुन
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कामात यश मिळेल. मनोबल उंचावेल. आरोग्यात चढ-उतार होईल. कुटुंबात एखादा तणाव राहील. वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमसंबंधासाठी दिनमान चांगले आहे. काही खर्च होतील.

कर्क
आजचा दिवस सामान्य आहे. खर्चात होणारी वाढ तुम्हाला थोडी चिंताग्रस्त करेल. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. विनाकारण काळजी करू नका. कामासाठी दिनमान चांगले आहे. प्रयत्नांना यश मिळेल. वैवाहिक जीवनात चढ-उतार येतील. प्रेमसंबंधात आजच्या दिवसा फायदा घ्याल आणि कुठेतरी फिरायला जाण्याचा प्रयत्न कराल.

सिंह
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आरोग्य थोडे कमजोर होऊ शकते. ज्यामुळे कामात मन कमी लागेल, तरीही कामाबाबत परिस्थिती चांगली असेल. उत्पन्न वाढेल, ज्यामुळे आनंदी वाटेल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. जोडीदाराची तब्येत बिघडू शकते. प्रेमसंबंधासाठी दिनमान चांगले आहे. प्रिय व्यक्तीची आपल्या मित्रांशी भेट घडवू शकता.

कन्या
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबातील एखाद्या गोष्टीवरून भांडणाची स्थिती राहील. यामुळे वाद वाढू शकतो म्हणून काळजी घ्या. कामात खूप व्यस्त असाल आणि वेळ कधी निघून जाईल समजणार नाही. भाग्यामुळे काही कामे होतील, यामुळे समाधान वाटेल. वैवाहिक जीवन चांगले राहील. प्रेमसंबंधात एखादी निराशा जाणवू शकते.

तुळ
आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी आहे. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो, परंतु सावधगिरी बाळगा, कोणत्याही प्रकारची चूक होऊ देऊ नका. तब्येत ठीक राहील. कामासाठी दिनमान चांगले आहे. परंतु विरोधकांपासून सावध रहा. वैवाहिक जीवन चांगले राहील. प्रेमसंबंधात आजच्या दिवसाचा आनंद घ्या.

वृश्चिक
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सर्वात चांगली गोष्ट अशी की आज तुम्हाला पैसे मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्ही आनंदी व्हाल. आज नवनवीन पदार्थ खाण्याची संधी मिळू शकते. मित्रांशी चर्चा होईल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. जोडीदारासोबत सासरी जाण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधात हक्क दाखवण्याचा प्रयत्न कराल.

धनु
आजचा दिवस खूप चांगला आहे. कामासाठी दिनमान मजबूत आहे, म्हणून जे काम करायचे आहे त्यामध्ये यशस्वी व्हाल. वैवाहिक जीवन चांगले राहील. नात्यात प्रेम आणि रोमान्स वाढेल. प्रेमसंबंधात देखील आजच्या दिवसाचा आनंद घ्याल आणि आपल्या प्रिय व्यक्तीसोबत भरपूर गप्पा माराल.

मकर
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. खर्च वेगाने वाढतील, ज्यामुळे चिंता वाढेल. घरगुती जीवनात काही तणाव राहील, ज्यामुळे कामात लक्ष कमी लागेल. प्रेमसंबंधासाठी दिनमान चांगले आहे. प्रिय व्यक्तीबरोबरचे नाते अधिक मजबूत होईल. विरोधकांपासून सावध रहा. कामासाठी दिनमान सामान्य आहे.

कुंभ
आजचा दिवस चांगला आहे. उत्पन्न वेगाने वाढेल, ज्यामुळे आर्थिक समाधानासह मानसिक समाधान मिळेल. कामासाठी दिनमान चांगले आहे. प्रयत्न यशस्वी होतील. मेहनतीला यश मिळेल. वैवाहिक जीवन चांगले राहील. जोडीदार काही महत्वाची गोष्टी बोलू शकतो. प्रेमसंबंधात दिवस आनंदाने घालवाल.

मीन
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कामात व्यस्त रहाल, ज्यामुळं बरीच एनर्जी खर्च होईल, त्यामुळे थकवा जाणवेल. कुटुंबात एखादी चर्चा होऊ शकते. एखाद्या वृद्ध व्यक्तीचे आरोग्य कमजोर होऊ शकते. वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमसंबंधात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.