2 ऑगस्ट राशीफळ : सर्व राशींसाठी कसा असेल रविवारचा दिवस, जाणून घ्या तुमची ‘रास’

पोलीसनामा ऑनलाइन : –

मेष
आजचा दिवस उत्तम आहे. कामात यश मिळाल्याने मन आनंदित होईल. कुटुंबाचा विचार कराल आणि गरजा भागवाल. कुटुंबात आदर मिळेल. मानसिक तणावातून मुक्ती मिळेल. आरोग्यात चढ-उतार होईल. वैवाहिक जीवन आनंदाने भरून जाईल. प्रेमसंबंधासाठी दिनमान सामान्य आहे.

वृषभ
आजचा दिवस चांगला आहे. भाग्य मजबूत राहील, ज्यामुळे कामात यश मिळले. आत्मशक्ती मजबूत होईल. धैर्य वाढेल आणि कामात जोखीम घेऊन पुढे जाल. उत्पन्नही वाढेल. कुटुंबात आनंद राहील. सुग्रास जेवणाचा आनंद घ्याल. वैवाहिक जीवनात चांगले राहील. प्रेमसंबंधात प्रेम कायम राहील.

मिथुन
आजचा दिवस चढ-उतारांचा आहे. खर्च अचानक वाढेल. आरोग्यात चढ-उतार होईल. सावधगिरी बाळगली पाहिजे. खाण्याकडे थोडे लक्ष द्या. वैवाहिक जीवन ठीक राहील. प्रेमसंबंधासाठी दिनमान चांगले आहे. कामात चांगले परिणाम मिळतील. तुमची पकड मजबूत राहील.

कर्क
आजचा दिवस सामान्य आहे. दिवसाच्या सुरुवातीला थोडा तणाव जाणवेल. परंतु दुपारपर्यंत स्थिती चांगली होईल. आरोग्यात किंचित चढउतार होऊ शकतो. जोडीदाराबद्दल थोडी निराशा असू शकते. प्रेमसेबंधासाठी दिवस चांगला आहे. दूरच्या प्रवासाला जाऊ शकता. कामासाठी दिनमान चांगले आहे.

सिंह
आजचा दिवस चढ-उतारांचा आहे. संध्याकाळपर्यंत खर्चामध्ये भर पडेल, जी तुम्हाला त्रास देऊ शकते, परंतु धीर धरा. कोणाशी भांडण करू नका. वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रेमसंबंधात दिलासा मिळेल. एकमेकांशी संभाषण होईल. दीर्घकाळ थांबलेली चर्चा सुर होईल. मन आनंदित होईल. कामासाठी दिनमान चांगले आहे.

कन्या
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबाच्या चिंता दूर करण्याचा आणि आरोग्य बिघडलेल्या ज्येष्ठांची काळजी घेण्याचा प्रयत्न करा. मुलांविषयी थोडी काळजी करावी लागेल, परंतु त्यांना त्यांचे काम करु द्या. प्रेमसंबंधासाठी दिवस सामान्य आहे. वैवाहिक जीवनात तणावाचा बळी पडू नका. कामासाठी दिनमान चांगले आहे. कामात पूर्ण लक्ष द्यावे लागेल.

तुळ
आजचा दिवस सामान्य फलदायी आहे. भावंडांसोबत वेळ घालविल्यानंतर, कुटुंबातील गरजा समजतील. जबाबदारी पार पाडाल. आज, बहुतेक वेळ कुटुंबासमवेत घालवाल. आरोग्य चांगले राहील. कामात अंशतः यश मिळेल. भाग्य ठीक राहील्याने, काम होईल. उत्पन्न ठीक होईल. वैवाहिक जीवनात अडचणी येतील. प्रेमात सुखद बातम्या मिळतील.

वृश्चिक
आजचा दिवस सामान्य आहे. प्रवासात विलंब होईल. अनेक दिवसांपासून काही मित्रांना न भेटल्यामुळे आज भेटाल, मन हलके होईल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. कुटुंबात पूजा होईल. प्रेमसंबंधात थोडा ताणतणाव राहील. प्रिय व्यक्तीच्या मनःस्थितीची काळजी घ्या. कामासाठी उत्तम दिवस आहे.

धनु
आजचा दिवस सामान्य आहे. कुटुंबात काही अडचणी येऊ शकतात, ज्यामुळे थोडा त्रास होईल. परंतु प्रयत्न केल्यास तो दूर होईल. समस्या दूर होतील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. नात्यातही रोमान्स असेल आणि आकर्षणाची भावनाही वाढेल. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस चांगला आहे. आपला मुद्दा पटवून देण्यात यशस्वी व्हाल. कामासाठी दिनमान मजबूत आहे.

मकर
आजचा दिवस चांगला आहे. मानसिक ताण असेल. परंतु तरीही स्वतःबद्दल विचार करा. चुकांबद्दलही विचार करा. वैवाहिक जीवनात एखादा तणाव असेल. परंतु आपण तो सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधात काळ सामान्य असेल. प्रिय व्यक्तीकडे आपल्या आर्थिक स्थितीबद्दल काही गुपिते उघड कराल.

कुंभ
आजचा दिवस सामान्य आहे, आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिक ताणपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. काही अनावश्यक खर्च होतील. आरोग्यावर देखील खर्च होईल. आवश्यक औषधे आणा आणि कोणतीही बेपर्वाई करू नका. वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमसंबंधात प्रेम आणि रोमान्स असेल. कामात चांगले परिणाम मिळतील. उत्पन्न ठीक होईल.

मीन
आजचा दिवस चांगला आहे. उत्पन्न वाढेल. मानसिक ताण कमी होईल. आरोग्य चांगले राहील. दिवसाची सुरुवात एका उद्दीष्टाने कराल. आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल. कामासाठी दिनमान सामान्य आहे. प्रेमसंबंध चांगले राहतील. वैवाहिक जीवनात एखादा तणाव असू शकतो.