20 फेब्रुवारी राशीफळ : महाशिवरात्रीपूर्वी ‘या’ 5 राशींचा होणार ‘भाग्योदय’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी खुपच चांगला आहे. दिवसाची सुरूवातच चांगल्या फायद्याने होणार आहे. भाग्याची साथ असल्याने एखादे चांगले काम हातात येऊ शकते, ज्यातून चांगला धनलाभ होऊ शकतो. कुटुंबातील ज्येष्ठांमधील कुणाचीतरी प्रकृती बिघडू शकते. प्रेमसंबंधात दिनमान खुप चांगले आहे. विवाहितांच्या जीवनात थोडा तणाव राहू शकतो. कामानिमित्त मेहनत करावी लागेल. दुपारनंतर स्थिती बदलेल. कामाचे कौतुक होईल.

वृषभ
आजचा दिवस दूपारपर्यंत कमजोर आहे. मानसिक तणाव राहिल. कामामध्ये अडथळे येतील, परंतु दुपारनंतर स्थिती बदलेल आणि तुमचे भाग्य प्रबळ होईल, ज्यामुळे चांगले परिणाम दिसून येतील. दूरच्या प्रवासात लाभ मिळेल. दूरचा प्रवास भाग्य वाढवेल. व्यापारात लाभ होईल. आरोग्यही चांगले राहिल. विवाहितांच्या जीवनात तणाव राहू शकतो. प्रेमसंबंधात चांगले परिणाम दिसून येतील.

मिथुन
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. वैवाहिक जीवनात तणावापासून मुक्ती मिळेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. कामात खुप चांगले परिणाम दिसून येतील. परंतु, दुपारनंतर मानसिक तणाव वाढेल. पैशाची चणचण भासू शकते. आरोग्य थोडे कमजोर राहिल. प्रेमसंबंधात आजचा दिवस सामान्य आहे. भाग्याची साथ थोडी कमी राहिल.

कर्क
तुमच्यासाठी आजचा दिवस चढ-उताराचा राहिल. दुपारपर्यंत स्थिती बिकट राहू शकते. तुमचे आरोग्यही बिघडू शकते. खर्च वाढले. कुणाशी तरी वादविवाद होऊ शकतो. परंतु, दुपारनंतर वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. जोडीदाराबद्दल तुमचे विचार चांगले होतील. प्रकृतीतही सुधारणा होईल. कामात चांगले परिणाम दिसून येतील आणि मेहनतीचे फळ मिळेल. प्रेमसंबंधात दिवस बरा आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि एखाद्या प्रवासाठी प्रिय व्यक्तीसोबत जाऊ शकता.

सिंह
आजच्या दिवसाची सुरूवात खुप चांगली होईल. संततीचे सहकार्य मिळेल. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यासात लक्ष लागेल. जर तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर प्रेमसंबधात आजचा दिवस खुप चांगला आहे. तुमचे प्रेम वाढेल. कामासाठी आजचा दिवस थोडा कमजोर आहे. कारण तुमचे मन दुसरीकडे लागलेले असेल. मन न लागल्याने कामात अडचणी येऊ शकतात. दुपारनंतर स्थिती बदलेल. दुपारनंतर जोडीदाराची संबंध चांगले ठेवा.

कन्या
तुमचा आजचा दिवस दुपारपर्यंत खुप चांगला आहे. त्यानंतर अडचणी येऊ शकतात. कुटुंबातील लोकांचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठांचे आरोग्य बिघडेल. तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळेल. कामात चांगले परिणाम मिळतील. दुपारनंतर एखाद्या अनावश्यक भितीमुळे मन त्रस्त राहिल. तुमचा मानसिक तणाव वाढेल. प्रेमसंबधात आजचा दिवस अनुकूल नाही, वाद होऊ शकतो. जे विवाहित आहेत, त्यांना सुख मिळेल. कामात खुप मेहनत करावी लागेल.

तुळ
आजचा दिवस आव्हानांचा असेल. दुपारपर्यंत एखाद्या प्रवासाचा योग आहे. हा प्रवास तुमच्यासाठी अनुकूल ठरणार नाही, यामुळे सावधानता बाळगा. आरोग्य कमजोर राहू शकते. कुटुंबातील छोट्यांसोबतचे संबंध बिघडू शकतात. परंतु, दुपारनंतर स्थितीत थोडा बदल होईल. कुटुंबाकडे लक्ष द्या. घरगुती खर्च वाढेल. कुटुंबात आईशी तुमच्या संबंधाबाबत आजचा दिवस विशेष महत्वपूर्ण आहे. तिचे आरोग्य बिघडू शकते. लक्ष द्या. प्रेमसंबंधात आजचा दिवस ठिक आहे. वैवाहिक जीवन चांगले करण्यासाठी प्रयत्न करा.

वृश्चिक
आज कुटुंबातील लोकांमध्ये एकजुट कमी दिसून येईल आणि यामुळे अशांततेचा सामना करावा लागेल. दुपारनंतर तुम्हाला एखादा प्रवास करावा लागेल. हा प्रवास खास उद्देशासाठी असेल, यासाठी विचारपूर्वक पूर्ण तयारी करून जा. कामात आजचा दिवस खुप चांगला आहे. तुमचे पूर्ण लक्ष कामावर असेल. यामुळे कामात चांगले परिणाम दिसून येतील. प्रेमसंबधात दिवस खुप चांगला आहे. रोमान्स वाढले. वैवाहिक जीवनात आजचा दिवस चांगला आहे. जोडीदार खुश राहिल, ज्यामुळे तुमचाही आनंद वाढेल.

धनु
आजचा दिवस काहीतरी नवीन करण्यास सांगत आहे. यासाठी तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रीत करा आणि प्रकृतीकडेही लक्ष द्या. आज तुम्ही आजारी पडू शकता. दुपारनंतर आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. कुणालाही वाईट बोलू नका. कुटुंबातील वातावरण खुप चांगले राहिल. प्रिय व्यक्ती मनातील गोष्ट बोलून दाखवेल आणि राग सुद्धा व्यक्त करू शकते. कामात सोबतच्या व्यक्तींशी चांगले संबंध ठेवा, फायदा होईल. वैवाहिक जीवनात तणाव राहिल.|

मकर
तुमच्यासाठी आजचा दिवस खर्च वाढवणारा आहे. यामुळे मानसिक तणाव वाढेल. दुपारनंतर स्थिती बदलेल आणि खर्च कमी होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मानसिक तणाव राहिल परंतु, कामात चांगले परिणाम दिसून येतील. कामासाठी एखादा प्रवास करू शकता. जवळच्या व्यक्तीकडून चांगला लाभ मिळू शकतो. कुटुंबातील वातावरण ठिक राहिल. प्रेमसंबधात दिवस सामान्य आहे.

कुंभ
तुमचे उत्पन्न वाढेल, यामुळे आनंद होऊ शकता. परंतु, दुपारनंतर खर्च वाढतील. उत्पन्न कमी होईल, मानसिक तणाव जाणवेल. यामुळे खर्चावर लक्ष देणे तुमच्यासाठी चांगले राहिल. एखादा फायद्याचा सौदा होईल. प्रेमसंबंधात आजचा दिवस चढ-उताराचा आहे. दाम्पत्य जीवनात स्थिती तुमच्याबाजून राहिल आणि नाते चांगले राहिल. कामात चांगले परिणाम दिसून येतील.

मीन
कामात आज जास्त मेहनत करावी लागेल. तुमचे पूर्ण लक्ष कामावर लावले तर चांगले परिणाम दिसून येतील. कुटुंबातील वातावरण तुमच्याकडे खेचून घ्याल. खर्चही होईल. दुपारनंतर उत्पन्न वाढेल, मन आनंदी होईल. आरोग्य चांगले राहिल. दाम्पत्य जीवनात प्रेम कायम राहिल. प्रेमसंबंधात चढ-उताराची स्थिती राहिल.