20 जानेवारी राशिफळ : वृषभ, मिथुन व तुळ राशीवाल्यांसाठी दिवस शुभ, इतरांसाठी असा आहे बुधवार

मेष
आज ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने आहे, यामुळे कामांमध्ये यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या, आजारी पडू शकता. प्रेमसंबंध चांगले असतील आणि प्रिय व्यक्तीबरोबर चांगला वेळ घालवाल. दाम्पत्य जीवनात जवळीक वाढेल आणि जोडीदार तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेल. कौटुंबिक जीवनात आनंद होईल. आज तुम्हाला असे वाटेल की वडीलधार्‍यांचा आशीर्वाद तुमच्या उपयोगी आला आहे.

वृषभ
आजचा दिवस मध्यम लाभदायक आहे. ग्रहांची स्थिती सूचित करते की आज थोडी काळजी घ्यावी लागेल. कारण उत्पन्नात थोडी घसरण होऊ शकते, म्हणून पैशाचा योग्य वापर करा. कामात चांगले परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दाम्पत्य जीवन चांगले असेल. प्रेमसंबंधात आजचा दिवस थोडा आव्हानात्मक असेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे हानिकारक ठरू शकते.

मिथुन
आजचा दिवस सामान्य आहे. वैवाहिक जीवनात तणाव असूनही प्रेमाचे दोन गोड शब्द देखील असतील. नात्यात जवळीक वाढेल. प्रेमसंबंधासाठी दिवस उत्तम आहे. कार्यक्षेत्रात अनेकांच्या प्रयत्नातून तुम्ही एखादे चांगले कार्य कराल, ज्यामुळे प्रशंसा होईल. व्यापारासाठी दिवस खूप चांगला आहे. आरोग्य कमजोर होऊ शकते. विरोधकांवर मात कराल. मानसिक ताण जाणवेल.

कर्क
आजचा दिवस मध्यम आहे. कामात विलंब होईल. कुणालाही असे काही वाईट बोलू नका, ज्यामुळे त्यांचे मन दुखावेल, आणि आपलीच माणसं आपल्याशी शत्रूसारखी वागतील. भाग्य कमजोर राहील. प्रत्येक कामात यशस्वी होण्यासाठी मेहनत करावी लागेल. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे. आरोग्य देखील थोडे कमजोर होऊ शकते. कामात मन कमी लागेल आणि लवकरच घरी परत याल.

सिंह
आजचा दिवस अनुकूल आहे. उत्पन्न वाढेल आणि खर्च कमी होईल. सुख-सुविधांमध्ये दिवस घालवाल. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल. कुटुंबातील ज्येष्ठांचे आरोग्य बिघडू शकते. इच्छापूर्ती होईल. कामात बरेच काही शिकण्याचे बाकी आहे. कौशल्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा.

कन्या
आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. कामाच्या ठिकाणी खूप अनुकूलता असेल. रोमँटिक मूडमध्ये असाल आणि कामात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर फिरायला किंवा चित्रपट पाहायला जाऊ शकता. कार्यक्षेत्रात चांगले काम कराल. कौटुंबिक जीवनात अडचणी येतील, आई-वडीलांची तब्येत बिघडू शकते. प्रॉपर्टीच्या वादाबाबत सावधगिरी बाळगा. कोणालाही वैयक्तिक गोष्टी सांगू नका.

तुळ
आजचा दिवस मध्यम फलदायक आहे. छोट्या-छोट्या प्रवासातून नवीन संबंध तयार करण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. मित्र आणि नातेवाईकांशी संबंध वाढतील. सोबत काम करणार्‍या लोकांशी चांगले वागणे तुम्हाला कार्यक्षेत्रात यश देईल. प्रेमसंबंधात दिवस संमिश्र परिणाम देईल. दाम्पत्य जीवनात जोडीदाराला शारीरिक समस्या त्रास देऊ शकते. जोडीदार तुमच्या लाभाचे माध्यम बनू शकतो.

वृश्चिक
ग्रह सूचित करतात की आज दिवस चांगला आहे. चांगला धनलाभ होण्याचा योग आहे. सासरच्या लोकांकडून शुभ माहिती मिळेल ज्यामुळे मन आनंदित होईल. रागावर नियंत्रण ठेवल्यास, यश नक्की मिळेल. कार्यक्षेत्रात स्थिती तुमच्या बाजूने असेल. कुटुंबातील लहानांकडून सूख मिळेल. दाम्पत्य जीवनासाठी दिवस अनुकूल आहे. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्ती आपल्या मनातील गोष्ट तुमच्या समोर ठवेल आणि नाते सुंदर होईल.

धनु
आजचा दिवस धावपळीचा आहे. या धावपळीपासून दूर राहिलात तर कामांना विलंब होईल. खर्च होईल, पण उत्पन्नही वाढेल. आरोग्य कमजोर होऊ शकते. मानसिक ताणातून मुक्ती मिळण्याची वेळ आली आहे. अपघात होण्याची शक्यता असल्याने काळजीपूर्वक वाहन चालवा. दाम्पत्य जीवनात स्थिती सुधारेल. एकमेकांच्या जवळ याल. कौटुंबिक जीवन चांगले राहील. प्रेमसंबंधात तणाव असू शकतो. भांडण टाळण्याचा प्रयत्न करा.

मकर
आजचा दिवस मध्यम फलदायक आहे, कारण मानसिकदृष्ट्या तणावात राहाल. खर्चही जास्त होईल आणि उत्पन्न किंचित कमी असेल. जसजसा दिवस पुढे सरकेल, स्थिती सुधारू लागेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, स्वत:ची काळजी घ्या. प्रॉपर्टीच्या बाबतीत फायदा होईल. कामात स्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने असेल. वैवाहिक जीवनाची स्थिती प्रेमपूर्ण राहील. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीला भेटण्याची उत्कंठा असेल.

कुंभ
आजचा दिवस उत्तम आहे. कामात प्रभाव असेल आणि बॉसशी संबंध सुधारतील. चांगले उत्पन्न होईल. व्यापारासाठी केलेला प्रवास यश देईल, लाभ मिळेल. प्रेमसंबंधात लकी ठराल, भरपूर प्रेम मिळेल. दाम्पत्य जीवनात जोडीदाराकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात एखाद्या गोष्टीवरून वाद होईल.

मीन
आजचा दिवस थोडा आव्हानात्मक आहे. बुद्धिमत्ता उपयोगी येईल. पैशाच्या बाबतीत दिवस उत्तम आहे. वडिलांची तब्येत बिघडू शकते. पण तुमच्या तब्येतीत सुधारणा होईल. कौटुंबिक जीवनात अनुकूल काळ राहील. प्रेमसंबंधात प्रेमाचा दिवस असेल. प्रिय व्यक्तीची पूर्ण साथ मिळेल. दाम्पत्य जीवनात तणावाचा सामना करावा लागेल, कारण जोडीदार तुमच्यावर नाराज राहील.