20 जून राशीफळ : ‘या’ 4 राशींसाठी शनिवारचा दिवस आहे ‘खास’, धन-व्यापारात होईल ‘वाढ’

पोलीसनामा ऑनलाइन

मेष
आजचा दिवस चांगला आहे, मूड खुप चांगला राहील. कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवाल. चांगले खाणे-पिणे मिळेल. बाहेरून अन्न मागवू शकता. मित्रांशी चर्चा कराल. तुमचा मोबाइल किंवा लॅपटॉप बिघडू शकतो. कामात चांगले परिणाम मिळेल. वैवाहिक जीवन चांगले राहील. जोडीदार राग दर्शवू शकतो. प्रेमसंबंधासाठी दिवस सामान्य आहे.

वृषभ
आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून तणाव राहू शकतो. कामात खूप चांगले परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनात प्रेम आणि रोमान्स राहील. जोडीदाराची पूर्ण काळजी घ्याल. प्रेमसंबंधात आजचा दिवस आनंद राहील.

मिथुन
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आरोग्यात चढ-उतार राहील. थोडा मानसिक तणाव राहील, याचा परिणाम कौटुंबिक जीवनात होईल. तणाव राहू शकतो. प्रेमसंबंधात आनंद राहील. प्रिय व्यक्ती तुमच्या वागण्याबद्दल काही तक्रार करू शकते. कामात चांगले परिणाम मिळतील.

कर्क
आजचा दिवस फलदायी आहे. उत्पन्न चांगले होईल. खर्चही जास्त होईल, तरीही मानसिक ताणाव राहाणार नाही. दिवस चांगला जाईल. कामात खूप चांगले परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा वाढले. जोडीदाराबरोबर कुठेतरी जाण्याची योजना आखू शकता. प्रेमसंबंधात रोमान्स राहील. एकमेकांशी प्रेमाने बोलाल.

सिंह
आजचा दिवस सामान्य फलदायी आहे. आरोग्यात चढ-उतार होईल. चिंतामुक्त रहाल. कामात चांगले परिणाम मिळतील. कुटुंबातही आनंद राहील. वैवाहिक जीवन तणावपूर्ण राहू शकते. जोडीदाराचे चुकीचे शब्द तुम्हाला दुखवू शकतात. प्रेमसंबंधात तणाव राहील.

कन्या
आजचा दिवस उत्तम आहे. कामावर पूर्ण लक्ष केंद्रीत कराल. कुटुंबाची जबाबदारी देखील समजून घ्याल. घराबाहेर जास्त वेळ घालवाल, आरोग्य बिघडू शकते. भाग्य मजबूत राहील. कामात यश मिळेल. वैवाहिक जीवनात थोडा तणाव राहील. प्रेमसंबंधात आनंद मिळेल, प्रिय व्यक्तीशी अनेक तास चर्चा कराल.

तुळ
आजचा दिवस फलदायी आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. उलट-सुलट खाल्ल्याने आजारी पडू शकता. विरोधकांवर मात कराल. कामात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनात आव्हाने येतील. जोडीदार राग व्यक्त करून तुम्हाला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करेल. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस आनंदाचा आहे.

वृश्चिक
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मानसिकदृष्ट्या बळकट राहाल. चिंतामुक्त व्हाल आणि जीवनाचा आनंद घ्याल. वैवाहिक जीवनात प्रेम आणि रोमान्स कायम राहील. प्रेम संबंधात एखाद्या तणावाचा सामना करावा लागू शकतो. बँकेचे ईएमआय फेडण्यात यश येईल. आरोग्यात चढ-उतार राहील. सासरच्यांशी संबंध बिघडू शकतात. कामासाठी दिवस सामान्य आहे.

धनु
आजचा दिवस सामान्य फलदायी आहे. अनावश्यक खर्च टाळा, अन्यथा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मानसिक स्थिती ठीक राहील. वैवाहिक जीवनात थोडा ताण राहील. प्रेमसंबंधात आनंदी परिणाम मिळतील. कामात दिवस चांगला जाईल. पैशांची आवक चांगली होईल.

मकर
आजचा दिवस फलदायी आहे. प्रेमसंबंधात जीवन सुंदर बनविण्यासाठी सर्व प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनात जोडीदारावर प्रेम कराल. प्रेमसंबंधात आनंद राहील. विरोधकांपासून सावध रहा. आरोग्यात चढ-उतार राहील. कामासाठी दिवस चांगला आहे.

कुंभ
आजचा दिवस उत्तम आहे. खूप आनंदी रहाल. मनात समाधानाची भावना राहील. कामात खूप चांगले परिणाम मिळतील. पैशांची आवक होईल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. उत्पन्न वाढेल. वैवाहिक जीवन ठीक राहील. प्रेमात संबंधासाठी दिवस चांगला आहे.

मीन
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. एखाद्या गोष्टीवरून खूप जिद्दी किंवा राग दर्शवू शकता. मात्र, त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कामासाठी दिवस सामान्य आहे. आज थोडे आळशी होऊ शकता. वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमात आनंददायी परिणाम मिळतील. कामानिमित्त प्रवास करू शकता.