21 फेब्रुवारी राशिफळ : मिथुन

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मिथुन – आजचा दिवस तुमच्यासाठी सावधगिरी बाळगण्याचा आहे. व्यापारात आज तुमच्या हाती एक असे काम येईल, जे तुम्ही जर योग्य पद्धतीने मार्गी लावले तर तुम्हाला खुप फायदा होईल. परंतु, यादरम्यान भागीदाराशी वाद होऊ शकतो. यासाठी विचारपूर्वक कामात हात टाका. नोकरी करणार्‍यांसाठी दिवस अनुकूल आहे. विरोधकांवर मात कराल. कोर्ट, कचेरीच्या प्रकरणात यश मिळेल. प्रेमसंबंधात दिवस चांगला आहे, प्रिय व्यक्तीसोबत फिरण्यासाठी जाऊ शकता. आरोग्य सामान्य राहिल.