21 फेब्रुवारी राशिफळ : ‘या’ 7 राशींवर भगवान शंकराची ‘कृपा’,जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मेष – आजचा दिवस खुप वेळानंतर चांगला जाईल. भाग्याची साथ मिळेल आणि एखाद्या विशेष कामात आईकडून मदत मिळेल, ज्यामुळे मोठा लाभ होऊ शकतो. यामुळे आनंद वाढेल. प्रवासाचा योग असला तरी प्रवासात काही त्रास होऊ शकतो. तरीसुद्धा या प्रवासामुळे लाभ होऊ शकतो. प्रेमसंबंधात आनंद राहिल आणि दाम्पत्य जीवनात चांगले परिणाम दिसून येतील. कामात स्थलांतर होऊ शकते. आरोग्य सामान्य राहिल.

वृषभ
तुमच्यासाठी आजचा दिवस थोडा कमजोर आहे. विशेष करून मानसिक त्रास राहिल आणि शारीरीक त्रास सुद्धा होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या, खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. दिनचर्यचे पालन करा. पैशाच्या बाबतीत गुंतवणूक करण्यासाठी दिवस चांगला नाही. दाम्पत्य जीवनात स्थिती अनुकूल नाही, परंतु कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रात चढ-उतार राहिल. तरीसुद्धा चांगले परिणाम दिसून येतील. प्रेमसंबंधात आजचा दिवस अनुकूल आहे.

मिथुन
आजचा दिवस तुमच्यासाठी सावधगिरी बाळगण्याचा आहे. व्यापारात आज तुमच्या हाती एक असे काम येईल, जे तुम्ही जर योग्य पद्धतीने मार्गी लावले तर तुम्हाला खुप फायदा होईल. परंतु, यादरम्यान भागीदाराशी वाद होऊ शकतो. यासाठी विचारपूर्वक कामात हात टाका. नोकरी करणार्‍यांसाठी दिवस अनुकूल आहे. विरोधकांवर मात कराल. कोर्ट, कचेरीच्या प्रकरणात यश मिळेल. प्रेमसंबंधात दिवस चांगला आहे, प्रिय व्यक्तीसोबत फिरण्यासाठी जाऊ शकता. आरोग्य सामान्य राहिल.

कर्क
आजचा दिवस तुमच्यााठी अधिक अनुकूल नाही. कारण आज तुमचे आरोग्य बिघडू शकते. खर्चसुद्धा वाढू शकतो. काही खर्च अचानक समोर येतील. दूरच्या प्रवासाचा योग आहे. परंतु, यामुळे खर्च वाढू शकतो. दाम्पत्य जीवनासाठी आजचा दिवस चांगला आहे. जोडीदाराचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा, आणि बसून चर्चा करा. तुम्हाला सुख मिळेल आणि कुटुंबातील लोकांचे सहकार्य मिळेल. परंतु, एखाद्या गोष्टीवरून तुम्ही घरच्यांवर नाराज होऊ शकता. कामात चांगले परिणाम दिसून येतील.

सिंह
तुमच्यासाठी दिवस चढ-उतारांचा असणार आहे. तुम्ही तुमच्या संततीबाबत अधिक गांभिर्याने विचार कराल. त्यांचा अभ्यास आणि आरोग्याबाबत चिंतीत रहाल. दाम्पत्य जीवनासाठी दिवस अनुकूल आहे. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य राहिल. जर तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर सध्या थोडी कमजोर वेळ आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही प्रिय व्यक्तीला खुश करण्याचा प्रयत्न कराल, तरीही तुमच्यात काही गैरसमज राहू शकतो. कार्यक्षेत्रासाठी दिवस अनुकूल आहे. व्यापार, नोकरीत चांगले परिणाम दिसून येतील.

कन्या
तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबातील लोकांचे सहकार्य मिळेल. परंतु, जबाबदारी वाढेल. यासाठी घरात लक्ष द्यावे लागेल. याचा परिणाम तुमच्या कामावर होईल. कामात चढ-उतार जाणवेल. विरोधकांकडून तुम्हाला कोणताही धोका नाही, तरीही सहकार्‍यांशी चांगले संबंध ठेवा. दाम्पत्य जीवनात चांगले परिणाम दिसून येतील. काही तरी नवीन शिकण्यास मिळेल. एखाद्या कलात्मक कामात भाग घ्याल. प्रेमसंबंधात दिवस चांगला आहे. एखादी खास गोष्ट प्रिय व्यक्तीशी शेयर कराल.

तुळ
आज एखाद्या प्रवासाचा योग आहे. परंतु, प्रवासात काही असुविधा होऊ शकते. घरातील छोट्यांचे आरोग्य बिघडू शकते. तोंडातून असे शब्द जातील, ज्यामुळे घरातील वातावरण बिघडू शकते. यासाठी सावध रहा. आई-वडीलांच्या आशीर्वादामुळे कामात यश मिळेल. त्यांचे आरोग्य कमजोर राहिल. प्रेमसंबंधात आनंद अनुभवाल, कारण प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. दाम्पत्य जीवनात तणाव असूनही स्थिती चांगली राहिल. जोडीदार नाते जपण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. कामात स्थिती ठिक राहिल.

वृश्चिक
तुम्ही खाण्या-पिण्याकडे लक्ष दिले नाही तर आजारी पडू शकता. घरात सुखसुविधा राहतील. आई-वडीलांचे सहकार्य मिळेल. प्रत्येक काम मजबूतीने कराल. गाडी चालवणे शक्यतो टाळा, कारण एखादी अप्रिय घटना घडू शकते. प्रेमसंबंधासाठी दिवस सामान्य आहे. दाम्पत्य जीवनासाठी दिवस अनुकूल आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. तुमचे सामान्य रूपाने उत्पन्न वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले परिणाम दिसून येतील. शासनाचे सहकार्य मिळेल.

धनु
तुमच्यासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. कामात लक्ष लागेल. परंतु, गोंधळाची स्थिती राहिल. कामाला प्रथम महत्व द्या. एखादे महत्वाचे काम अडकू शकते. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधात काही अडचणी येऊ शकतात. प्रवास चांगला होईल. कुटुंबाचे वातावरणही तुमच्या बाजूने राहिल. कामात जास्त मेहनत करावी लागेल.

मकर
तुमच्या खर्चात वाढ होईल. दाम्पत्य जीवनात आनंद राहिल. जोडीदार आवश्यक कामासाठी दूर जाऊ शकतो. तुम्हाला त्याची उणीव भासेल. मानसिकदृष्ट्या थोडा तणाव जाणवू शकतो. कुटुंबाचे वर्तन चांगले राहिल आणि कुटुंबातील सदस्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न कराल. कामात चांगले परिणाम दिसून येतील. धनलाभही होईल. परंतु, खर्च जास्त वाढेल. प्रेमसंबधात तुमची प्रिय व्यक्ती एखाद्या गोष्टीवरून राग व्यक्त करू शकते.

कुंभ
आजचा दिवस तुमच्यासाठी खुप पैशांचा वर्षाव करणारा आहे. तुमचे उत्पन्न वाढेल. बॉसची कृपा तुम्हाला प्राप्त होईल. तुमची पत वाढेल. कामासाठी दिवस चांगला आहे. दाम्पत्य जीवन आनंदात राहिल. तुम्ही व्यक्त केलेल्या प्रेमाला जोडीदारही प्रेमाने उत्तर देईल. प्रेमसंबधात आंबट-गोड अनुभव येईल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. सुखाची अनुभूती होईल. प्रवासाठी दिवस चांगला आहे.

मीन
आजच्या दिवशी खुप मेहनत करावी लागेल. आज कामावर पूर्ण लक्ष केंद्रीत कराल. बॉस खूश होईल, चांगले परिणाम दिसून येतील. कुटुंबात कुणाचे तरी आरोग्य बिघडल्याने त्रस्त होऊ शकता. प्रेमसंबंधात वेळ चांगला जाईल. दाम्पत्य जीवनात जोडीदारा बरोबर पाटीमध्ये जाण्याची संधी मिळेल. तसेच धनलाभाची संधी आहे.