21 फेब्रुवारी राशिफळ : मेष, कर्क आणि कन्या राशीला समजेल शुभवार्ता, इतरांसाठी असा आहे रविवार

मेष
आज विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात काही अडचणी येऊ शकतात. आर्थिक स्थिती देखील तणावपूर्ण असेल. घराच्या देखभालीसाठी पैसे खर्च होऊ शकतात, विचारपूर्वक वाटचाल करा. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहकार्य कराल, ज्यामुळे मन आनंदित होईल. रोजगारात सुधारणा होईल, नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. जमीन, मालमत्तेची काही समस्या असल्यास ती संपेल. व्यवसायातील सकारात्मक बदल भविष्यात प्रचंड लाभ देतील. संध्याकाळी आरोग्याची काळजी घ्या, चुकीचे खाणे-पिणे टाळा. संततीकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल.

वृषभ
आजचा दिवस कार्यक्षेत्रात यशस्वी ठरेल. अधिकारी वर्गाकडून सुद्धा कौतुक होईल. प्रेमसंबंधात आनंददायक वेळ घालवाल. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून मंगलवार्ता ऐकायला मिळेल. ज्यामुळे मन आनंदित होईल. आज संध्याकाळी स्थितीत सुधारणा होईल, शेजारी देखील मदतीसाठी पुढे येतील. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या, त्यांच्या आरोग्याच्या नियमांचे पालन करा. सुरू केलेल्या कार्यामध्ये यश मिळेल, परंतु आज संसारिक सुखामध्ये आणि नोकर चाकरांमुळे त्रास होईल.

मिथुन
आज कौटुंबिक जीवनात नाराजीचा सूर दिसेल. मानसिक ताणतणावात राहाल. कार्यक्षेत्रातही संयमाने काम करा, कारण घाईने केलेले काम बिघडू शकते. ज्यामुळे नुकसान होऊ शकते. वाहनात बिघाड झाल्यामुळे अचानक खर्च वाढू शकतो. तसेच कुटुंबातील लहान मुलांबरोबर चांगला वेळ घालवाल. आज कामात लक्ष लागेल, रखडलेली कामे पूर्ण होतील. कार्यक्षेत्रात प्रभाव वाढेल. परदेश संबंधित कामात यश मिळेल.

कर्क
आज बुद्धी आणि विवेकाद्वारे नवनवीन कामांचा शोध घ्याल. कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित एखादा वाद सुरू असल्यास वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मदतीने तो सुटेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आणखी मेहनतीची आवश्यकता आहे, तरच यश मिळेल. भाऊ आणि मित्रांच्या सहकार्याने नवीन संधी मिळतील. कार्यक्षेत्रात जोडीदाराच्या सल्ल्यामुळे बराच फायदा होईल, ज्यामुळे दोघांमधील संबंध आणखी दृढ होतील. आज संध्याकाळचा वेळ दान-पुण्याच्या कार्यात व्यतीत होईल. एखादी शुभवार्ता समजल्याने भौतिक सुखात वाढ होईल.

सिंह
आजचा दिवस संमिश्र आहे. कार्यक्षेत्रात वादविवाद टाळा, अन्यथा कायदेशीर समस्या निर्माण होऊ शकते. रोजगार क्षेत्रात अस्थिरतेमुळे काही समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे मनाला त्रास होईल. कुटुंबाचे प्रश्न धैर्याने सोडवा. मोठ्या लोकांच्या मदतीने अडकलेली सरकारी कामेही आज पूर्ण होतील. व्यापारी वर्गाला आज रोख रक्कमेच्या कमतरतेची समस्या भासू शकते. आज संध्याकाळी धर्म आणि अध्यात्माची आवड वाढेल. यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिक एकाग्रतेने काम करण्याची गरज आहे.

कन्या
आज रोजगार क्षेत्राशी संबंधित समस्या संपतील. परंतु कोणत्याही प्रकारच्या जोखीमपासून दूर राहा. विद्यार्थ्यांना शिक्षणात ज्या आर्थिक समस्या होत्या त्या आज संपतील. आज लोक तुमच्या कामाच्या शैलीने प्रभावित होतील आणि तुमचा आदर करतील. आज आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी काही नवीन प्रयोग कराल. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. कार्यक्षेत्रात प्रभाव व तेज वाढेल. काही अनावश्यक खर्चही होतील, जो करावा लागेल, ज्यामुळे आर्थिक स्थिती डगमगू शकते. प्रेमामुळे आयुष्यात नवी उर्जा निर्माण होईल. वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज संध्याकाळी मित्रांसह कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यात वेळ घालवाल.

तुळ
आज कौटुंबिक जीवनात मानसन्मान वाढेल, यामुळे जोडीदाराची काळजी घ्याल. कुटूंबातील एखाद्या व्यक्तीकडून शुभवार्ता मिळू शकते. नोकरीत अधिकारात वाढ होईल. जबाबदारी वाढेल. सामाजिक कार्य केल्याने समाजाकडून पाठिंबा मिळेल आणि प्रत्येकजण तुमच्या धैर्याची आणि पराक्रमाची स्तुती करताना दिसेल, ज्यामुळे मन आनंदी होईल. व्यापारात आज जास्त मेहनत करावी लागेल, ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, आरोग्याची काळजी घ्या. संध्याकाळी छोट्या अंतराचा प्रवास करू शकता.

वृश्चिक
आजचा दिवस उत्तम लाभदायक आहे. संततीच्या नोकरीशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे संततीच्या भविष्याबद्दलची चिंता कमी होईल. व्यस्तता असूनही आज लव्ह लाईफसाठी वेळ काढाल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी भाग्याची भरपूर साथ मिळेल, परंतु अनावश्यक खर्च आज समोर उभे राहतील. आर्थिक लाभाची स्थितीही आज खूप चांगली आहे. विद्यार्थ्यांना गुरुंचे सहकार्य मिळेल, जेणेकरून त्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल. कौटुंबिक व्यवसायाच्या विषम स्थितीत वडिलांचा आधार उपयुक्त ठरेल, ज्यामुळे कौटुंबिक व्यवसायातील सुरू असलेली समस्या संपेल. आज संध्याकाळी एखाद्या मांगलिक सोहळ्यास उपस्थित राहण्याची संधी मिळेल.

धनु
आजचा दिवस संमिश्र आहे. कुटुंबात एखाद्या चर्चेतून मतभेद होऊ शकतात, परंतु रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा संबंध तुटतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी अधिक परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. आरोग्याबद्दल सतर्क रहा आणि खाण्याकडे विशेष लक्ष द्या. आज भौतिक सुविधांमध्ये कमतरता भासेल. मनातील गोष्टी इतरांसमोर प्रकट केल्या नाहीत तर आज रखडलेले पैसे मिळू शकतात. जोडीदारासाठी एखादी भेट आणू शकता, ज्यामुळे जोडीदारास आनंद होईल. आज सायंकाळची वेळ धर्म आणि अध्यात्मात व्यतीत होईल.

मकर
विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस थोडासा तणावपूर्ण असू शकतो. आज स्पर्धात्मक परीक्षेत काही अडचणी येऊ शकतात, त्यामुळे सावध रहा. प्रेमसंबंध नात्यात रूपांतरित करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. कुटुंबातील एखाद्या मंगल कार्यक्रमावर चर्चा होऊ शकते. राजकीय लोकांना जनतेचा पाठींबा मिळेल. व्यवसायात निर्णय घेण्याच्या क्षमतेचा आज फायदा होईल ज्यामुळे आर्थिक स्थिती आणखी मजबूत होईल. जर एखादा वाद सुरू असेल तर आज त्याचा पुरेपूर फायदा मिळण्याची शक्यता आहे. संध्याकाळचा वेळ धर्म आणि आध्यात्माच्या कार्यात घालवाल.

कुंभ
आजचा दिवस व्यापार्‍यांसाठी भविष्यातील नवीन योजना घेऊन येईल. वडिलांशी संबंध सुधारतील. त्यांच्या विचारांना प्राधान्य द्याल, ज्यामुळे भरपूर लाभ मिळेल. आज कार्यक्षेत्रात सर्वांना आपल्या कामाच्या बळावर मागे टाकाल. संध्याकाळी गाणी आणि संगीतात वेळ घालवाल. वाढ आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. अनेक दिवसांपासून एखादी समस्या सुरू असेल तर आज ती दूर होईल. गोंधळाच्या स्थितीतून मुक्त होण्यासाठी एक नवीन मार्ग सापडेल.

मीन
आजचा दिवस उत्तम लाभदायक आहे. संतती आणि जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. चांगल्या कर्मांनी कुटुंबाचे नाव उज्वल होईल. वडीलधार्‍यांच्या आशीर्वादाने सर्व कामे होतील. व्यापार्‍यांना धनलाभाचा भरपूर योग आहे, परंतु त्यासाठी व्यवसायिक प्रवास करावा लागेल, जो यशस्वी होईल. लग्नाशी संबंधित समस्याही आज संपतील. आज नोकरीसंबंधी एखादी बातमी मिळेल. तसेच भावाचे सहकार्य मिळेल. कर्ज घेतले असेल तर त्यातुन आज मुक्त व्हाल. परंतु कोणत्याही प्रकारच्या व्यवहारापासून दूर राहावे लागेल. सायंकाळी कुटुंबात पाहुण्यांचे आगमन होईल.