21 जानेवारी राशिफळ : कर्क, सिंह आणि तूळ राशीसाठी दिवस ‘शुभ’, इतरांसाठी ‘असा’ आहे गुरुवार

मेष : जीवनात सत्याला महत्व देणारे तुम्ही, आज अतिशय चांगल्या मूडमध्ये दिसाल. परंतु आरोग्याबाबत गंभीर राहिले पाहिजे. सर्दी-तापाचा त्रास होऊ शकतो. वैयक्तिक जीवनात आनंद असेल, असे वाटेल डोक्यावर भार किंवा ताण नाही. कामात थोडा निष्काळजीपणा असू शकतो, जो टाळण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रेमसंबंधात मनातील सांगण्यासाठी एक चांगला दिवस आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला ताळमेळ ठेवा.

वृषभ
आज खर्च होईल. शॉपिंगमध्ये वेळ घालवाल, ज्यामुळे खर्च होईल आणि आर्थिक स्थितीवर भार येईल. वैयक्तिक जीवनात थोडेसे निराश राहू शकता. जेवढे प्रेम त्यांच्यावर करता तेवढी अपेक्षा कराल, पण बदल्यात तेवढे न मिळाल्यामुळे निराश व्हाल, पण ही भावना बदला, पहा जीवन खूप सुंदर आहे आणि सर्वजण तुम्हाला पसंत करतात. कामात स्थिती नियंत्रणात राहिल. बँक बॅलन्स वाढविण्यातही यशस्वी होऊ शकता.

मिथुन
जर उत्पन्न वाढत असेल तर कोणाला आवडणार नाही. आज चांगले इन्कम होईल. कुठेतरी पैसे गुंतवले असतील तर त्यामधून चांगले रिटर्न मिळेल. याशिवाय पुढे सुद्धा पैशांची गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. फक्त शेअर बाजारामध्ये सावधगिरी बाळगा. दीर्घ मुदतीसाठी पैसे गुंतवा. आज हजरजबाबी राहाल आणि थट्टामस्करीच्या मूडमध्ये रहाल, ज्यामुळे प्रत्येक समस्येला सहज दूर कराल. कामात स्थिती चांगली राहील. वैयक्तिक जीवनात खुप परिपक्वता दर्शवाल. काही बाबतीत गंभीरही दिसाल. स्वत:सोबत उभे राहाल.

कर्क
मनात शंका ठेवणे नुकसानकारक ठरू शकते. म्हणून ती मनातून काढून टाका. प्रत्येक कामात भाग घ्या. वैयक्तिक जीवन चांगले करण्यासाठी सर्वामध्ये मोकळेपण सहभागी वह. त्यांच्याबरोबर वेळ घालवा आणि मनात काही शंका असल्यास ती दूर करण्यासाठी बोला. कामासाठी स्थिती खूप चांगली आहे. कामाच्या ठिकाणी पार्टीची योजना आखू शकता. कोणाचेतरी फेअरवेल असू शकते किंवा एखाद्याचा वाढदिवस असू शकतो. इन्कमसाठीचे प्रयत्न यशस्वी होतील. आत्मविश्वास राहील. स्पर्धा परीक्षेत यश मिळाल्याने मनोबल वाढेल.

सिंह
भाग्य प्रबळ राहिल्याने कामात यश मिळेल. ज्या कामाबद्दल विचार कराल ते पूर्ण होईल, ज्यामुळे दिवस तुमचा ठरेल. मालमत्तेशी संबंधित कामात हात टाकला असेल तर त्यामध्ये सुद्धा यश मिळेल. विरोधकांवर मात कराल. वैयक्तिक जीवनात आनंदाचे क्षण येतील. आरोग्य देखील चांगले राहील. ज्ञान आणि अनुभवाच्या जोरावर आजूबाजूच्या लोकांना काहीतरी नवीन सांगण्याचा प्रयत्न कराल, जे लक्षपूर्वक ऐकले जाईल. एखादा सन्मान मिळू शकतो.

कन्या
आज दिनमानाची तुमच्याकडून खुप अपेक्षा आहे. आज भाग्यावर विश्वास न ठेवता काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल, आव्हानांची भीती न बाळगता आत्मविश्वास जागृत ठेवल्याने नात्यातून प्रेम आणि कामात यश मिळेल. उत्पन्नासाठी दिवस सामान्य आहे. खर्च वेगाने वाढताना दिसेल. संध्याकाळनंतर स्थिती सुधारेल. कौटुंबिक कामात इतके व्यस्त असाल की कामाकडे थोडे कमी लक्ष देऊ शकाल, तरीही लक्ष देणे आवश्यक आहे.

तुळ
आजचा दिवस प्रेमाने भरलेला आहे. लव्ह लाइफचा आनंद घ्याल. प्रिय व्यक्तीसुद्धा तुमच्या आनंदात सहभागी होईल, ज्यामुळे दिवस आनंदी होईल. कामात स्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने असेल. ज्यामुळे खूप आनंद होईल. महत्वाची कामे भाग्याच्या बळावर सोडून द्याल, त्यामध्ये यश मिळेल. वैवाहिक जीवन योग्य दिशेने जाईल. जोडीदार काहीतरी चांगले सांगू शकतो, ज्यामुळे आनंद होईल.

वृश्चिक
घरात कुणाच्या तरी आगमन उत्साह संचारेल. घरात एखादे कार्य करू शकता किंवा आपण घराचे सौंदर्य वाढविण्यासाठी काहीतरी नवीन खरेदी करू शकता. आरोग्य मजबूत राहील. दिवसाचा भरपूर आनंद घ्याल. आई तुमच्यावर खूप प्रेम करेल. व्यवसायात स्थिती चांगली राहील. गुंतवणूकीसाठी दिवस चांगला आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, कुणाच्या चिथावणीने कुणालाही वाई बोलू नका, अन्यथा समस्या निर्माण होऊ शकते.

धनु
आज मित्रांसह कुठेतरी फिरायला जाण्याची योजना आखू शकता. अनेक दिवसांपासून ज्यासाठी प्रयत्न करीत आहात ती संधी आज मिळेल. सरकारी कामात फायदा होईल. जोडीदार महत्वाच्या गोष्टी बोलेल, तिचा एखादा सल्ला ऐकन पुढे जाण्याचा एखादा नवीन मार्ग सापडेल. विरोधकांपासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ते आज प्रबळ स्थितीत असू शकतात. बुद्धी चांगली राहील, ज्यामुळे योग्यवेळी योग्य गोष्ट करण्याचे अंतर्ज्ञान मिळेल.

मकर
मनाने भावनिक असणारे आपण आज खूप भक्कम स्थितीत असाल. घरात जी स्थिती चालू आहे त्यावर पूर्ण नियंत्रण असेल. घरात आनंद राहील. गोड शब्दांनी सर्वांची मने जिंकू शकता. घरात येणार्‍या आनंदाचे संकेत दिसतील. घरात लोकांचे येणेजाणे राहील. व्यवसायात थोडी गंभीर भूमिक आवश्यक आहे. सौम्य भूमिका हानिकारक ठरू शकते. वैयक्तिक जीवनात निराशा वाटू शकते. कामात स्थिती बरीच मजबूत असेल. प्रयत्न यशस्वी होतील.

कुंभ
आजचा दिवस मध्यम आहे. आरोग्य कमजोर राहू शकते. बदलणारे हवामान आजारी पाडू शकते. काळजी घ्या, कामात अडथळा येण्याची शक्यता आहे. मानसिक तणावातून मुक्तता मिळेल. वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असेल. उत्सवाच्या या काळात जोडीदार एखादी लाभ देणारी गोष्ट सांगू शकतो, ज्यामुळे आनंद मिळेल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल आणि आपल्या भविष्यातील प्लॅनिंग त्यांना सांगाल. त्यांच्यासाठी एखादी चांगली भेटवस्तू देखील आणू शकता. कामात भाग्य साथ देईल, ज्यामुळे चांगले परिणाम मिळतील.

मीन
आजचा दिवस चांगला आहे. धनलाभ होईल. कामात यश सुद्धा मिळेल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे आणि चांगले परिणाम मिळतील. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. दोघे सोबत बसून एखादे काम सुरू करण्याबाबत बोलू शकता. दामपत्य जीवनात चांगले परिणाम मिळतील. जोडीदाराला एखादा मोठा लाभ मिळू शकतो. कामात चढ-उतार राहील. दुसर्‍या नोकरीचा विचार मनात येईल.