21 मार्च राशीफळ : आज ‘या’ 4 राशींच्या व्यक्तींनी राहावे ‘सावध’

पोलीसनामा ऑनलाइन

मेष
तुमच्यासाठी आजचा दिवस खुप शुभ आहे. उत्पन्नात जबरदस्त वाढ होईल, यामुळे प्रसन्न वाढेल. प्रेमसंबंधात आनंद मिळेल. प्रिय व्यक्तीला आपल्या मनातील गोष्ट सांगाल. विवाहितांच्या जीवनात आनंद येईल आणि प्रेम, रोमान्सची संधी मिळेल. व्यापारात लाभ होईल तर नोकरीत मेहनत तुमच्या उपयोगी पडले. तसेच मनातील एखादी गोष्ट पूर्ण झाल्याने आत्मविश्वास वाढेल.

वृषभ
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र परिणाम घेऊन आला आहे. वैवाहिक जीवनात काही समस्यांना तोंड द्यावे लागेल. सासरच्यांशी भांडणे होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधासाठी दिवस खास नाही, सावधगिरी बाळगा. नोकरीत आजचा दिवस खुप चांगला आहे. तुमची मेहनत यशस्वी होईल आणि चांगले परिणाम मिळतील. आरोग्य थोडे कमजोर राहील, ज्यामुळे आजारी पडू शकता.

मिथुन
तुमच्यासाठी आजचा दिवस ठिक आहे. आरोग्य चांगले राहील. प्रत्येक काम ताकदीने पूर्ण कराल. कामात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. तुम्हाला याचा चांगला लाभ मिळेल. परंतु, भाग्य कमजोर असल्याने कामात अडचणी येऊ शकतात. वैवाहिक जीवनात तणाव कायम राहील. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे काही समस्या सुटतील.

कर्क
आजच्या दिवशी खुप विचारपूर्वक काम करावे लागेल. आरोग्य चांगले राहील. ज्यामुळे उर्जा भरपूर राहील. परंतु, कामात विलंब झाल्याने मन दुखी होईल. कामात चांगले परिणाम मिळतील. कुटुंबाचे वातावरण चांगले राहील. वैवाहिक जीवनात तणाव राहू शकतो. प्रेमसबंधात प्रिय व्यक्ती नाराज होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात तणाव राहू शकतो. कुटुंबातील वातावरण चांगले राहू शकते. विरोधकांपासून सावध राहा. व्यापारात चांगले परिणाम मिळतील.

सिंह
तुमच्यासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. आरोग्य चांगले राहील. कामात चांगले परिणाम दिसून येतील. काही लोकांना बदलीचे योग आहेत. नवी नोकरी शोधण्याचा प्रयत्न कराल. दाम्पत्य जीवनात तणाव थोडा कमी होईल. प्रेमसबंधात आज आव्हानांना तोंड द्यावे लागेल. तुमच्या कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून गहन चर्चा होऊ शकते, ज्याचा परिणाम तुमच्यावर होणार आहे.

कन्या
आजचा दिवस थोडा कमजोर आहे. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा आजारी पडू शकता. कामात अडचणी येतील किंवा योजना अंगावर पडू शकतात. वैवाहिक जीवनात तणाव राहू शकतो. प्रेमसंधात काही अडचणी येऊ शकतात. नोकरीत तुम्हाला तुमची इमेज बनवावी लागेल. व्यापरात दिवस लाभदायक ठरेल. उत्पन्न ठिक राहील.

तुला
आजचा दिवस चांगला आहे. आरोग्यात सुधारणा होईल. अडचणी कमी होतील. व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. प्रिय व्यक्तीला मनातील गोष्ट सांगू शकता. रोमान्सची संधीही मिळू शकते. वैवाहिक जीवनात अतिशय चांगले परिणाम मिळतील. कामात अधिक मेहनत करावी लागेल. जास्त मेहनतीसह बुद्धीचाही वापर करावा लागेल, तेव्हा यश मिळेल.

वृश्चिक
आजच दिवस संमिश्र परिणामांचा आहे. आरोग्य चांगले राहील. परंतु बोलण्यातील व्यवहारिकता आणि आकड त्रासदायक ठरू शकते. कुटुंबाचे आरोग्य चांगले राहील, परंतु एखाद्या गोष्टीवरून कुटुंबातील व्यक्ती एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतील. प्रेमसंबंधासाठी दिवस ठिक आहे. वैवाहिक जीवनात आज चांगले परिणाम दिसून येतील. नोकरीत बॉसच्या नजरेत कायम राहाल, पण चांगले काम करून दाखवावे लागेल.

धनु
आजचा दिवस सामान्य आहे. आरोग्य चांगले राहील, परंतु एखाद्या गोष्टीवरून तुम्ही ताठर राहील्याने अडचणी वाढू शकतात. कामात आणखी लक्षपूर्वक काम करावे लागेल, तेव्हाच चांगले परिणाम मिळतील. प्रेमसंबंधासाठी दिवस सामान्य राहील. दाम्पत्य जीवनात तणाव कायम राहील. कुटुंबातील वातावरण सुखशांती देईल. गाडी चालवताना सावधगिरी बाळगा.

मकर
तुमच्यासाठी आजचा दिवस ठिक आहे. परंतु, खर्च वाढल्याने, चिंता सतावतील. याकडे लक्ष द्यावे लागेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. कामात तुमची मेहनत उपयोगी पडेल. यश मिळेल. विवाहितांना आनंदप्राप्ती होईल. प्रेमसंबंधात आज चांगले परिणाम दिसून येतील.

कुंभ
आज तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. काही प्रकरणात तुम्हाला अडचणी येण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल आणि कामात खुपच चांगले परिणाम मिळतील. तुमचे उत्पन्न वाढल्याने मन निश्चिंत होईल. उत्साह वाढेल. वैवाहिक जीवनात तणाव कमी होईल. आनंदाने आपले जीवन जगाल. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस कमजोर आहे. खर्चात वाढ होईल. आरोग्य बिघडू शकते.

मीन
तुमच्यासाठी आजचा दिवस सामान्य आहे. आरोग्याशी संबंधीत प्रकरणांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागेल. उत्पन्नात वाढ होईल. कामात चांगले परिणाम मिळतील. परंतु, कौटुंबिक जीवनात तणाव थोडा कमी होईल. वैवाहिक जीवनात एखाद्या गोष्टीवरून जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात आज प्रत्येक पाऊल खुप सावध राहून उचलले पाहिजे.