21 मार्च राशिफळ : या 5 राशीवाल्यांना धनलाभाचे संकेत, इतरांसाठी असा आहे रविवार

मेष
आजचा दिवस व्यवसायासाठी संमिश्र आहे. बिझनेसमध्ये एखादी खास डिल फायनल होऊ शकते, जिचा भविष्यात भरपूर लाभ मिळेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. राजकीय क्षेत्रात सन्मान प्राप्त होईल. सायंकाळचा वेळ कुटुंबियांसोबत एखाद्या मंगलकार्यात घालवाल. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी मित्रांच्या मदतीची आवश्यकता भासेल.

वृषभ
आज दिवस संमिश्र परिणामांचा आहे. कुटुंबात एखादा आनंदाचा आणि मंगल कार्यक्रम होऊ शकतो, ज्यामुळे धावपळसुद्धा जास्त होईल आणि व्यस्त रहाल, मात्र यामध्ये सर्वामध्ये व्यवसायाकडे दुर्लक्ष करू नका, त्यावर सुद्धा लक्ष ठेवावे लागेल. शत्रु आज प्रबळ दिसतील. दाम्पत्य जीवन सुखमय राहील. संततीला धार्मिक कार्य करताना पाहून मनात आनंदाचा भाव राहिल.

मिथुन
आजचा दिवस उत्तम परिणामांचा आहे. आज तेच काम करा, जे पूर्ण होण्याची पूर्ण आशा आहे. आज डोक्यात अनेक नवनवीन योजना येतील, ज्या तुमच्या बिझनेस वाढवतील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी सिनियर्सचे विशेष सहकार्य मिळेल. एखादे क्रिएटिव्ह आणि कलात्मक काम पूर्ण करण्यात दिवस घालवू शकता.

कर्क
आजचा दिवस तुमच्या नोकरी, व्यवसायासाठी उत्तम लाभदायक आहे. नोकरीत आज मनासारखे वातावरण राहिल आणि सहकारी सुद्धा भरपूर सहकार्य करतील. सायंकाळी मित्रांसोबत खाण्यापिण्यात वेळ घालवाल. परदेशाशी व्यापार करणार्‍या लोकांसाठी दिवस उत्तम राहिल. आज जे काही काम करायचे आहे, मन लावून करा, तरच यश मिळेल. भाऊ-बहिणीचा सल्ला उपयोगी ठरू शकतो.

सिंह
आजचा दिवस व्यस्त रहाल. परंतु तरी सुद्धा प्रेमासाठी वेळ काढाल, ज्याद्वारे तुम्ही रूसलेल्या प्रिय व्यक्तीला समजवाल. कार्यक्षेत्रात सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी कामात अडथळा आणू शकतात. सासरच्या बाजूने सन्मान मिळेल. व्यापार्‍यांना आज रोखीची कमतरता भासू शकते. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळवण्यासाठी कठोर मेहनतीची आवश्यकता राहील.

कन्या
आजचा दिवस संमिश्र आहे, आजूबाजूच्या लोकांपासून सावधगिरी बाळगावी लागेल. कारण लोकांशी वाद होण्याचा पाळी येऊ नये, याची दक्षता घ्या आणि आपल्या वाणीवर संयम ठेवा. कुटुंबात एखाद्या शुभकार्यावर चर्चा होऊ शकते, ज्यामध्ये कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला आवश्यक असेल. सायंकाळी जर एखादा कायदेशीर वाद असेल तर तो मार्गी लागू शकतो.

तुळ
आजचा दिवस उत्तम लाभदायक राहिल. जमीन, मालमत्तेशी संबंधीत प्रकरणात कुटुंबातील तसेच जवळपासचे लोक काही समस्या निर्माण करू शकतात. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा तुमचे वजन वाढेल. परंतु तुमचा पैसासुद्धा खर्च होईल. कामाशी संबंधी सर्व वाद आज संपतील. व्यापारात नवीन प्रोजेक्टवर काम सुरू होऊ शकते.

वृश्चिक
आजचा दिवस रोजगाराशी संबंधीत जातकांसाठी चांगले परिणाम घेऊन आला आहे. व्यवसायात सुद्धा आज दिवसभर लाभाच्या संधी प्राप्त होतील. ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबात सुखशांती आणि स्थिरतेचा आनंद घ्याल. नोकरीत काही नाविन्य आणू शकता, ज्याचा भविष्यात भरपूर लाभ होईल. सायंकाळचा वेळ आपल्या आई-वडीलांच्या सेवेत घालवाल.

धनु
आजचा दिवस सावधगिरी आणि सतर्कता बाळगून वाटचाल करण्याचा आहे. कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर पैसे खर्च करू शकता. आईच्या प्रकृतीत थोडी घसरण येऊ शकते, यासाठी लक्ष द्या. नोकरीत एखादी वादाची स्थित निर्माण होऊ शकते, परंतु आपल्या मधुर वाणीने सर्वांचे हृदय जिंकण्यात यशस्वी व्हाल. आज सायंकाळच्या वेळी जोडीदारासोबत तिर्थस्थळी जाऊ शकता.

मकर
आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायक आहे. जर तुम्ही एखादा व्यापार भागीदारीमध्ये केला आहे, तर तो आज खुप लाभ देईल. घराच्या सजावटीसाठी आज काही शॉपिंग करू शकता, ज्यामुळे खिशावर भार येईल. जुनी अडकलेली कामे करण्यासाठी आज वेळ आवश्य काढा. घरात आज संततीच्या विवाहासंबंधी चर्चा होऊ शकते.

कुंभ
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहिल. व्यस्त राहील, परंतु त्यासाठी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. जर व्यापारात काही व्यवहार करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी दिवस उत्तम आहे. कुटुंबात आज संपत्तीसंबंधी एखादे प्रकरण डोकं वर काढू शकते. परंतु, समजूतदारपणे काम करा आणि ज्येष्ठांचा सल्ला घेऊन काम केल्यास यश मिळेल.

मीन
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम लाभदायक आहे. जर व्यापरात जोखिम घेण्याचा विचार करत असाल तर हिताचे ठरेल. जर आज एखादा व्यक्ती त्रस्त दिसला तर त्यास आवश्यक मदत करा. तुमच्या कुटुंबात आज एखादी समस्या येऊ शकते, परंतु आपल्या मधुर व्यवहाराने ठिक करण्याचा प्रयत्न करा. नोकरी आणि व्यापारात आज आपल्या बुद्धीचा वापर करून खुप काही मिळवू शकता, ज्याची आजपर्यंत तुम्हाल कमतरता होती. सायंकाळचा वेळ आज मित्रांसोबत फिरण्यात घालवाल.