21 मे राशिफळ : जाणून घ्या आज गुरूवारच्या दिवशी ‘भाग्याची साथ’ मिळेल का ?

पोलीसनामा ऑनलाइन –

मेष
आजचा दिवस खुप चांगला आहे. तुम्हाला खुप जास्त उर्जेची जाणीव होईल, यामुळे प्रत्येक काम चांगल्या पद्धतीने करू शकता. याचा परिणाम वैवाहिक जीवनावरही पडेल. नाते घट्ट करण्याचा प्रयत्न कराल. जीवनात सुख अनुभवाल. आजचा दिवस जोडीदारासोबत घालवणे पसंत कराल. कामात थोडे सावध राहा. कुणीतरी षडयंत्र रचू शकते. प्रेमसंबंधात तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने सावध राहा.

वृषभ
आजचा दिवस सामान्य फलदायी आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. आजारी पडू शकता. विवाहितांच्या जीवनात तणावाची स्थिती बनू शकते. जोडीदाराच्या रागाचा पारा चढू शकतो. यासाठी विचारपूर्वक बोला. प्रेमसंबधासाठी दिवस अनुकूल आहे. कामात यश मिळाल्याने आनंद वाटेल. कौटुंबिक जीवनातही आनंदी वातावरण राहील. यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही मजबूत होऊ शकता.

मिथुन
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य फलदायी राहील. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करणे महागात पडेल. आजारी पडू शकता. इन्कममध्ये वाढ होईल. प्रेमसंबंधात आनंद येईल. प्रिय व्यक्तीसोबत आनंदाचे क्षण घालवाल. वैवाहिक जीवनाच्या स्थितीत पहिल्यापेक्षा सुधारणा होईल. वैवाहिक सुख वाढविण्यासाठी प्रयत्न कराल. व्यापारात केलेले प्रयत्न सार्थकी लागतील. आज पुजाअर्चा, आणि आध्यात्मिक कामांवर जोर द्याल.

कर्क
आजचा दिवस थोडा कमजोर आहे. यासाठी सावध राहा. विवाहितांच्या जीवनात तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. एखाद्या गोष्टीवरून जोडीदाराशी वाद होऊ शकतो. प्रेमसंबंधातही आज थोडे सावध राहा. आज प्रिय व्यक्ती खुपच भावूक असेल आणि छोट्याच्या गोष्टीवरून ती नाराज होऊ शकते. कौटुंबिक जीवन चांगले राहील. सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न कराल. आरोग्यात सुधारणा होईल. आपल्या कामाकडे लक्ष द्याल, ज्यामुळे चांगले परिणाम दिसून येतील.

सिंह
आजचा दिवस खुपच चांगला आहे. भाग्याने साथ दिल्याने यश मिळेल. कौटुंबिक जीवनासाठी आजचा दिवस चांगला आहे. जोडीदारासोबत आज आनंदाचे क्षण घालवाल. प्रेमसबंधासाठी दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्ती सामाजिकदृष्ट्या पुढे जाण्याचे विचार बोलून दाखवू शकते. आरोग्य चांगले राहील. शत्रूंवर मात कराल. खर्चात वाढ होईल.

कन्या
आजचा दिवस सामान्य आहे. मानसिक तणावात वाढ होईल. दाम्पत्य जीवन सामान्य राहील. कुटुंबाचे वातावरणही आज काहीसे अशांत राहू शकते. यामुळे मानसिक अस्वस्थता राहील. प्रेमसंबंधात आज अडचणींना तोंड द्यावे लागेल. प्रिय व्यक्ती आणि तुमच्यात ताळमेळ राहणार नाही, यामुळे स्थिती बिघडू शकते. विरोधकांपासून सतर्क राहा. कामात लक्ष द्यावे लागेल, मेहनत करावी लागेल.

तुळ
आजचा दिवस चांगला आहे. आरोग्यात सुधारणा होईल. स्वतामध्ये नावीन्य जाणवेल. कुटुंबात भांडण होण्याची शक्यता आहे. मोठ्यांची प्रकृती बिघडू शकते. संततीकडून चांगली बातमी समजू शकते. अभ्यासाठी चांगला दिवस आहे. प्रेमसबंधात आज खुप चांगले परिणाम दिसून येतील. प्रिय व्यक्तीशी मधुर गोष्टी होतील. वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो. व्यापारात लाभाचे योग आहेत. स्थिती मजबूत होईल. सोबतचे लोक तुमची स्तूती करतील.

वृश्चिक
आजचा दिवस खुप चांगला आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. कुटुंबात चांगल्या गोष्टी होतील आणि सर्वजण एकमेकांशी प्रेमाने वागतील. प्रेमसबंधात सुखद परिणाम मिळतील. प्रिय व्यक्ती तुमचे मन खुश करणार्‍या गोष्टी बोलू शकते. वैवाहिक जीवनात चढ-उतार असला तरी स्थिती खुप चांगली राहील. संततीकडून सुख मिळेल. कामासाठी दिवस थोडा कमजोर आहे. कामावर विश्वास ठेवावा लागेल. काही लोकांपासून सावध राहावे लागेल.

धनु
आजचा दिवस आनंददायी आहे. चांगले फळ मिळेल. कुटुंबियांकडून शुभवार्ता समजेल. सोशल मीडियातून तुम्हाला एखादी चांगली बातमी समजू शकते. कुटुंबाचे वातावरण चांगले राहील. कामात पूर्ण मेहनतीने सहभागी झाल्याने चांगले परिणाम मिळतील. प्रेमसंबंधासाठी दिवस खुप चांगला आहे. नात्यात गोडवा येईल. संततीकडून चांगले परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनसुद्धा चांगले राहील. खर्चात वाढ होईल. नोकरीसाठी अर्ज करू शकता.

मकर
आजचा दिवस सामान्य फलदायी आहे. तुम्ही सर्व नाती जोडण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक जीवनात आणि तुमच्या कामात ताळमेळ दिसेल, ज्यामुळे दोन्हीकडील तुमचे काम उठून दिसेल. मनात एखाद्या गोष्टीवरून आपराधीपणाची भावना राहील. जे काम तुम्ही केले आहे ते करायला नको पाहिजे होते, असे वाटेल. असे तुमच्या स्वताच्या बाबतीत किंवा वैवाहिक जीवनाच्या बाबतीत घडू शकते. प्रेमसबंधासाठी दिवस अनुकूल आहे. तुमच्याकडे आज पैसा आल्याने आर्थिक स्थिती मजबूत राहील.

कुंभ
तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. परंतु, आरोग्याच्या बाबतीत सावध राहा. मनात प्रेमभावना राहील आणि लोकांशी प्रेमाने वागाल. खर्चात खुप वाढ होईल, ज्यामुळे खिशावर ओझे वाढेल. धार्मिक आचरण कराल. काही प्रमाणात झालेल्या इन्कममुळे दिलासा मिळेल. कामात केलेल्या प्रयत्नांना यश येईल. तुमच्या विचारांवर लोक प्रभावित होतील. दाम्पत्य जीवनासाठी दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधात चांगले परिणाम दिसून येतील. स्वतावर विश्वास ठेवणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल.

मीन
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य फलदायी आहे. कामात व्यग्र राहाल. तुमच्यावर कामाचा ताण राहील. काही कारणावरून बॉसशी वाद होऊ शकतो. यासाठी थोडे सावध राहा. प्रेमबंधात प्रिय व्यक्तीशी वाद होऊ शकतो. तिच्याशी विचारपूर्वक बोला. सध्या तुमचे भाग्य चमकू लागले आहे. ज्यामुळे कामात यश मिळेल. इन्कम सामान्य राहील आणि खर्च वाढतील.