21 नोव्हेंबर राशीफळ : शनिवारी ‘या’ 4 राशीवाल्यांनी राहावे ‘सावध’, ‘धनहानी’ होण्याचे आहेत संकेत

मेष
आजचा दिवस चांगला आहे. कामात पूर्ण लक्ष द्याल, परंतु कार्यालयात एखाद्याशी भांडण होऊ शकते, म्हणून सावधगिरी बाळगा. कौटुंबिक जीवन विस्कळीत होईल कारण एखाद्या ज्येष्ठाची किंवा वडिलांची तब्येत बिघडू शकते. खर्च जास्त होईल. सामान्य उत्पन्नामुळे थोडे निराश होऊ शकता, परंतु धीर धरा. सगळं व्यवस्थित होईल. वैवाहिक जीवन प्रेम आणि रोमान्सने परिपूर्ण राहील. जोडीदाराची बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमता खूप आनंद देईल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीच्या वागण्याने थोडे अस्वस्थ होऊ शकता.

वृषभ
आजचा दिवस चांगला आहे. थोडा मानसिक तणाव असेल, परंतु भाग्याची साथ असल्याने यश मिळेल, समाधान मिळेल. आत्मविश्वास मोठा असेल, परंतु अति आत्मविश्वास टाळा. उत्पन्नात वाढ झाल्याने मन आनंदी होईल. वैवाहिक जीवन तणावपूर्ण असेल. ग्रहांची स्थिती जोडीदाराला रागीष्ट बनवेल. अशावेळी शांत राहा. लव्ह लाइफमध्ये थोडा ताणतणावाचा सामना करावा लागेल. प्रिय व्यक्तीशी अधिक बोलणे टाळा. प्रवासाला जाण्यासाठी काळ चांगला आहे.

मिथुन
आजचा दिवस मध्यम आहे. मानसिक ताणतणावातून चुकीचे निर्णय घेऊ शकता. जे आगामी काळात नुकसान करू शकतात, म्हणून असे काहीही करण्याचा प्रयत्न करू नका. हाती कोणतेही मोठे काम घेऊ नका, जे हातात आहे तेच पूर्ण करा. कामासाठी दिनमान तुमच्या बाजूने आहे. तुमचा पदभार वाढू शकतो. विरोधकांशी सावधगिरी बाळगा. मात्र ते तुमचे काहीही बिघडवू शकणार नाहीत. तरीही, मानसिक चिंता देतील. आरोग्यात चढ-उतार होईल. प्रेमसंबंध रोमँटिक असतील आणि प्रिय व्यक्ती मनापासून प्रेम करेल. वैवाहिक जीवनात सासरच्या मंडळींच्या हस्तक्षेपामुळे अस्वस्थ व्हाल.

कर्क
आजचा दिवस चढ-उतारांचा असेल. कामासाठी बरीच धावपळ होईल. व्यवसायात चांगले यश मिळवू शकता, परंतु भागीदाराशी संबंध खराब होऊ शकतात. प्रेमसंबंधासाठी दिनमान खूप कमजोर आहे. आपसात वादाची स्थिती असेल, म्हणून आज प्रिय व्यक्तीला न भेटण्याचा प्रयत्न करा आणि असे काहीही बोलू नका ज्यामुळे वाद होईल. नोकरीत भाग्याची साथ मिळेल. वैवाहिक जीवनात एखादी समस्या जाणवेल, जोडीदाराची तब्येत बिघडू शकते.

सिंह
आजचा दिवस थोडा कमजोर आहे. खर्चही वाढेल. दुसरीकडे, चिंता देखील असतील. प्रथम कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे हे समजणार नाही, म्हणून प्राधान्यक्रम ठरवणे आवश्यक आहे. नोकरीत चांगले परिणाम मिळतील. बुद्धीचा आणि युक्तीचा वापर करून काम वेळेत पूर्ण कराल, यामुळे कौतूक होईल. कौटुंबिक जीवनात तणावपूर्ण स्थिती असेल. घरात अस्वस्थतेचे वातावरण असू शकते. कुटुंबातील लोकांना समजवा. आजारी असलेल्यांना डॉक्टरांकडे घेऊन जा. वैवाहिक जीवनात चढ-उतार असतील. लव्ह लाइफमध्ये आनंदी राहील.

कन्या
आजचा दिवस मध्यम आहे. मनात राग जास्त असेल, त्यामुळे स्थिती समजून घेण्यात थोडी अडचण येऊ शकते. नोकरीत आनंदी व्हाल, कारण चांगले उत्पन्न मिळेल. बचत करण्यात यश येऊ शकते. एखाद्या पवित्र नदीच्या पाण्यात स्नान करण्याची संधी मिळू शकते. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या वाढत्या रागामुळे अस्वस्थ व्हाल. प्रेमसंबंधात प्रामाणिकपणाचा लाभ मिळेल आणि प्रिय व्यक्ती तुम्हाला मान देईल. कौटुंबिक जीवन शांततेने भरलेले असेल.

तुळ
आजचा दिवस उत्तम आहे. मनात आनंद होईल. गोड बोलण्याने आणि मजेदार शैलीने कुणालाही आपलेसे कराल. यामुळे वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले राहील. जोडीदाराला तुमच्याबद्दल आकर्षण वाटेल. लव्ह लाइफमध्ये दिवस चढ-उतारांनी भरलेला राहील. प्रिय व्यक्तीची ओळख कुटुंबातील सदस्यांशी करू न देऊ शकता. नोकरीत चांगले परिणाम मिळतील. व्यवसायात काम पुढे नेण्याची संधी मिळेल. आरोग्य मजबूत राहील.

वृश्चिक
आज विचारांमुळे व्यस्त राहाल. मनात एखाद्या गोष्टीबद्दल खूप राग राहील. त्याचा परिणाम कामावर होऊ देऊ नका, अन्यथा त्रास होऊ शकतो. खर्च जास्त होईल. सूखाच्या वस्तूंवर जास्त खर्च कराल. प्रेमसंबंधासाठी दिनमान सामान्य आहे. प्रिय व्यक्ती एखाद्या गोष्टीवरून राग दर्शवू शकते. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या वागण्याने आनंद होईल. आपल्याला कसे आनंदी ठेवावे हे जोडीदारास समजेल. तुमच्यात चांगली बॉन्डिंग असेल, ज्यामुळे नाते मजबूत होईल. आरोग्याची काळजी घ्या. बदलत्या हवामानामुळे आजारी पडू शकता.

धनु
आजचा दिवस सामान्य आहे. खर्चाकडे लक्ष दिले तर वाढलेल्या उत्पन्नाचा फायदा घेऊ शकता. कौटुंबिक जीवनात थोडा तणाव असेल. आईला एखाद्या गोष्टीवरून राग येईल, परंतु आपण त्यांचे मन वळवाल. कामात स्थिती तुमच्या बाजूने राहील. तुमच्या पद्धतीने काम मागील लावा. वैवाहिक जीवनात आनंदी राहाल. जोडीदारामुळे एखादा चांगला फायदा मिळू शकतो. प्रेम संबंधात इच्छेची पूर्तता करण्याचा दिवस आहे. प्रिय व्यक्ती पूर्णपणे रोमँटिक असेल. तुमच्या मनातही प्रेम असेल. आरोग्य चांगले राहील. सौम्य ताप येण्याची शक्यता आहे.

मकर
आजचा दिवस चांगला आहे. समाजसेवेची तीव्र इच्छा मनामध्ये जागृत होईल. इतरांच्या हितासाठी काम कराल. इन्कम वाढेल, खर्च नियंत्रणात राहील. आर्थिक मजबुती येईल. नोकरीत खूप चांगले काम कराल. ऑफिसमधील अनावश्यक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी कामावर लक्ष केंद्रित केले तर ते अधिक चांगले ठरेल. व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनात काही नवीन अपेक्षा निर्माण करू शकता, जोडीदाराचा पाठिंबा पूर्णपणे मिळेल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीचे मन जिंकण्यात यशस्वी व्हाल.

कुंभ
आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. खर्चात अचानक वाढ होऊ शकते, ज्यामुळे चिंता वाढेल. मानसिक ताणतणावही असेल. आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. आजारी पडू शकता. नोकरीसाठी दिनमान चांगले आहे. परंतु अहंकारात येऊन कोणाशीही भांडू नका. कामाचे चांगले परिणाम मिळतील. बचत करण्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक जीवनात थोडे नाराज दिसाल. कारण जोडीदाराचा पाठिंबा न मिळाल्यामुळे ते थोडे दुःखी होऊ शकता. प्रेमसंबंधात खूप आनंदी राहाल. प्रिय व्यक्तीसोबत कुठेतरी फिरायला जाऊ शकता.

मीन
आजचा दिवस उत्तम आहे. उत्पन्नामध्ये मोठी वाढ होईल, ज्यामुळे चेहर्‍यावर हास्य उमटेल. पण रागामुळे एखाद्याशी विनाकारण भांडण होऊ शकते. हे टाळण्याचा प्रयत्न केला तर दिवस उत्तम असेल. भाग्यामुळे यश मिळेल, कामे यशस्वी होतील. नोकरीत मेहनत कराल. वैवाहिक जीवनात थोडा ताण असेल. याचे कारण तुमचे वागणे असू शकते. प्रेमसंबंधात चांगले अनुभव येतील आणि प्रिय व्यक्ती काही समस्या तुम्हाला सांगेल. आरोग्याची काळजी घ्या. आज एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करू शकता.