22 फेब्रुवारी राशिफळ : ‘या’ 4 राशींवर राहिल शनिदेवाची ‘कृपा’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य आहे. दिवसाची सुरूवात चांगली होईल. धनलाभ होऊ शकतो. अचानक धनप्राप्तीमुळे मन आनंदीत होईल, पण जसजसा दिवस पुढे सरकेल, समस्या उत्पन्न होऊ शकतात. जास्त प्रयत्न केले तरी यश अल्पच मिळेल. कुटुंबातील छोट्यांमुळे अडचणी येऊ शकतात. प्रवासात समस्या येऊ शकतात. तुमचे आचारण धार्मिक होईल आणि पूजाअर्चामध्ये मन लागेल. कामाच्या ठिकाणी विनाकारण भांडण होऊ शकते. बॉस तुम्हाला साथ देईल. कुटुंबातही या तणावाचा परिणाम दिसून येईल. दाम्पत्य जीवनासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधात आजचा दिवस अनुकूल आहे.

वृषभ
आजचा दिवस चढ-उताराचा असेल. तुमचे मन प्रसन्न राहिल. दुपारनंतर स्थिती बदलेल. एखाद्या गोष्टीवरून चिडचिड कराल. याचा परिणाम कुटुंबावर सुद्धा होऊ शकतो. कामात चांगले परिणाम दिसून येतील. भाग्यात चढ-उतारामुळे काही कामे होतील तर काही बिघडतील. व्यापारात चांगले परिणाम होतील. प्रेमसंबंधातही चांगले परिणाम दिसून येतील. दाम्पत्य जीवनात अडचणींना तोंड द्यावे लागेल.

मिथुन
आजच्या दिवशी असमंजसपणा जाणवेल. कोणताही मोठा निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. यासाठी मोठा निर्णय घेऊ नका. परंतु, कामात चांगले परिणाम दिसून येतील. व्यापारातही प्रगती दिसेल. पहिल्यापेक्षा आरोग्य चांगले राहिल. परंतु, तणाव जाणवेल. कामात अडचणी येतील. तुमच्या कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठाचे आरोग्य बिघडू शकते. कुटुंबात शांतता राहिल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे.

कर्क
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल नाही. चांगले परिणाम येण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतील. खर्च वाढतील. आरोग्य कमजोर राहिल. इच्छा नसताना प्रवास करावा लागू शकतो. व्यापारात चढ-उताराची स्थिती राहिल. नोकरदारांना चांगले परिणाम दिसून येतील. धनहानी आणि धनलाभ दोन्हीचे योग आहेत. प्रेमसंबंधात वादविवाद होतील. कौटुंबिक जीवनात शांतता राहिल.

सिंह
आजच्या दिवशी आकांक्षा आणखी वाढवाल. उत्पन्नात वाढ झाल्याने मन आनंदित होईल. कौटुंबिक जीवनात वादविवाद होऊ शकतात. हा वाद तुमच्या बाजूने राहिल. व्यापारात आज यश मिळेल आणि एखादा व्यवहार तुमच्या हाती लागेल. व्यापारात चांगला लाभ होईल. सासरच्या लोकांची भेट घ्याल. एखाद्या कार्यक्रमात जाऊ शकता. भाग्य प्रबळ असल्याने एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्यात यश येईल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. दाम्प्त्य जीवनातही आनंद राहिल.

कन्या
दिवस चांगला करण्यासाठी खुप प्रयत्न कराल. याचा परिणाम कार्यक्षेत्रात दिसून येईल. परंतु तेथे विरूद्ध स्थिती झाल्याने काम यशस्वीपणे पूर्ण करू शकणार नाही. ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. कुटुंबातील ज्येष्ठांचे सहकार्य मिळेल. आकांशा वाढवण्यासाठी आणखी काम कराल, ज्याचे परिणामही आपल्याला दिसून येतील. प्रेमसंबंधात दिवस अनुकूल नाही. कुणाशी तरी वाद होऊ शकतो. दाम्पत्य जीवनासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे.

तुळ
आजचा दिवस काही नवीन इच्छा-आकांक्षा घेऊन येईल. दिवसाची सुरूवात थोडी कमजोर होईल, पण जसजसा दिवस पुढे जाईल, भाग्याची साथ मिळेल. आज तुम्ही स्थानांतर करू शकता. व्यापारात दिवस थोडा कमजोर राहिल. कुटुंबातही एखादा तणाव राहू शकतो. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीची प्रकृती बिघडू शकते. धार्मिक कामात मन लागेल. एखाद्या पवित्र नदीत स्नान करण्याचा योग आहे. प्रेमसंबंधात तुमच्या मनात असलेल्या गोष्टी प्रिय व्यक्तीसमोर मांडा. वाद-विवादापासून दूर रहा.

वृश्चिक
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे, असे म्हणता येणार नाही. कारण आज आरोग्यही बिघडलेले राहू शकते तसेच मानसिक दबावसुद्धा जाणवू शकतो. कामात यश मिळेल. मित्रांशी वाद होऊ शकतात. कुटुंबातील वातावरण तुम्हाला शांती आणि समाधान देऊ शकते. कुटुंबातील लोक तुम्हाला सहकार्य करतील. प्रेमसंबंधात आजचा दिवस खुप चांगला आहे. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल. दाम्पत्य जीवनासाठी आजचा दिवस थोडा कमजोर आहे. नोकरदारांनी विचारपूर्वक पुढे जावे. व्यापारात चांगले परिणाम दिसून येतील.

धनु
आजचा दिवस अनेक आव्हाने घेऊन येईल. दाम्पत्य जीवनात दुपारनंतर काही बदल होतील. काही गोष्टी मार्गी लावण्याचा प्रयत्न कराल. जोडीदार एखादी मोठी गोष्ट तुम्हाला सांगू शकतो. व्यापारासाठी दिवस अनुकूल आहे. कौटुंबिक जीवनात आनंद राहिल. आजच्या दिवसात जेवणाबाबत समस्या येऊ शकते. एक तर तुम्ही जेवण अर्धवट टाकाल किंवा चव पसंत येणार नाही. एखादी खुशखबर मिळू शकते. खर्च वाढतील. प्रेमसंबंधासाठी दिवस सामान्य आहे.

मकर
आजचा दिवस जास्त शुभ नाही. आरोग्य बिघडू शकते. खर्चात अचानक वाढ होऊ शकते. कामात अधिक मेहनत करावी लागेल, तेव्हाच थोडे यश मिळेल. जास्त मेजनत करणे जरूरी आहे. कुटुंबात वातावरण ठिक राहिल. प्रॉपर्टीमधून लाभ मिळेल. प्रेमसंबंधात दिवस सामान्य आहे. विरोधकांना तोंड द्याल. धार्मिक कार्य कराल.

कुंभ
आजचा दिवस तुमच्यासाठी खुप चांगला आहे. कुटुंबातील लोकांचा सहवास लाभेल. त्यांच्यासोबत एखादा मोठा निर्णय घेऊ शकता. प्रेमसंबंधात यश मिळेल. नवनवीन क्रिएटिव्हिटीने प्रिय व्यक्तीचे मन जिंकाल. उत्पन्न वाढेल. कामात चांगले परिणाम दिसून येतील. धनवृद्धी होईल आणि मानसिकदृष्ट्याही तुम्ही मजबूत रहाल. दाम्पत्य जीवन आनंदी राहिल.

मीन
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. प्रवासातून लाभ मिळेल. कुटुंबाकडून सहकार्य मिळाल्याने आनंद वाढेल. कुणाशीही विनाकारण भांडण करू नका. यामुळे कुटुंबातील वातावरणही बिघडू शकते. यासाठी लक्ष द्या. कामातील प्रयत्न यशस्वी होतील. कौतूक आणि अभिमान नियंत्रणात ठेवा. बॉसशी भांडण होऊ शकते. तरीही तुमचे मन आशावादी राहिल. दाम्पत्य जीवनात प्रेम राहिल. प्रेमसंबंधात अडचणी येऊ शकतात. प्रिय व्यक्तीसोबत भांडण होण्याची पाळी येऊ शकते. भाग्य मजबूत राहिल्याने काही कामे आवश्य होतील.

You might also like