22 फेब्रुवारी राशिफळ : तुळ

पोलीसनामा ऑनलाईन टीम : तुळ : आजचा दिवस काही नवीन इच्छा-आकांक्षा घेऊन येईल. दिवसाची सुरूवात थोडी कमजोर होईल, पण जसजसा दिवस पुढे जाईल, भाग्याची साथ मिळेल. आज तुम्ही स्थानांतर करू शकता. व्यापारात दिवस थोडा कमजोर राहिल. कुटुंबातही एखादा तणाव राहू शकतो. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीची प्रकृती बिघडू शकते. धार्मिक कामात मन लागेल. एखाद्या पवित्र नदीत स्नान करण्याचा योग आहे. प्रेमसंबंधात तुमच्या मनात असलेल्या गोष्टी प्रिय व्यक्तीसमोर मांडा. वाद-विवादापासून दूर रहा.