22 फेब्रुवारी राशिफळ : धनु

पोलीसनामा ऑनलाईन टीम : धनु : आजचा दिवस अनेक आव्हाने घेऊन येईल. दाम्पत्य जीवनात दुपारनंतर काही बदल होतील. काही गोष्टी मार्गी लावण्याचा प्रयत्न कराल. जोडीदार एखादी मोठी गोष्ट तुम्हाला सांगू शकतो. व्यापारासाठी दिवस अनुकूल आहे. कौटुंबिक जीवनात आनंद राहिल. आजच्या दिवसात जेवणाबाबत समस्या येऊ शकते. एक तर तुम्ही जेवण अर्धवट टाकाल किंवा चव पसंत येणार नाही. एखादी खुशखबर मिळू शकते. खर्च वाढतील. प्रेमसंबंधासाठी दिवस सामान्य आहे.