23 फेब्रुवारी राशिफळ : आज एकादशीला या 6 राशींचा होणार भाग्योदय, इतरांसाठी असा आहे मंगळवार

मेष
आजचा दिवस व्यवसायात नवीन सुधारणा करणारा आहे. नव नवीन संधी प्राप्त होतील. मालमत्ते संबंधित बाबींमध्ये आज उत्तम फायदा होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या मदतीने लक्ष्य साध्य होईल. वडिलांच्या आशीर्वादाने कौटुंबिक व्यवसायातही मोठ्या लाभाची शक्यता आहे. सरकारकडून सन्मान होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी आईच्या आरोग्याची काळजी घ्या, त्यांना शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे, परंतु रात्री उशिरापर्यंत सर्व काही सामान्य होईल. आज आनंददायक बातमी ऐकायला मिळेल.

वृषभ
व्यावसायिकांना आज रोखीची कमतरता भासू शकते, परंतु व्यवहाराच्या बाबतीत काळजी न घेतल्यास नुकसान होऊ शकते. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी एकाग्रता राखली पाहिजे. मित्रांसह लांबचा प्रवास करू शकता. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्यांपासून मुक्ती मिळेल. राजकीय धनप्राप्तीचे योग आहेत. परंतु खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा आर्थिक स्थिती बिघडू शकते. व्यवसायात व्यस्तता जास्त असेल. भविष्याबद्दल चिंताही असेल.

मिथुन
आज वाणी आणि वागणुकीवर संयम ठेवा. समोरच्या व्यक्तीला वाईट वाटणार नाही याची विशेष काळजी घ्या. जर असे झाले तर नुकसान होऊ शकते. व्यवसाय सुरू करण्यासाठी नवीन मार्ग मिळतील. गुंतवणूक देखील फायदेशीर ठरेल. जर पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते आज मिळू शकतात. यासाठी भाग्याची खूप साथ मिळेल. विवेकी आणि बुद्धिमत्तेसह घेतलेले निर्णय व्यवसायात फायदेशीर ठरतील. संततीच्या मुलाच्या भविष्याबद्दल चिंता कराल. कौटुंबिक संपत्तीतही वाढ होईल. आज संध्याकाळी एखाद्या नामकरण सोहळा किंवा इतर सोहळ्यास उपस्थित राहू शकता.

कर्क
आज ऑफिसमध्ये स्वभावाच्या बाबतीत गंभीर राहा. मेहनत केली तरच कामात यश मिळेल. अधिकार आणि जबाबदार्‍या वाढतील. मित्रांकडून निराशा होऊ शकते. भौतिक सुविधांवरही खर्च जास्त होईल. शत्रू त्यांच्या षडयंत्रात यशस्वी होऊ शकणार नाहीत. आनंदी व्यक्तिमत्व असल्याने इतर लोक तुमच्याशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतील, ज्यामुळे प्रियजनांची संख्या वाढेल. विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आशीर्वाद मिळेल. संध्याकाळी कुटुंबातील एखाद्या सदस्याला आरोग्याचा त्रास होऊ शकतो, म्हणून काळजी घ्या.

सिंह
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. जोडीदारासोबतच्या नात्यावर विशेष लक्ष द्या. नात्यातील कटुता आज संपुष्टात येईल. मानसिक ताणतणावातून मुक्ती मिळेल, ज्यामुळे मन आनंदित होईल. व्यवसायात आत्मविश्वासाच्या बळावर केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. जुनी अडकलेली कामे आज थोडे पैसे खर्च करून पूर्ण करता येतील. आज कामाच्या ठिकाणी नवीन योजनांवर काम सुरू होईल. सामर्थ्य पाहून शत्रूही उत्साहित होतील. परोपकार आणि दानशूरतेची भावना वाढेल. अधिकाधिक वेळ धार्मिक विधींमध्ये घालवाल. विद्यार्थ्यांना भविष्याबद्दल थोडी चिंता वाटेल.

कन्या
खुप दिवसापासून एखादी शारीरीक समस्या असेल तर आज तिच्या सुधारणा होईल. संततीच्या भवितव्याशी संबंधित एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. ज्यामुळे कुटुंबात आनंद होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात नवीन संधी मिळतील. कौटुंबिक व्यवसाय चालू ठेवण्यासाठी भावाचे सहकार्य मिळेल. अध्यात्माकडे कल असेल. जोडीदारासोबतचे नातेही दृढ होईल. भागीदारीतील कामात थोडा अडथळा येऊ शकतो, म्हणूनच ते टाळावे.

तुळ
राजकारणात असलेल्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. समाजातील तुमच्या कामाची स्तुती होईल. आयुष्यात काही समस्या असतील तर ती आज नष्ट होईल, ज्यामुळे कौटुंबिक जीवनात शांती व आनंद येईल. आपले म्हणणे खरे सिद्ध करण्यात यशस्वी व्हाल. उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांची रुची वाढेल आणि शैक्षणिक दिशा देखील बदलू शकते. जोडीदारासोबत भविष्यातील योजनांबाबत चर्चा करू शकता. संध्याकाळी वाहनापासून लांब रहा, अन्यथा दुखापतीची भीती आहे. आज कुटुंबात पार्टीचे आयोजन होऊ शकते.

वृश्चिक
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. प्रेमसंबंधात एक नवी सुरुवात होईल आणि नाते आणखी मजबूत होईल. जोडीदाराशी बोलण्याने नात्यातील गैरसमज दूर होतील. प्रेम वाढेल. भागीदारीत काम करण्याचा विचार करत असाल तर काळजी घ्या, अन्यथा वाद होण्याची शक्यता आहे. नोकरीत परिवर्तनची संधी आहे. संततीने केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे सन्मान वाढेल. संध्याकाळी अचानक पाहुण्यांचे आगमन झाल्याने खिशावरील भार वाढेल. संध्याकाळ मित्रांसह मजेमध्ये घालवाल.

धनु
रोजगाराच्या क्षेत्रात जे अडथळे येत होते ते आज दूर होतील. एखादा छोटा प्रवास कराल, जो लाभदायक ठरेल. व्यवसायात कठोर प्रयत्नांनी इच्छापूर्वी होईल. आई-वडीलांचे आशीर्वाद प्राप्त होतील. कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन झाल्याने आनंद वाढेल. जोडीदाराने कार्यक्षेत्रात प्रगती केल्यामुळे मन आनंदित होईल. प्रेमसंबंधात नवे संबंध प्रस्थापित होतील. संध्याकाळचा वेळ धार्मिक समारंभासाठी घालवाल. शुभ कार्यातील खर्चाने कीर्ती वाढेल. समाजिक कामाची दखल घेतल्याने सरकारकडून तुमचा सन्मान होण्याचे प्रबळ योग आहेत. आज आरोग्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.

मकर
आज कार्यक्षेत्रातील एखादा सहकारी आपल्याविरूद्ध कट रचू शकतो, म्हणून सावधगिरी बाळगावी लागेल. कुणालाही मागितल्याशिवाय सल्ला देऊ नका. कारण त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. आज संध्याकाळचा वेळ चांगल्या कामात घालवाल. ज्यामुळे मन शांत आणि प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना मेहनत करावी लागेल, अन्यथा अपयशाला सामोरे जावे लागेल, म्हणून एकाग्रतेने काम करा. आज पूर्वजांचे धन मिळण्याचीही मोठी शक्यता आहे, यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी करू शकता.

कुंभ
आज कुटुंबातील लहान मुलांबरोबर चांगला वेळ घालवाल. भविष्यासाठी काही बचत योजनेतही गुंतवणूक कराल. व्यावसायिक वर्गासाठी नवीन योजना पूर्ण करण्यासाठी शुभ काळ आहे. मित्र आणि कुटुंबाच्या पाठिंब्याने रखडलेली कामे पूर्ण होतील. चांगले नवीन मित्रही मिळतील. काही चांगल्या कामांमुळे पैसे मिळतील, ज्यामुळे संपत्ती वाढेल. आजचा दिवस कार्यक्षेत्रात व्यस्त राहाल. परंतु व्यस्त असूनही प्रेमसंबंधासाठी वेळ काढाल, ज्यामुळे जोडीदार खुश होईल.

मीन
एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रॉपर्टीशी संबंधित काही वाद असल्यास तोही आज संपेल. कुटुंबातील समस्या दूर करण्यास प्राधान्य द्याल. धनलाभाचे प्रबळ योग आहेत. कौटुंबिक व्यवसायात वडिलांचे मार्गदर्शन आणि समर्थन मिळेल. गुरूंच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीचा विकास होईल. आजोळकडून मानसन्मान मिळेल.