23 जानेवारी राशिफळ : मेष, मिथुन आणि सिंह राशीच्या लोकांना भाग्य देईल साथ, इतरांसाठी असा आहे शनिवार

मेष
धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये काम करण्याची इच्छा होईल. रोजगाराच्या क्षेत्रात क्षमता सुधारण्याचा प्रयत्न कराल. काही नवीन संधी शोधण्यात यश मिळेल. सासरच्या लोकांमधील संबंध सुधारतील. सासरच्या लोकांच्या पाठिंब्याने प्रॉपर्टीच्या मालमत्तेची समस्या संपवू शकता. व्यवसायात सकारात्मक बदल करण्याची स्थिती असेल. भविष्यात फायद्याचा मार्ग खुला होईल. घराच्या सजावटीसाठी खर्च होऊ शकतो. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात काही अडचणी येतील. आर्थिक स्थिती आव्हानात्मक असू शकते. दिवस मावळल्यानंतर आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ
आज सुरू केलेल्या कामात चांगले यश मिळू शकते. आपल्या हाताखालील लोक आणि उपभोगाशी संबंधित कामांमध्ये अडचणी येऊ शकतात. चांगल्या कामामुळे कार्यक्षेत्रात चांगले कौतुक होईल. बॉस प्रभावित होईल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीची सोबत लाभेल आणि दिवस आनंदाने जाईल. कुटुंबातील सदस्याकडून एखादी चांगली बातमी मिळेल. वडिलांच्या आरोग्याचा त्रास पाहून अस्वस्थ होऊ शकतो. स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्या. नातेवाईक आणि शेजार्‍यांकडून मदत मिळेल.

मिथुन
कामाचा उत्साह असेल, ज्यामुळे रखडलेली कामे सुद्धा वेळेवर पूर्ण होतील. प्रभाव वाढेल आणि परदेश संबंधित कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. कौटुंबिक जीवनात वाद आणि मतभेद असतील, जे मानसिक ताण देतील. कार्यक्षेत्रात काम लक्षपूर्वक करावे लागेल, कारण घाईत किंवा विचार न करता काम केले तर कामात गडबड होऊ शकते. जोडीदाराशी संबंध मधूर असतील आणि ते बचत करण्यासाठी मदत करतील. दिवस मावळल्यानंतर वाहनात बिघाड होऊ शकतो, आणि खर्चामध्ये वेगाने वाढ होईल. परंतु घरी पोहोचल्यानंतर मुलांबरोबर चांगला वेळ घालवाल.

कर्क
आज विद्यार्थ्यांना शिक्षणात काही अडथळ्यांचा सामना करावा लागेल, यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. मित्र आणि भावंडांच्या सहकार्याने काही नवीन संधी मिळतील. कार्यक्षेत्रात जोडीदाराच्या सहकार्याचा फायदा होईल आणि नातेही मधुर असेल. बुद्धीने काम कराल आणि काही नवीन कामांमध्ये यश मिळवाल. कौटुंबिक जीवनात प्रॉपर्टीचे वाद उद्भवू शकतात. मोठ्या आणि अनुभवी व्यक्तीची मदत कामात यश देईल. संध्याकाळी दानधर्म पुण्याचे काम कराल. चांगली बातमी मिळू शकते.

सिंह
ग्रहांची स्थिती आज आयुष्यात अस्थिरता आणू शकते. कामाच्या क्षेत्रातही ही अस्थिरता कायम राहील. मानसिकदृष्ट्या ताण देईल. कामात वाद होण्याची शक्यता आहे. विनाकारण कोणत्याही वादात पडू नका, अन्यथा कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागेल. यशासाठी विद्यार्थ्यांना एकाग्रता दर्शविली पाहिजे. कुटुंबातील समस्या धैर्याने आणि समजून घेऊन सोडवा. कुटुंबातील ज्येष्ठांच्या मदतीने काही नवीन कामात हात टाकाल ज्यामधून सरकारकडूनही लाभ मिळेल. व्यवसायात पैशांची अडचण येऊ शकते. संध्याकाळी धार्मिक कामांकडे कल वाढेल. सुविधांवर पैसे खर्च कराल.

कन्या
कौटुंबिक वातावरण सुखद राहील. कार्यक्षेत्रात प्रभाव वाढेल. काही अनावश्यक खर्च त्रास देतील, जे करावे लागतील. प्रेमसंबंधात नाविन्य येईल. कुटूंबाचा पाठिंबा मिळेल. कार्यक्षेत्रातील अडथळ्यांपासून मुक्तता होईल, परंतु तरीही जोखीमपासून दूर रहा. विद्यार्थ्यांना शिक्षणात काही आर्थिक आव्हाने होती, ती दूर होतील. लोकांना आपली कार्यशैली आवडेल आणि आदर वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी कुठेतरी गुंतवणूक करू शकता.

तुळ
कार्यक्षेत्रात काही नवीन कामे हातात येतील आणि यामध्ये वरिष्ठ अधिकारी सहकार्य करतील. व्यापारात नवीन स्त्रोत मिळण्याची शक्यता आहे. काम वाढेल. कौटुंबिक जीवनात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांच्या अधिकारात वाढ आणि जबाबदारी मिळू शकते. सामाजिक कार्य करत असाल तर काही मान्यवरांचे सहकार्य मिळेल आणि लोक तुमची स्तुती करतील. व्यवसायात जास्त काम केल्याने आरोग्य घसरू शकते. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्ती पूर्ण सहकार्य करेल आणि मनात आदर वाढेल.

वृश्चिक
कौटुंबिक व्यवसायात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, परंतु वडिलांच्या पाठिंब्याने या स्थितीतून बाहेर याल. संततीला नोकरी मिळण्याची शक्यता आहे. खुप व्यस्त असाल. परंतु प्रेमसंबंधासाठी वेळ काढाल, ज्याचा आनंद प्रिय व्यक्तीच्या चेहर्‍यावर असेल. आर्थिकदृष्ट्या प्रबळ योग आहेत, पण काही अनावश्यक खर्चही होऊ शकतो. स्पर्धा परीक्षेचा निकाल लागला तर त्यात यश मिळू शकते. एखाद्या मंगल कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. घरात एखादी चांगली बातमी येऊ शकते.

धनु
आजचा दिवस सामाजिक कार्यात व्यस्त ठेवेल. कौटुंबिक जीवनात एखादा तणाव असेल. एखाद्या विशिष्ट विषयावरील चर्चा मतभेदांना कारणीभूत ठरू शकते. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा स्थिती हाताबाहेर जाऊ शकते आणि नात्यात पेच निर्माण होऊ शकतो. विद्यार्थ्यांना यशासाठी मेहनत करावी लागेल. खाण्यापिण्याची पूर्ण काळजी घ्या आणि आरोग्याबद्दल जागरूक रहा. भौतिक सुविधांमध्ये घट होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. कुणालाही मनातील गोष्टी सांगू नका. संध्याकाळी मंदिरात गेल्याने समाधान मिळेल.

मकर
वाणीमुळे खुप अनुकुल स्थितीचा लाभ मिळेल. समाजातील मान्यवर, प्रभावशाली व्यक्ती आणि राजकीय लोकांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात निर्णय घेण्याची क्षमता आज फायदा देईल. योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे लाभाचा मार्ग मोकळा होईल. वाद-विवादात यश मिळण्यासाठी दिवस चांगला आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसंदर्भात काही अडचणींना सामोरे जावे लागेल. जोडीदार तुम्हाला मदत करत असेल तर आज त्याची प्रगती होईल आणि त्यांचे उत्पन्न वाढू शकते. प्रेमसंबंधातील दरी कमी करण्यात यश मिळेल. संध्याकाळ भजनात आणि दान कार्यात घालवू शकता.

कुंभ
व्यवसायासाठी दिवस यशदायक आहे. नवीन कामे करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे व्यवसायाची स्थिती मजबूत होईल. जुन्या समस्यांपासून मुक्ती मिळेल. अंधारात प्रकाशाचा किरण दिसेल. कौटुंबिक संबंध सुधारतील. वडील एखाद्या कामात खूप मदत करतील. विरोधकांवर मात कराल आणि कार्यक्षेत्रात स्थिती प्रबळ राहील. संध्याकाळी मनोरंजन आणि मित्रांसाबत फिरायला जाण्याची संधी मिळेल.

मीन
आज नोकरी मिळण्याची संधी आहे. नोकरीसाठी अर्ज केला असेल तर आज यश मिळू शकते. कौटुंबिक जीवन आनंददायी असेल. मोठ्या भावांचे सहकार्य मिळू शकते. संतती आणि जोडीदाराबाबत प्रेमाची भावना जाणवेल. त्यांच्याबरोबर चांगला वेळ घालवाल. कुटुंबातील ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल, आणि त्यांच्या सल्ल्याने काम केल्यास एखादे अडकलेले काम पूर्ण होईल. व्यापारात धनलाभ होईल. व्यवसायिक प्रवास घडेल. लग्नाच्या संबंधात काही अडचण असल्यास ती आज दूर होईल. आज कुणाशीही पैशांचा व्यवहार करणे टाळा. परंतु कर्जाबद्दल चांगली बातमी मिळू शकते.