24 जानेवारी राशिफळ : मिथुन, तुळ आणि धनु राशीला व्यवसायात होऊ शकतो फायदा, इतरांसाठी असा आहे रविवार

मेष
चंद्र राहुसोबत दुसर्‍या स्थानात विराजमान असेल आणि राशीत मंगळची उपस्थितीने डोकं आणि जीभ दोन्हीत तिखटपणा असेल. ज्यामुळे काही कामे बिघडू शकतात. कौटुंबिक जीवनात संतुलन राखण्याची आवश्यकता आहे. यामुळे घरात आनंद आणि शांती कायम राहील. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांकडून सहकार्य मिळेल. परोपकारी निती आणि इतरांचे चांगले करण्याची सवय शासन किंवा प्रशासनाकडून सन्मानित होऊ शकते. जुन्या मित्रांचे एखाद्या खास कामात सहकार्य मिळेल. मित्र बनविण्यातही यश मिळेल. काही नवीन लोकांची भेट होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराचा संपूर्ण पाठिंबा मिळत राहील, आयुष्य त्यांच्याबरोबर व्यवस्थित व्यतीत कराल. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये काही नवीन संधी मिळू शकतात. संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवाल.

वृषभ
राशीत चंद्र आणि राहूच्या ग्रहाणाचा योग होईल, यामुळे मानसिक ताण वाढेल आणि महत्त्वाची कामे लटकतील. आज धावपळ असेल आणि कामात एखादा निर्णय घेण्यात थोडी अडचण होईल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी काही लोकांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात रखडलेली कामे पूर्ण झाल्यामुळेकामात वेग असेल. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढेल. दिवस गुंतवणूकीसाठी अनुकूल आहे. संपूर्ण लाभ मिळेल. कौटुंबिक जीवनात आईचा पूर्ण पाठिंबा मिळेल. कौटुंबिक मालमत्ता मिळण्याची स्थिती बनू शकते. संध्याकाळी एखाद्या शुभ कार्यात सहभागी होऊ शकता.

मिथुन
आज आरोग्य कमजोर राहील. अनावश्यक काळजीने ग्रस्त रहाल. आज विनाकारण खर्च होईल. डॉक्टरांना भेटावे लागू शकते. राजकारणात कौतुक होईल. व्यावसायिकांना काही नवीन काम मिळू शकते, जे फायद्याचे ठरेल. काही मान्यवर लोकांमुळे लाभाचा सौदा मिळू शकतो. कौटुंबिक मालमत्ता वाढेल. एखाद्या नवीन कामाचा विचार कराल. संध्याकाळी संगीताचा आनंद घेतल्याने समाधान जाणवेल.

कर्क
आर्थिक आघाडीवर दिवस मजबूत आहे. पैशाच्या समस्या संपतील. भाग्याची तुमच्यावर थेट नजर राहील. कार्यक्षेत्रात मेहनतीचे कौतुक होईल. प्रयत्नांचे फळ मिळेल. नेहमी नकार देणार्‍यांकडून आज विशेष प्रेम आणि सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. मुलाच्या भविष्याबद्दलच्या चिंतेतून मुक्त व्हाल. आई-वडीलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. भाऊ-बहिण तुमच्या कामात सहकार्य करतील. आजचा दिवस व्यवसायासाठी अतिशय अनुकूल आहे. गुंतवणूक टाळा. सुविधांवर पैसे खर्च कराल. विरोधकांपासून सतर्क राहणे आवश्यक आहे. कौटुंबिक गरजा पूर्ण कराल.

सिंह
खर्चात वाढ होईल. डोळ्यांशी संबंधित दुखणे असू शकते. सामाजिक प्रतिष्ठा लक्षात घेऊन कोणत्याही चुकीच्या कामात पडू नका. कायद्याच्या विरोधात जाऊ नका. संध्याकाळी काही महत्त्वपूर्ण कामे पूर्ण झाल्याची बातमी मिळेल. कर्ज घेणे टाळा, अन्यथा अडचणीत येऊ शकता. कौटुंबिक जीवनात तणाव असेल. वाद उद्भवू शकतो. परस्पर संवाद आणि कार्यक्षमतेमुळे समस्या कमी करू शकता. शारीरिकदृष्ट्या दिवस कमजोर आहे. आरोग्याची काळजी घ्या. भाग्याची प्रबळता कामांमध्ये यश मिळवून देईल.

कन्या
एकीकडे भाग्याची साथ मिळेल, तर दुसरीकडे होत असलेली कामे बिघडतील. मानसिक ताण हावी होऊ देऊ नका. लांबचा प्रवास होईल. निर्भय राहाल आणि कामात धैर्य दर्शवाल. ज्यामुळे अवघड कामे देखील सहजपणे पूर्ण होतील. संततीकडून एखादी शुभ माहिती मिळू शकते. कुटुंबातील वडीलधार्‍यांचा पाठिंबा मिळू शकतो. त्यांचे आशीर्वाद पुढे घेऊन जातील. अध्यात्मात रस वाढेल. गोड वाणीने नाराज लोकांना सुद्धा समजवण्याचा प्रयत्न कराल. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. लोक तुम्हाला समजण्यात चूक करू शकतात.

तुळ
आज मानसिक ताण वाढू शकतो. काही अनावश्यक चिंता मनाला खाईल. शांती आणि संयम दाखवावा लागेल. सामाजिक कार्य करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे मन आनंदित होईल. कार्यक्षेत्रात अधिकार आणि पदामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक मालमत्ता वाढेल. विद्यार्थ्यांना ज्येष्ठांचे आणि शिक्षकांचे मार्गदर्शन मिळेल. नवीन कामात गुंतवणूकीचा फायदा होईल. बिझनेसमध्ये धनलाभाचा योग आहे. प्रेमसंबंधात नवीन नातं जोडलं जाऊ शकतं आणि त्यातच पुढे जाल. कार्यक्षेत्रातील एका मोठ्या अधिकार्‍याचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे कामात यश मिळू शकते. आजचा दिवस शुभ परिणाम देणारा आहे.

वृश्चिक
कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. विरोधकांवर मात कराल. वैवाहिक जीवनात थोडा तणाव असेल, परंतु जोडीदारासोबत खरेदीसाठी जाऊ शकता. एखाद्या गोष्टीमुळे मन शांत असेल. व्यवसायात यश मिळण्यात थोडा विलंब होईल. मनातील गोष्टी कोणा समोरही उघड करू नका, गुप्त ठेवा. कोणाशीही वाईट बोलू नका कारण त्याचा परिणाम नात्यावर होऊ शकतो, विशेषतः लव्ह लाइफ खराब होऊ शकते. रागामुळे नात्यात तणाव वाढू शकतो. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खूप धावपळ करावी लागेल. संध्याकाळी सर्व समस्या धैर्यामुळे हळूहळू संपवण्यात यश येईल. विरोधकांवर विजय मिळवाल.

धनु
आज चांगले कार्य करण्यासाठी विद्या, बुद्धि आणि ज्ञानात वाढ दिसून येईल, लोकांचे चांगले करणे, परोपकाराच्या भावनेसह दान आणि धर्म भावना विकसित होईल. भाग्याकडून सहकार्य मिळेल. व्यवसायात प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक फायदा होईल. काही वादविवाद असतील तर निर्णय आपल्या बाजूने लागेल. व्यवसाय वाढेल. गाडी काळजीपूर्वक चालवा आणि खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.

मकर
मेहनतीचे फळ वेळ मिळण्याची वेळ आली आहे. जे तुम्हाला आवडतात ते आज स्वतःच तुम्हाला प्रपोज करू शकतात. मात्र, जर तुम्ही प्रपोज केले तर यश मिळू शकते. एखादी महागडी वस्तू मिळेल, ज्यामुळे मन आनंदित होईल. सासरच्या लोकांकडून मान सन्मान मिळू शकतो. कुटुंबात विनाकार खर्च होऊ शकतो, जो तुम्हाला करावा लागू शकतो. व्यवसायात नवीन कामे करण्याचा विचार कराल, तेव्हा रखडलेली कामे सुद्धा पूर्ण कराल. गुंतवणूक करू शकता. मौल्यवान वस्तू मिळेल, ज्यामुळे आनंद होईल. कुटुंबात असा प्रवास होईल ज्यामधून फायदा होईल.

कुंभ
आई-वडीलांशी संबंध सुधारतील. परंतु जोडीदाराशी वाद होऊ शकतो. बुद्धीने काम करण्याचा दिवस आहे. काही नवीन करण्याची स्थिती असेल. खर्च वाढेल, जो इच्छा असूनही थांबवू शकणार नाही. कार्यक्षेत्रात तुमच्या यशाने विरोधकांचा जळफळाट होईल. खुप दिवसांनी काही जुन्या मित्रांची भेट होईल. खर्चाची काळजी घ्या. संध्याकाळी एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाऊ शकता.

मीन
आज व्यवसाय वाढीसाठी आईचा पूर्ण पाठिंबा मिळेल. त्यांची कृपा, प्रेम आणि आशीर्वादांमुळे कामे होतील. संततीच्या भविष्यातील योजना बनवाल, यामुळे त्यांच्या समस्येचे निराकरण होऊ शकते. प्रेमसंबंध सुधारण्यासाठी सुसंवाद साधणे फार महत्वाचे आहे. सामाजिक आदर वाढेल, जो मनोबल वाढवेल. एखादी नवीन योजना बनवल्याने लाभ मिळू शकतो. कौटुंबिक जीवनात थोडा तणाव असू शकतो. मित्रांचे सहकार्य मिळेल.