24 सप्टेंबर राशीफळ : ‘या’ 5 राशींना मिळू शकतो ‘नफा’, इतरांनी दिवसभर राहावे ‘सावध’

मेष
आजचा दिवस उत्तम आहे. भाग्य प्रबळ असल्याने बिघडलेली कामे मार्गी लागतील. रिअल इस्टेटशी संबंधित प्रकरणांमध्ये दिवस तुमच्या बाजूने असेल. कामासाठी दिवस मजबूत आहे. आरोग्यही चांगले राहील. जोडीदारासोबत भांडण होऊ शकते. शांत रहा. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे.

वृषभ
आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला आहे. मनात वेगवेगळे विचार येतील. धार्मिक कामात मन लागेल. खर्चात अचानक वाढ झाल्याने चिंताग्रस्त होऊ शकता. आरोग्य ठीक राहील. कामासाठी दिनमान थोडे कमजोर आहे, म्हणून सावधगिरी बाळगा. विवाहित लोकांच्या जीवनात काही गैरसमज होऊ शकतात. प्रेमात प्रिय व्यक्तीच्या रागाचा सामना करण्यासाठी तयार राहा.

मिथुन
आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात नफ्याचा मार्ग सापडेल. विवाहित लोकांच्या जीवनासाठी चांगला दिवस आहे. जोडीदार एक परिपूर्ण जीवनसाथी असल्याचे दिसेल. प्रेमात दिवसाचा आनंद घ्याल, कोणत्याही प्रकारचा संघर्ष टाळा. कामासाठी दिनमान मजबूत आहे. प्रमोशन मिळण्याचा योग आहे.

कर्क
आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असू शकतो. खर्चामध्ये अचानक वाढ होईल. आजारी पडू शकता, म्हणून सावधगिरी बाळगा. विवाहित जीवनात प्रामाणिकपणा एकमेकांच्या मनात स्थान निर्माण करेल. प्रेमात प्रिय व्यक्तीच्या बदलत्या स्वभावामुळे किंचित दु:खी होऊ शकता. कामासाठी दिनमान मजबूत आहे. खूप आनंदी व्हाल.

सिंह
आजचा दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधात खूप आनंदी राहाल. प्रिय व्यक्तीसोबत खुप वेळ घालवाल. विवाहित व्यक्तींच्या जीवनातील तणाव कमी होईल. आरोग्य चांगले राहील. मित्रांसह मजा करण्याची संधी मिळेल. कामासाठी दिवस सामान्य असेल. भाग्याची जोरदार साथ असल्याने कामांमध्ये यश मिळेल. रखडलेले काम मार्गी लागेल.

कन्या
आजचा दिवस सामन्य फलदायी आहे. राग आटोक्यात ठेवा, अन्यथा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विवाहित लोकांच्या जीवनात तणाव वाढू शकतो. प्रेमात आज आनंदी राहाल आणि प्रिय व्यक्तीकडून काही चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील. कामासाठी दिवस चांगला आहे. उत्पन्नही वाढेल, ज्यामुळे मन प्रसन्न होईल.

तुळ
आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबातील तरूण सदस्यांमुळे मन आनंदित होईल. मित्रांशी संवाद साधाल. काही जुन्या आठवणी ताज्या होतील. आरोग्य चांगले राहील. विवाहित लोकांच्या जीवनात चढ-उतारांचा दिवस असेल. प्रेमसंबंधात प्रेमाबाबत कुटुंबातील सदस्यांना सांगाल. कामासाठी दिवस सामान्य आहे.

वृश्चिक
आजचा दिवस उत्तम आहे. पैसा येईल. पैशाची स्थिती चांगली असेल, ज्यामुळे बळकटी येईल. आरोग्यामध्ये चढ-उतार होऊ शकतात, म्हणून सावधगिरी बाळगा. उत्पन्न वाढल्यामुळे मन प्रसन्न होईल. विवाहित व्यक्तींच्या जीवनात नाविन्य जाणवेल. प्रेमसंबंधासाठी दिनमान चांगले आहे.

धनु
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. बुद्धिमत्ता, कौशल्य आणि अनुभव आज आयुष्यात काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा देईल. यामुळे कामातही चांगले यश मिळेल आणि तुमचे कौटुंबिक जीवनही सुखी होईल. एकमेकांबद्दल प्रेम वाढेल. प्रेमसंबंधात खूप तणाव असूनही नात्यात प्रेम जाणवेल. भाग्यामुळे कामात केलेली मेहनत यशस्वी होईल.

मकर
आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला आहे. खर्च वाढेल. तब्येत सुधारेल. उत्पन्न सामान्य राहील. काही नवीन कल्पना मनात येतील. ज्यामुळे उत्पन्न वाढविण्यात मदत होईल. प्रेमसंबंधासाठी दिनमान खूप चांगले आहे. विवाहिक जीवनात रोमान्स असेल. भाग्यामुळे कामांमध्ये यश मिळेल.

कुंभ
आजचा दिवस चांगला आहे. उत्पन्न वाढेल, ज्यामुळे मनाला आनंद होईल. खर्च कमी होईल. आरोग्यामध्ये थोडी सुधारणा होईल. कामात दिनमान चांगले असेल. मेहनत करावी लागेल. कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. अचानक काहीतरी चांगले घडू शकते. विवाहित व्यक्तींच्या जीवनात थोडासा तणाव असेल. प्रेमात दिवसाचा आनंद घ्याल. प्रिय व्यक्तीला लग्नाचा प्रस्ताव देऊ शकता.

मीन
आजचा दिवस चांगला आहे. कामाची पूर्ण काळजी घ्याल. अनुभव आपल्यासाठी उपयुक्त ठरेल. कठीण असाइनमेंट्स सुलभतेने पूर्ण कराल, ज्यामुळे प्रशंसा मिळेल. विवाहित लोकांच्या जीवनात जोडीदाराची वागणूक त्रास देईल. दिनमान प्रेमसंबंधासाठी खूप चांगले आहे. आरोग्य चांगले राहील.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like