25 एप्रिल राशीफळ : आज कन्या राशीत चंद्र, वृषभ आणि कर्क राशीसह 5 राशींना फायद्याचे संकेत, इतरांसाठी असा आहे रविवार

मेष
आजचा दिवस उत्तम यशदायक आहे. भौतिक सुख-सुविधांवर खर्च कराल. कामात वाढ होईल. कुटुंबातील लोक मदत करतील. व्यापारात विकासाचे योग. सायंकाळी एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. व्यापारात एखादी डील फायनल होईल. मन आनंदी होईल. कुटुंबात पार्टी आयोजित करू शकता.

वृषभ
आजचा दिवस संमिश्र आहे. तिर्थस्थळाचा प्रवास करू शकता. ज्यामुळे मनशांती, समाधान मिळेल. एखाद्या कायदेशीर वादात यश मिळू शकते. स्थानांतरांची योजना यशस्वी होऊ शकते. कुटुंबातील मंगलमय वातावरणामुळे आनंद होईल. संततीकडून थोडा तणाव असू शकतो. संपत्ती खरेदी करण्यासाठी दिवस उत्तम. यामध्ये भाग्याची भरपूर साथ मिळेल.

मिथुन
आजचा दिवस प्रगतीचा आहे. जी कामे पूर्ण होण्याची आशा आहे तीच करा. रचनात्मक काम करणार्‍यांना यश मिळेल. भाग्याची साथ असल्याने अर्धवट कामे पूर्ण कराल. व्यापारात नवी योजना सुचू शकते. नोकरीत कार्यालयात कौतुक होईल, आनंदी व्हाल. कौटुंबिक बिझनेससाठी जोडीदाराचा सल्ला उपयोगी ठरेल. आईशी वाद होऊ शकतो.

कर्क
आजचा दिवस खुपच चांगले परिणाम देईल. व्यापारात जे काम मन लावून कराल, त्यामध्ये यश मिळेल. रात्री विवाह सोहळ्याला जाऊ शकता. मित्रांसोबत मजामस्ती कराल. ज्यामुळे तणाव कमी होईल, मन हलके होईल. अर्धवट कामे पूर्ण करून काही महत्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल. संततीकडून एखादी शुभवार्ता समजू शकते. विद्यार्थ्यांना परीक्षेतील मेहनतीचे उत्तम परिणाम मिळतील.

सिंह
आज धावपळ आणि व्यस्तता राहील, परंतु धर्म, अध्यात्म आणि अभ्यासाठी थोडा वेळ काढाल. कुटुंबातील सदस्यांशी एखाद्या विषयावर चर्चा करू शकता. कार्यक्षेत्रात काही अधिकारी कामात बाधा आणू शकतात, यासाठी पूर्ण लक्ष देऊन काम करा. व्यापारात उत्तम लाभ होईल, आर्थिकस्थिती मजबूत होईल, आनंद वाढेल. जोडीदारासाठी एखादी भेट खरेदी करू शकता.

कन्या
आजचा दिवस संमिश्र आहे. आज बोलणे आणि वागण्यात सयंम आणि सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, तरच कामे होतील. कुटुंबात शुभकार्यावर चर्चा होऊ शकते, ज्यामध्ये तुमच्या सल्ल्याची आवश्यकता असेल. जवळपासच्या लोकांशी वाद होऊ शकतो, यासाठी वाणीवर संयम ठेवा. कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. विश्वासाने जे काम कराल त्यामध्ये भरपूर यश मिळेल. संपत्तीत गुंतवणुकीसाठी वेळ उत्तम आहे.

तुळ
आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन आला आहे. दिवसभर लाभाच्या संधी मिळतील. एखादी डील रखडली असेल तर ती फायनल होईल. नवीन प्रोजेक्टवर सुद्धा काम सुरू होऊ शकते. जमीन, मालमत्तेशी संबंधीत प्रकरणात कुटुंब आणि जवळपासचे लोक समस्या निर्माण करू शकतात. काही प्रकरणात एखादा महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर जोडीदाराचा सल्ला आवश्य घ्या. जर काही कामे मोठ्या कालावधीपासून रखडली असतील तर ती पूर्ण होतील. अडकलेले पैसे मिळतील.

वृश्चिक
उपजिविकेच्या क्षेत्रातील लोकांना चांगल्या संधी मिळतील. नोकरीत चांगली इन्क्रीमेंट मिळू शकते. व्यापारात नाविन्य आणल्यास भविष्यात लाभ होईल. पोटदुखी आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. यासाठी खाण्या-पिण्याकडे लक्ष ठेवा, आजारी पडू शकता. कुटुंबात शांतता आणि स्थिरता असेल. भाऊ-बहिणीसोबत मजामस्ती कराल, नाते आणखी मजबूत होईल.

धनु
आजचा दिवस थोडा आव्हानात्मक आहे. सावधगिरी आणि सतर्कता बाळगा. बिझनेसमध्ये थोडी जोखीम घेतल्यास भरपूर लाभ मिळेल. एखाद्या आपल्या माणसासाठी काही पैशांची व्यवस्था करावी लागू शकते. काही जातकांना दुसर्‍या नोकरीची ऑफर मिळू शकते. विवाहासाठी इच्छुक जातकांसाठी उत्तम प्रस्तावर येतील. संततीच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी प्रवास करावा लागू शकतो. सासरच्या बाजूकडून धनलाभ होऊ शकतो.

मकर
आजचा दिवस सामान्य आहे. दाम्पत्य जीवनात मधुरता येईल. भागीदारीच्या कामात यश मिळेल. पार्ट टाइम कामासाठी वेळ काढू शकता. रोजच्या कामांसाठी काही खरेदी करू शकता. संततीच्या भविष्यासंबंधीत एखादा मोठा निर्णय घेऊ शकता, पण यासाठी सर्वांचा होकार घ्या. अनेक कामे एकाच वेळी केल्याने व्यापकता वाढेल. व्यापारात लाभ खुप वाढेल.

कुंभ
आजचा दिवस ठोस परिणामांचा आहे. व्यापारासाठी दिवस उत्तम आहे. नातेसंबंधात व्यापारासाठी दिवस उत्तम. वडीलांच्या प्रकृतीबाबत सतर्क रहा आणि त्यांना बाहेरचे खाऊ-पिऊ देऊ नका. नोकरीत कामात लक्ष द्या, घाईच्या कामात चूक होऊ शकते, यासाठी विचारपूर्वक करा. विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आशीर्वाद मिळेल. भाऊ आणि बहिणीच्या विवाहात येत असलेली बाधा दूर होईल.

मीन
आजचा दिवस उत्तम यशदायक आहे. व्यापारात जोखीम घेऊ शकता, ज्यात भाग्याची भरपूर साथ मिळेल. काही समस्या निर्माण झाल्यास धैर्य आणि सौम्य वागण्याने ती ठीक करण्याचा प्रयत्न करा. काही आजार त्रास देत असेल आज तो त्रास देऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला मदत कराल. उत्तम लाभ होईल. जोडीदाराशी काही वाद सुरू असेल तर तो संपेल. जोडीदाराला फिरायला घेऊन जाऊ शकता.