25 फेब्रुवारी राशिफळ : आज गुरुपुष्यामृत योगात या 5 राशींची चांदी, होईल मोठा आर्थिक लाभ, इतरांसाठी असा आहे गुरुवार

मेष
आज कार्यक्षेत्रात कुणाकडूनही जास्त अपेक्षा आणि आशा ठेवू नका. स्वतःला मेहनत करावी लागेल. व्यक्तिमत्वात नवीन आकर्षणाचा संचार होईल. व्यवसायात निर्णय घेताना चांगले विचार आणि समजूतदारपणे काम करावे लागेल, तरच यश मिळेल. कौटुंबिक नात्यात ताजेपणा येईल आणि कुटुंबात एखादे शुभकार्य होईल. आज सहजपणे एखाद्या विषयावर काम कराल, ज्यामुळे यश मिळेल. भाग्याची भरपूर साथ मिळेल. घराच्या सजावटीसाठी काही वस्तू देखील खरेदी करू शकता.

वृषभ
आज आई-वडीलांचा आशीर्वाद कार्यक्षेत्रात मार्गदर्शक ठरेल, ज्यामुळे सर्व कामे सुरळीत पार पडतील. आर्थिक बाबतीतही भाग्याची साथ मिळेल. व्यवसायाचा विस्तारही होईल. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. प्रेमसंबंधात एखादी भेट मिळू शकते आणि एकत्र फिरायला देखील जाऊ शकता. जर एखादे जुने कर्ज असेल तर त्यापासून मुक्ती मिळेल. अडकलेले पैसेही मिळतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. भावंड खूप प्रेम देतील.

मिथुन
आज प्रेमसंबंधात काही गैरसमजांमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दिवस मध्यम फलदायी आहे. वैयक्तिक संबंधांच्या बाबतीत मतभेदांचा सामना करावा लागू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा आर्थिक स्थिती आणखी बिघडू शकते. कोणत्याही प्रकारच्या अनैतिक कृतीपासून दूर रहा. सामाजिक प्रतिष्ठेची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आज जास्त मेहनत करावी लागेल, तरच यश मिळेल. आयुष्यातील काही अनुभवांमधून धडा घ्यावा लागेल. संततीकडून एखादी चांगली बातमी मिळेल.

कर्क
आज कार्यक्षेत्रात तरुणांना प्रोत्साहित करण्यात यशस्वी व्हाल. संततीच्या करिअरशी संबंधित निर्णय घेऊ शकता, ज्यामुळे त्यांचे भविष्य मजबूत होईल. व्यवसाय संबंधित योजना करण्यासाठी तज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता असेल. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आज केलेल्या प्रत्येक प्रयत्नात यश मिळेल. उत्पन्नही वाढेल. कुटुंबातील सदस्यांसह मौजमजा कराल.

सिंह
आज आर्थिक स्थिती बळकट होईल, ज्यामुळे मुक्तपणे खरेदी करू शकता. कौटुंबिक जबाबदार्‍या सुद्धा चांगल्या प्रकारे पार पाडाल. कुटुंबातील सदस्य आणि मुले देखील काही मागण्या करू शकतात, ज्या आनंदाने पूर्ण कराल. विवाहासाठी इच्छूक असलेल्यांना चांगले प्रस्ताव येतील. कार्यक्षेत्रात प्रामाणिकपणाने काम करावे लागेल. आळस दूर केला तर यश मिळेल, ज्यामध्ये भाग्याची पूर्ण साथ मिळेल.

कन्या
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. विद्यार्थ्यांना भविष्याशी संबंधित निर्णय घेण्यासाठी त्यांच्या गुरूंचे आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात वेगवान बदल होतील आणि नवीन संधीही समोर येतील. यश मिळविण्यासाठी मेहनत करावी लागेल, शक्य तितके प्रयत्न करावे लागतील तरच आर्थिक स्थिती मजबूत करू शकता. प्रेमसंबंधात उघडपणे व्यक्त होण्याची वेळ आली आहे, ज्यामुळे जोडीदार तुमच्यावर विश्वास ठेवू शकेल. रोजगाराच्या क्षेत्रात प्रयत्न अपयशी ठरतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जर एखादा वादविवाद झाला तर दुसर्‍याला क्षमा करावी लागेल.

तुळ
आज अनावश्यक व्यवहार टाळा. कारण भाग्याची साथ मिळणार नाही. धैर्याने सर्व अडचणी दूर कराल. कामांवर लक्ष केंद्रित करा अन्यथा कार्यक्षेत्रात खोटे आरोप होऊ शकतात, म्हणून सावध रहा. व्यवसायातील योजना पूर्ण होताच हलके आणि तणावमुक्त वाटेल. जीवनात एक नवीन टप्पा सुरू होणार आहे. नवीन संधींचा सामना करण्यास तयार राहा, ज्यामुळे भविष्य मजबूत होईल. वैवाहिक जीवनात गोडवा कायम राहील. संततीबाबत थोडे चिंताग्रस्त राहाल. विद्यार्थ्यांना त्यांचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल.

वृश्चिक
जर आज एखादे काम करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी वेळ चांगली आहे. कार्यक्षेत्रात सहकार्‍यांचे समर्थन सर्व समस्यांपासून मुक्त करेल. प्रेमसंबंधात प्रेम वाढल्याने मन आनंदी राहील. मित्रांसमवेत आनंददायक क्षण घालवाल. वैयक्तिक आणि व्यवसायात आज उत्साही होऊन तुमच्या धाडसाची प्रचिती लोकांना द्यावी लागेल. कार्यक्षेत्रात काही अशक्य कामांना सामोरे जावे लागेल, परंतु त्यांचे निराकरण करण्यात यशस्वी व्हाल. यामुळे आर्थिक लाभ होईल. आरोग्याची थोडी काळजी घ्या कारण पोटाची एखादी समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.

धनु
कुटुंबात एखादा तणाव असेल तर आज तो टाळ आणि आरोग्याची काळजी घ्या. जुन्या मित्रांची भेट होईल, ज्यामुळे जीवनात आनंद जाणवेल. वैयक्तिक जीवनात कोणालाही कोणतेही वचन देऊ नका, कारण ते पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. करियरमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नवीन लोकांची भेट होईल, आणि कामात यशही मिळेल. कार्यक्षेत्रातील वातावरण देखील सकारात्मक असेल. सहकारी प्रोजक्ट पूर्ण करण्यात मदत करतील. भावाच्या सल्ल्याने काम कराल, ज्यामध्ये मोठे यश मिळेल.

मकर
आज संततीची प्रगती पाहून मन आनंदित होईल. कुटुंबाची काही अडकलेली कामे आज भावंडांच्या मदतीने पूर्ण होतील. बाहेर खाणे टाळा, अन्यथा तब्येत बिघडू शकते. जोडीदाराचा सल्ला कौटुंबिक व्यवसायासाठी उपयोगी सिद्ध होईल, ज्यामुळे कुटुंबात एक सकारात्मक वातावरण तयार होईल अणि मन आनंदित होईल. सहकार्‍यांना सुद्धा नवीन ज्ञान आणि संधी मिळवण्याची संधी मिळेल. कामातील गोंधळाची स्थिती बदलेल आणि जुन्या पद्धतींमध्ये सुधारणा कराल.

कुंभ
राजकारणाशी संबंधित लोकांना कामात यश मिळेल. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याची संधी मिळेल. जोडीदार आनंदी होईल. भूतकाळ आणि भविष्याचा विचार करू नका वर्तमानातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. सावधगिरीने काम केले तर सुवर्णसंधी मिळू शकते. यामुळे व्यवसायात उच्च सुधारणा होईल. कुटूंबातील एखाद्या सदस्याशी मतभेद होऊ शकतात, म्हणून सावधगिरी बाळगा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. संध्याकाळी मित्रांसह एखाद्या मंदिराच्या तीर्थयात्रेला जाऊ शकता.

मीन
आज संततीच्या भविष्याची चिंता त्रास देऊ शकते. वैवाहिक जीवन सुखी होईल. आर्थिक स्थितीसाठी प्रयत्न यशस्वी ठरतील. आज एखाद्या परिचित व्यक्तीच्या माध्यमातून व्यवसायात नफा मिळेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज असे काही खर्च समोर येतील, जे नको असतानाही करावे लागतील, परंतु तरीही आर्थिक स्थिती लक्षात घेऊन खर्च करा, अन्यथा ती डगमगू शकते.