25 जानेवारी राशिफळ : वृषभ राशीवाल्यांना लाभाचे योग, मकर राशीवाल्यांना मिळू शकते नोकरी, इतरांसाठी असा आहे सोमवार

मेष
अभ्यासाच्या बाबतीत विद्यार्थ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. संततीकडून थोडी निराशा होऊ शकते, ज्यामुळे मानसिक तणाव असेल. गुप्तशत्रू किंवा विरोधक त्रास देऊ शकतात, यासाठी सतर्क रहा. कुटुंबासह मौजमस्तीत दिवस घालवाल, ज्यामुळे चिंता थोड्या कमी होतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. व्यवसायात फायदा होईल.

वृषभ
खर्च होईल, परंतु मानसिक तणाव संपेल. दिवस शांततेत जाईल. आर्थिकदृष्ट्या नफा होईल. राजकीय क्षेत्रात फायदा मिळू शकतो. जनसंपर्काचा पूर्ण फायदा होईल. नोकरीत एखादी चांगली बातमी मिळू शकते. नवीन काँट्रॅक्ट मिळाल्याने व्यवसायाची प्रतिष्ठा वाढेल. एखाद्या विशिष्ट प्रकरणात वडिलांचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळेल. संततीकडून चांगली बातमी मिळेल. संध्याकाळी काही चुकीच्या लोकांना भेटल्यामुळे काही समस्या उद्भवू शकतात, म्हणून काळजी घ्या. वैयक्तिक आयुष्यासाठी देखील वेळ काढा.

मिथुन
आजचा दिवस सांभाळून राहण्याचा आहे. आपली खास वस्तू हरविण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात काही शुभ आणि मंगलकार्य करण्याची योजना आखाल. आर्थिकदृष्ट्या स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक मालमत्तेतही वाढ होईल. संततीला चांगले यश मिळू शकते. विशेषत: अभ्यासाच्या क्षेत्रात, ज्यामुळे मनात आनंदाची भावना निर्माण होईल. व्यवसायात नवीन करारामुळे फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना पुढील योजना आखण्यासाठी वेळ लागेल, प्रयत्न करा. एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळू शकते. वैवाहिक जीवनात स्थिती नियंत्रणात राहील. दिवस आनंददायी असेल.

कर्क
कुटुंबातील छोट्या सदस्यांसोबत चांगला वेळ व्यतीत कराल. कुटुंबातील सदस्यांसह दीर्घ प्रवासाची योजना आखू शकता. खर्च थोडा जास्त होईल, पण दुसरीकडे चांगल्या धनप्राप्तीचा योग आहे. रोजगाराच्या क्षेत्रात प्रगती होईल, सन्मानही वाढेल. संततीच्या बाबतीत सर्व कर्तव्ये पार पाडाल. नवीन व्यवसायात फायदा होईल. कार्यक्षेत्रात जे काम तुमच्या हातात आहे त्यामुळे तुमची स्थिती मजबूत होईल. या कामांमध्ये यश मिळेल. संध्याकाळी धार्मिक कार्यात वेळ घालवाल. जोडीदाराचे आरोग्य त्रास देऊ शकते.

सिंह
आर्थिक स्थिती थोडी कमजोर होऊ शकते. खर्च जास्त होईल. आरोग्य कमजोर होऊ शकते. विरोधकांची संख्या वाढू शकते परंतु ते आपसातच गुंतलेले राहतील. कामाकडे पूर्ण लक्ष दिल्यास नोकरीसाठी दिवस खूप मजबूत आहे. प्रशंसा होईल. कुटुंबात लहान भावंडांसोबत चांगला वेळ घालवाल. वैयक्तिक आयुष्यातही प्रणय कायम राहील. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीला मिळालेल्या एखाद्या यशामुळे आनंदी व्हाल. आपल्या गोड आणि प्रेमळ वाणीमुळे एखादा सन्मान मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी दिवस यशाचा आहे. डोळ्यांची समस्या असू शकते. विनाकारण धावपळ होईल. व्यवसायात परदेशी माध्यमातून सकारात्मक परिणाम मिळू शकतात.

कन्या
कौटुंबिक जीवनात समाधानाची स्थिती निर्माण होईल. नवीन कार खरेदी करण्याचा विचार कराल. नोकरीत पकड मजबूत असेल. बोलण्याच्या कला आणि कार्यकुशलतेने अडकलेली कामे सुद्धा पार पाडण्यात यशस्वी व्हाल. कार्यक्षेत्रात दबदबा राहील. एखाद्या मित्राला गरज असेल त्याची मदत कराल. रोजगारासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. संततीची असलेली चिता काही अंशी दूर होईल. एखाद्या कायदेशीर प्रकरणात विजयाची बातमी मिळू शकते, जी कौटुंबिक जीवनात आनंद आणेल.

तुळ
व्यवसाय केलेले प्रयत्न यशस्वी होतील. नवीन संधींचा फायदा मिळेल. सभोवतालची स्थिती एक आनंददायी वातावरण तयार करेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना असेल. शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. व्यवहारातील समस्येतून मुक्ती मिळेल. एखाद्या कर्जाची परतफेड करण्यात यश मिळू शकते. हातात पैसा येईल. वैयक्तिक आयुष्यात जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रवासाला जाण्याचीही स्थिती असेल. गुंतवणूकीसाठी दिवस अनुकूल नाही. सरकारी कामात यश आणि आर्थिक फायदा संभवतो.

वृश्चिक
स्थिती चांगली राहील. जोखमीच्या गुंतवणूकीमध्ये यश मिळू शकते. तीर्थक्षेत्राचा प्रवास केल्याने मानसिक ताण दूर होईल आणि मनशांती मिळेल. सासरच्या मधूर संबंधातून लाभ मिळेल, जोडीदाराचे सहकार्य मिळेल. परंतु, त्यांच्या आरोग्यात घसरण होऊ शकते. कोर्ट कचेरीच्या बाबतीत फायदा होईल. रोजगाराच्या क्षेत्रात समस्यांमधून मुक्ती मिळेल. व्यावसायिकांना उत्पन्नाच्या नव्या स्त्रातून लाभाचा योग आहे. प्रेमसंबंधात ज्या जास्त अपेक्षा ठेवल्या आहेत त्यामुळे कदाचित निराशा होईल, म्हणून शांत रहा आणि जास्त अपेक्षा ठेवू नका.

धनु
भागीदारीच्या कामात समस्या येऊ शकते म्हणून सावध रहा. विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील, परंतु स्पर्धेत यशस्वी होऊ शकता. राजकारणाच्या क्षेत्रात आजचा दिवस अनुकूल आहे. कामाचे कौतुक होईल. विरोधकही स्तुती करू शकतात. शासन आणि प्रशासनातील लोकांशी असलेल्या संबंधातून लाभ मिळू शकतो. सासरच्यांकडून काही फायदा होण्याची शक्यता आहे. पितृ व्यवसाय करत असल्यास पुढे जाण्यासाठी कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करू शकता. संध्याकाळी काही सांस्कृतिक उपक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल आणि जोडीदारासोबत संबंध सुधारतील.

मकर
सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. सर्व कौटुंबिक कर्तव्य पार पाडाल. यामुळे कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत चांगले यश मिळू शकते. रोजगाराच्या दृष्टीने सुरू असलेले प्रयत्न प्रभावी ठरतील. नोकरी मिळण्याची शक्यता आहे. जिथे काम करता तिथे सोबत काम करणार्‍यांचे समर्थन आणि प्रेम मिळेल, ज्यामुळे स्थिती बळकट होईल अविवाहित असाल तर एखादी आनंदाची बातमी मिळेल. आई-वडीलांच्या आरोग्याची काळजी घ्या. संध्याकाळी कोणाशीही वाद घालू नका. घरात पाहुण्यांचे आगमन होण्याची चांगली चिन्हे आहेत. पाहुणचारात कोणतीही कमतरता सोडू नका.

कुंभ
विद्यार्थ्यांना शिक्षणात काही नवीन संधी मिळू शकतात. मात्र अशा मित्रापासून सावध रहा, जो तुमचे नुकसान करण्याच्या प्रयत्न असेल आणि विश्वासघात करू शकतो. यातून मानसिक ताण देखील येऊ शकते. कौटुंबिक जीवन आनंददायी राहील. भावंडांशीही संबंध सुधारतील. बोलण्यावर नियंत्रतणे, अन्यथा प्रेमसंबंधात दुरावा वाढू शकतो. अशी बातमी समजू शकते ज्यामुळे अचानक प्रवास करावा लागू शकतो. आज आजी-आजोबाचे प्रेम जाणून घेण्याची संधी मिळेल. करियरमध्ये चांगल्या प्रगतीचा दिवस आहे. सुधारात्मक स्थिती व्यवसायात राहील. परदेशातून एखादी चांगली बातमी समजू शकते. आरोग्य कमजोर होऊ शकते, त्याकडे दुर्लक्ष करू नका.

मीन
कौटुंबिक जीवनात सुखद वातावरण तयार होईल. आईशी संबंध सुधारतील, परंतु विवाहित जीवनात तणाव वाढू शकतो. जोडीदाराशी क्षुल्लक गोष्टींवरून वाद घालणे टाळा. विद्यार्थ्यांना भविष्यातील नवीन योजनांवर काम करण्याची संधी मिळेल आणि तयारी कराल. आज कुणाशीही पैशाचा व्यवहार टाळा. यामुळे संबंध बिघडू शकतात, विशेषत: नातेवाईक. धार्मिक प्रवासात करण्याचा किंवा दान पुण्या करण्याचा मान मिळू शकतो. मात्र, प्रवास जास्त आनंददायक होणार नाही, म्हणून सावधगिरीने जा. नोकरीसाठी मजबूत दिवस आहे. व्यवसायातही चांगला नफा मिळण्याची स्थिती आहे. सन्मान वाढेल.