25 जुलै राशिफळ : शनिवारी ‘प्रबळ’ आहे ‘या’ 5 राशीवाल्यांचे ‘भाग्य’, होईल ‘भाग्योदय’

पोलीसनामा ऑनलाइन

मेष
आजचा दिवस फलदायी आहे. खर्चाशी झुंज द्यावी लागेल कारण ते जास्त असतील आणि उत्पन्न त्यापेक्षा कमी असेल. कामाच्या बाबतीत मनात अनेक विचार येतील, ज्यामुळे कामावर वाईट परिणाम होईल. काम वेळेवर पूर्ण करू शकणार नाही. त्याचा फटका तुम्हाला सहन करावा लागेल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमसंबंधात आपसात चर्चा करून नाते अधिक चांगले बनवाल. कौटुंबिक वातावरणात तणाव राहील.

वृषभ
आजचा दिवस सामान्य आहे. कुटूंबाबाबत आज खुप विचार कराल, त्यांच्या भविष्याबद्दल विचार कराल. पैशाच्या गुंतवणूकीबद्दलही गंभीरपणे विचार कराल. उत्पन्न चांगले होईल, ज्यामुळे जुनी कामे पूर्ण करू शकता. व्यापारात चांगला फायदा होईल. वैवाहिक जीवनात आपल्या जोडीदाराकडे अंतःकरणाची भावना, प्रेम व्यक्त करण्यात करण्यात यश मिळेल. कौटुंबिक वातावरणही चांगले राहील.

मिथुन
आजचा दिवस मध्यम फायदेशीर आहे. कुटुंबाकडे लक्ष द्याल, घरगुती खर्च कराल. सुख सुविधांकडे जास्त लक्ष देण्याकडे कल राहील. कामाच्या बाबतीत मजबूत राहाल आणि सहकारी कर्मचार्‍यांशी चांगले वागाल. आरोग्य कमजोर राहील. आजारी पडण्याची शक्यता आहे, म्हणून काळजी घ्या. वडिलांच्या आशीर्वादाने कामात यश मिळेल.

कर्क
आजचा दिवस उत्तम आहे. आज मित्रांची आठवण काढाल आणि जुन्या मित्रांशी संवाद साधून जुन्या आठवणी ताज्या कराल. एखादा नातेवाईक तुमच्याशीही चर्चा करेल. काही लोक परदेशात जाण्याचा विचार करतील. उत्पन्न चांगले होईल. व्यापारात चांगले परिणाम मिळतील. प्रेमसंबंधासाठी चांगला काळ आहे. वैवाहिक जीवन कमजोर राहील.

सिंह
आजचा दिवस सामान्य आहे. आजा खाण्या-पिण्यावर आणि कपड्यांवर खर्च कराल आणि कुटुंबाच्या जबाबदार्‍या सुद्धा समजून घेऊन त्या पूर्ण कराल. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत कुठेतरी फिरण्यासाठी जाण्याचा योग आहे, पण तो प्रवास आता नाही, नंतर होईल. आता केवळ आपण योजना आखणार आहात. आरोग्य कमजारे राहील, ज्यामुळे दैनंदिन कामात अडथळा येईल. कामात खूप लक्ष द्यावे लागेल, अन्यथा अडचणी येतील. कर चुकवण्याची सवय टाळा.

कन्या
आजचा दिवस चांगला आहे. स्वत: कडे पूर्ण लक्ष द्याल, यामुळे आपण नवीन खरेदी देखील कराल. बरेच पैसे खर्च कराल. मित्रामुळे एखादी चांगली बातमी मिळेल. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे. प्रिय व्यक्तीला खुश करण्यासाठी खुप प्रयत्न करावे लागतील. वैवाहिक जीवनात आव्हाने कमी होतील. कुटुंबापासून दूर राहून एकांतवासात वेळ घालवण्याचा योग आहे.

तुळ
आजचा दिवस फलदायी आहे. खूप खर्च होईल, यामुळे मानसिक थकवा येईल. त्रास होईल. विरोधकांमुळे सुद्धा चिंता कराल. कुटुंबातील एखाद्याचे बिघडलेले आरोग्य चिंतेचे मुख्य कारण असेल. पण, जीवनात आनंदाची कमतरता राहणार नाही. कामासंबंधी महत्त्वाची चर्चा कराल.

वृश्चिक
आजचा दिवस उत्तम आहे. उत्पन्न वाढेल. प्रेमसंबंधात खूप आनंदी व्हाल. कारण प्रिय व्यक्ती तुमच्यासाठी काहीतरी खास करेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराबरोबर प्रेमळ क्षण घालवण्याची संधी मिळेल. प्रवासाला जाणे टाळणे आपल्यासाठी चांगले ठरेल. विनाकारण इतरांच्या कामात लक्ष घातल्याने नुकसान होऊ शकते. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.

धनु
आजचा दिवस खूप फायदेशीर आहे. कामात पूर्ण लक्ष द्याल. चांगले परिणाम मिळतील. कुटुंबात शांतता आणि आनंद राहील. मेहनतील यश येईल. ज्यामुळे कुटुंबात तुमचा आदरही वाढेल. पैशाबाबत कुटुंबात काही अडचणी येऊ शकतात आणि अनावश्यक वादही होऊ शकतात. वैवाहिक जीवनात तणाव वाढेल. प्रेमसंबंधासाठी दिवस शुभ आहे.

मकर
आजचा दिवस चांगला आहे. एखाद्या धार्मिक ठिकाणी भेट देण्याची योजना आखू शकता किंवा घरात पूजेमध्ये वेळ घालवाल. खर्च कमी होईल. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील. प्रिय व्यक्तीसोबत प्रेमळ क्षण घालविण्याची संधी मिळेल. नोकरी बदलण्यातही यश मिळेल. नवीन नोकरी मिळू शकते. व्यापारात फायदा होईल.

कुंभ
आजचा दिवस मध्यम फालदायी आहे. आरोग्याची पूर्ण काळजी घ्या. कारण ते अडचणीत आणू शकते. मानसिकदृष्टया देखील चिंताग्रस्त रहाल, ज्यामुळे काम बिघडू शकते. परंतु उत्पन्नामध्ये जास्त घट होणार नाही, ज्यामुळे परिस्थिती नियंत्रणाखाली राहील. कौटुंबिक वातावरण देखील प्रेमाने परिपूर्ण राहील. कुटुंबातील सदस्य तुमच्यावर जीव टाकतील. कामात जास्त प्रयत्न करावे लागतील.

मीन
आजचा दिवस चांगला आहे. जोडीदाराकडे संपूर्ण लक्ष द्या. त्यांच्या मनातील समस्या दूर करण्याचा प्रयत्न कराल. व्यापाराच्या बाबतीतही आजचा दिवस चांगला आहे. खूप चांगले उत्पन्न मिळेल. खर्चही जास्त होईल, परंतु तो फक्त आवश्यक कामांवरच होईल. कामाशीत प्रयत्नांना यश येईल. एखाद्या खास मित्राचे योगदान जीवनात दिसेल. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे.