25 मार्च राशीफळ : ‘या’ 3 राशीच्या लोकांनी रहावे सावध, नुकसान होण्याची मोठी शक्यता, इतरांसाठी असा आहे गुरुवार

मेष
आजचा दिवस संमिश्र आहे. अनेक सुख-सुविधांवर खर्च कराल, परंतु खर्च करताना खिशाचा विचार करा. कार्यक्षेत्रात शत्रु प्रबळ राहतील, परंतु ते काहीही करू शकणार नाहीत. विद्यार्थ्यांना एखाद्या शिक्षण संस्थेत प्रवेश घ्यायचा असेल तर यश मिळेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या आणि जर काही त्रास असेल तर डॉक्टरचा सल्ला घ्या.

वृषभ
आजचा दिवस रोजगाराच्या क्षेत्रासाठी उत्तम लाभदायक आहे. रोजगारसंबंधीत बहुतांश तरूणांची चिंता आज संपेल. कौटुंबिक व्यवसायात वडीलांचा सल्ला आवश्यक असेल. अनावश्यक आणि विनाकरण खर्च आणि बेपर्वाईपासून दूर राहा, अन्यथा मोठ्या संकटात सापडू शकता. सासरच्या पक्षाशी पैशाचा व्यवहार करायचा असेल तर नात्यात दुरावा येऊ शकतो. संततीच्या विवाहासंबंधी एखादी शुभवार्ता मिळेल.

मिथुन
आजचा दिवस ठोस परिणाम घेऊन येईल. आईशी काही व्यापारी वैचारिक मतभेद होऊ शकतात, ज्यामुळे कुटुंबाचे वातावरण तणावाचे होऊ शकते. जोडीदाराच्या गरजा पूर्ण कराल आणि त्यांना सोबत घेऊन शॉपिंग करू शकता. प्रेमसंबंध सुदृढ होतील. अनियंत्रित खर्च टाळावा लागेल, अन्यथा आर्थिक स्थिती बिघडू शकते.

कर्क
राजकीय जातकांना आज समाजसेवा करण्याची संधी मिळेल. घरात एखादे मंगलकार्य होऊ शकते, ज्यामध्ये पाहुण्यांचे सुद्धा आगमन होईल. विद्याथी शिक्षकांच्या सहकार्याने लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. व्यवसायात आपले पूर्ण लक्ष कार्यक्षेत्राकडे द्यावे लागेल, तेव्हाच भविष्यात आर्थिक स्थिती चांगली होईल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला नाही.

सिंह
आजचा दिवस कठोर मेहनतीचा आहे, तरच यश मिळेल. नोकरीत कामाच्या ठिकाणी जास्त लक्ष द्यावे लागणार नाही, अन्यथा विरोधक षडयंत्र रचू शकतात, यासाठी सतर्क राहा. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल, जुन्या आठवणींना उजाळा देत वेळ चांगला घालवाल. संततीच्या आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा.

कन्या
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. व्यवसायासाठी काही नवीन योजना तयार कराव्या लागतील, ज्या भविष्यासाठी लाभदायक ठरतील. एखाद्या वरिष्ठ व्यक्तीच्या सल्ल्याने अडकलेली कामे पूर्ण होतील. व्यापारात आज काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, परंतु हळुहळु सर्व ठिक होईल. गोष्टी पुन्हा रूळावर येतील. जोडीदाराचा सल्ला बिझनेससाठी उपयोगी ठरेल.

तुळ
जर एखाद्या मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी दिवस उत्तम आहे. संततीच्या विवाहाची समस्या संपेल. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे, यासाठी सतर्क राहा. सायंकाळी कुटुंबातील लहान मुलांसोबत मजामस्तीत वेळ घालवाल.

वृश्चिक
आज व्यापाराला प्राथमिकता द्यावी लागेल. आळसाचा त्याग करावा लागेल, तेव्हाच भविष्यात लाभ होईल. जर कोर्ट-कचेरीचे एखादे प्रकरण सुरू असेल तर एखाद्या वरिष्ठ अधिकार्‍याच्या सल्ल्याने ते समाप्त होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात सिनियर्सच्या सल्ल्याची आवश्यकता असेल. सायंकाळी वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

धनु
आजचा दिवस शुभ माहिती घेऊन येईल. कुटुंबात सुरू असलेली समस्या आज वडीलांच्या सल्ल्याने संपेल. व्यापार्‍यांना रोख रक्कमेच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. प्रेमसंबधात नाविन्य येईल. संततीच्या भविष्यासाठी एखादी गुंतवणूक करू शकता. राजकारणात चांगले जनसमर्थन मिळेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.

मकर
आजचा दिवस उत्तम आहे. भविष्य मजबूत बनवण्यासाठी काही नवीन योजना बनवाल, ज्यामध्ये तज्ज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता असेल. जर एखादी नोकरी करायची असेल तर त्यासाठी वेळ उत्तम नाही. विद्यार्थ्यांना आज यशप्राप्तीसाठी जास्त मेहनत करावी लागेल. सासरच्या पक्षाकडून सन्मान मिळू शकतो.

कुंभ
आज नोकारीत काही अडथळे उत्पन्न होऊ शकतात, परंतु हळु-हळु सर्व समस्यांमधून मुक्त व्हाल. वडीलांच्या तब्येतीत घसरण होऊ शकते, यासाठी लक्ष द्या. कुटुंबात एखादे भांडण होऊ शकते, ज्यामुळे मानसिक तणाव राहिल, परंतु तरी सुद्धा वाणीवर नियंत्रण ठेवा, तरच कामांमध्ये यश मिळेल.

मीन
आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी उत्तम आहे. विद्यार्थ्यांची एखाद्या अनुभवी व्यक्तीशी भेट होईल, ज्यांचे अनुभव आणि मार्गदर्शन अभ्यासात सहाय्य करेल. व्यापारासाठी जर एखादा प्रवास करावा लागला तर तो उत्तम राहिल. घरासाठी काही सामान खरेदी करू शकता. परंतु आर्थिकस्थिती लक्षात ठेवून खर्च करा. जर गुंतवणूक करायची असेल तर दिवस उत्तम आहे. कौटुंबिक बिझनेससाठी जोडीदाराचा सल्ला सहायक सिद्ध होईल.