26 फेब्रुवारी राशीफळ : कोणत्या राशींना शत्रूपासून ‘धोका’ आणि कुणाला मिळणार ‘सन्मान’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – 

मेष
आजचा दिवस तणाव निर्माण करणारा असेल. खर्चामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. आरोग्यात थोडी सुधारणा होईल. थंड गुणधर्माच्या वस्तू खाऊ नका, कफचा त्रास होऊ शकतो. कामात स्थिती तुमच्या बाजूने असेल. तुमच्याच कामात लक्ष घाला, दुसर्‍यांच्या कामात हात घालू नका. प्रवासात सावधगिरी बाळगा. प्रिय व्यक्तीशी संबंध बिघडू शकतात. दाम्पत्य जीवनासाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबात सुख राहिल.

वृषभ
तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. उत्पन्न वाढेल. कुटुंबात आपसातील प्रेम वाढेल. दाम्पत्य जीवनात अडचणी येतील. जोडीदाराचे आरोग्य बिघडेल. प्रेमसंबंधात सावधगिरीने काम करा. अन्य व्यक्तीच्या हस्तेक्षेपामुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामात आजचा दिवस कमजोर आहे.

मिथुन
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य आहे. कामासाठी दिवस चांगला आहे. मन लावून काम केल्यास चांगले परिणाम दिसून येतील. सुख-सुविधांसाठी जास्त खर्च होईल, यामुळे मन दुखी होऊ शकते. शारीरीकदृष्ट्या काही अडचणींमुळे अस्वस्थ होऊ शकता. जखम किंवा पोटदुखी होऊ शकते. विवाहितांसाठी दिवस सामान्य आहे. प्रेमसंबंधात गोंधळ उडू शकतो.

कर्क
आजचा दिवस चांगला आहे. खर्चात कपात होईल आणि धनलाभ होईल. कामात नव्या संधी शोधाल. आज नोकारीचा अर्ज स्वीकारला जाऊ शकतो, जॉबसाठी इंटरव्ह्यूचा कॉल येऊ शकतो. विरोधकांचा पराभव कराल. कुटुंबात प्रेम राहिल. आईचा आशीर्वाद आणि सहकार्य मिळेल. व्यापारात आज चांगला फायदा होईल.

सिंह
आज सावध रहा. आरोग्यसंबंधी अडचणी येऊ शकतात. शिक्षणात कमी लक्ष लागेल. प्रेमसंबंधात आव्हानांना तोंड द्यावे लागेल. तुमच्या कोणत्याही मित्राला प्रेमसंबंधात हस्तक्षेप करू देऊ नका. कौटुंबिक जीवनात थोडा तणाव राहिल. दाम्पत्य जीवन चांगले राहिल. ऑफिसमध्ये कुणाशी तरी भांडण होऊ शकते.

कन्या
तुमच्यासाठी आजचा दिवस सामान्य आहे. जोडीदाराकडे पूर्ण लक्ष द्यावे लागेल आणि त्याचे ऐकावे लागेल. यामुळे दाम्पत्य जीवन आनंदी राहू शकते. व्यवसायात प्रगतीचा दिवस आहे. तुमच्या अनेक योजना यशस्वी होतील. आनंदी वाटेल. कुटुंबातील कुणाचे तरी आरोग्य तुम्हाला अस्वस्थ करेल. प्रेमसंबंधात आज चांगले परिणाम दिसून येतील. प्रिय व्यक्तीला तुमच्या मनातील गोष्टी जरूर सांगा.

तुळ
आजचा दिवस थोडा कमजोर आहे. खर्च वाढतील. जेवणात जास्त मसाल्यांचा वापर करू नका, अन्यथा आरोग्य बिघडू शकते. मातेकडून सुख मिळेल. कुटुंबात आनंद राहिल. कुटुंबातील छोट्यांना अडचणींना तोंड द्यावे लागेल. प्रवासासाठी आजचा दिवस चांगला नाही. प्रेमसंबंधात आनंदाचे क्षण येतील. मित्रांसोबत पार्टी करू शकता. दाम्पत्य जीवनासाठी दिवस सामान्य आहे. कामात आजचा दिवस खुप चांगला आहे.

वृश्चिक
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य परिणाम घेऊन येईल. प्रेमसंबंधात यश मिळेल. दाम्पत्य जीवनासाठी दिवस चांगला आहे. वाहन चालवताना सावध रहा. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून वातावरण तापू शकते. ज्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. खाण्या-पिण्याकडे पूर्ण लक्ष द्या. आरोग्य बिघडू शकते. प्रवास आनंददायी होऊ शकतो. आजचा दिवस सामान्य राहिल.

धनु
आजचा दिवस संमिश्र आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबाच्या सहकार्यामुळे अनेक कामे मार्गी लागतील. विवाहितांसाठी दिवस खुप चांगला आहे आणि जोडीदाराशी दूरावलेले संबंध पुन्हा जुळतील. खर्च वाढतील. आरोग्य बिघडू शकते. प्रेमसंबंधात मनातील गोष्ट जरूर व्यक्त करा. आज खास भोजन मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही संतुष्ट व्हाल आणि आनंद मिळेल.

मकर
आजचा दिवस सामान्य आहे. प्रवासात मजा येईल. व्यवसायानिमित्त केलेल्या प्रवासातून यश मिळेल. खर्च खुप वाढेल. आर्थिक स्थिती बिघडू शकते. मनात एकासोबत अनेक कामे असतील, जी पूर्ण करणे तुमच्यासाठी जरूरी राहणार आहे. उत्पन्नात वाढ होईल. प्रेमसंबंधात तणाव राहिल. कुटुंबाचे पूर्ण सहकार्य राहिल.

कुंभ
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. कुटुंबातही आनंद राहिल आणि कामातही चांगले परिणाम दिसून येतील. खर्च वाढतील परंतु उत्पन्न वाढल्याने खुप ताण पडणार नाही. प्रेमसंबंधात आजचा दिवस खुप चांगला आहे. प्रिय व्यक्तीशी संबंध सुधारतील. दाम्पत्य जीवनात तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते.

मीन
तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही मानसिकदृष्ट्या खुप मजबूत राहाल. यामुळे प्रत्येक काम चांगल्या पद्धतीने करू शकाल. आनंद मिळेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य लाभेल. आनंदात वाढ होईल. तुमची एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे मन आनंदी होईल. कुटुंबाचे वातावरण आनंददायी रााहिल. प्रेमसंबंधात आनंदाचे क्षण येतील. कुटुंबातील एखाद्या वक्तीचे आरोग्य बिघडू शकते.

You might also like