27 जून राशिफळ : शनिवारचा दिवस ‘या’ 5 राशींसाठी ‘जड’, राहावे लागेल ‘सावध’

 

मेष
आजचा दिवस चांगला आहे. कामात चांगले परिणाम मिळतील. एखाद्या व्यक्तीशी भांडण होऊ शकते. काळजी घ्या. उत्पन्न चांगले होईल. आत्मविश्वासही खूप चांगला राहील. प्रेमसंबंधात चांगली बातमी मिळेल. वैवाहिक जीवनासाठी शुभकाळ आहे.

वृषभ
आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबाला वेळ द्याल. कामासाठी दिवस चांगला आहे. व्यवसायात मोठी वाढ दिसून येईल. कुटुंबातील ज्येष्ठाची प्रकृती बिघडू शकते. ते आजारी पडतील. प्रेमसंबंधासाठी दिवस थोडा कमजोर आहे. वैवाहिक जीवनात काही चांगली गोष्टी घडतील, ज्यामुळे आनंदी राहाल.

मिथुन
आजचा दिवस चांगला आहे. प्रवासाला जाऊ शकता. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगले फायदे मिळतील. कुटुंबात आनंद राहील. कामात खूप चांगले परिणाम मिळतील. पदोन्नती मिळू शकते. वैवाहिक जीवनात तणाव जाणवू शकतो, यासाठी सावधगिरी बाळगा. प्रेमसंबंधासाठी दिवस सामान्य आहे.

कर्क
आजचा दिवस सामान्य आहे. उत्पन्न वाढेल. जमा पैशांबाबत विचार कराल. वैवाहिक जीवनात बरीच उलथापालथ होईल. जोडीदाराशी भांडण होऊ शकते. त्याचे आरोग्यही बिघडू शकते, म्हणून काळजी घ्या. कर्ज घेण्यासाठी दिवस कमजोर आहे. कामात चांगले परिणाम मिळतील. व्यवसायही चांगला होईल. प्रेमसंबंधात रोमान्स राहील.

सिंह
आजचा दिवस उत्तम आहे. आत्मविश्वास वाढल्याने जीवनातील प्रत्येक क्षेत्रात चांगले काम कराल. वैवाहिक जीवनात प्रेम आणि परस्पर संवादाने कोणतेही प्रकरण मार्गी लावाल. प्रेमसंबंधात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. नोकरीत पूर्ण आत्मविश्वासाने काम कराल. यामुळे सुखद परिणाम मिळतील. आरोग्य कमजोर राहील.

कन्या
आजचा दिवस कमजोर आहे. खर्च वाढेल. पण दुपारनंतर परिस्थिती बदलेल. आत्मविश्वास वाढेल. खर्च कमी होईल. वैवाहिक जीवनात चढ-उतार येतील. जोडीदाराशी भांडणे टाळा. प्रेमसंबंधात विशेष काळजी घ्यावी लागेल. काहीही न करता वाद होऊ शकतो. कामात चांगले परिणाम मिळतील.

तुळ
आजचा दिवस चढ-उताराचा आहे. सकाळची सुरूवात खूप छान होईल. मिळकतही चांगली होईल. पण दुपारनंतर परिस्थिती बदलेल. खर्च वाढेल. कौटुंबिक तणावामुळे कामावर परिणाम होईल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनात तणावग्रस्त परिस्थिती राहील.

वृश्चिक
आजचा दिवस चांगला आहे. आतापर्यंत तुम्ही केलेले काम तुम्हाला चांगले परिणाम देईल. उत्पन्न वाढेल. व्यवसायात मोठा नफा होईल. कौटुंबिक वातावरणदेखील चांगले राहील. कुटुंबातील लोक परस्पर चर्चेने विविध समस्या सोडवतील. प्रेमसंबंधात वाढत्या तणावामुळे समस्या येतील. वैवाहिक जीवन खूप आनंदी राहील. आरोग्याच्या बाबतीत दिवस थोडा कमजोर आहे. इतरांच्या कामात लक्ष घालू नका.

धनु
आजचा दिवस चांगला आहे. अचानक काही नवीन कामे तुमच्यासमोर येतील, ज्यामुळे उत्पन्न वाढविण्याचे माध्यम मिळेल. कामात चांगले परिणाम मिळतील. सोबतच्या लोकांचे सहकार्य मिळेल. एखाद्या गोष्टीबद्दल शंका घेण्याची सवय टाळावी कारण यामुळे वैवाहिक आयुष्याचे नुकसान होऊ शकते. प्रेमसंबंधात सामान्य परिणाम मिळतील. कुटुंबातील आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल चर्चा होऊ शकते. कुटुंबातील वातावरण सुधारेल.

मकर
आजचा दिवस थोडा कमजोर आहे. दिवसाची सुरुवात चांगली होईल. परंतु दुपारनंतर तुमची मानसिक चिंता वाढेल. एखाद्या गोष्टीवरून जोडीदाराबद्दल नाराजी व्यक्त करू शकता. तुमच्या मनात अनेक विचार घोळत राहतील, कोणते मांडावेत आणि कोणते नको असे झाल्याने त्रासून जाल. प्रेमसंबंधात खूप चांगले परिणाम मिळतील. रोमान्सची संधी मिळेल. कामात चांगले परिणाम मिळतील.

कुंभ
आजचा दिवस थोडा कमजोर आहे. तब्येत खराब असल्याने अनेक कामात लक्ष लागणार नाही. मानसिक चिंताही वाढतील. पण दुपारनंतर परिस्थिती खूप चांगली होईल. खर्चात थोडीशी कपात होईल. परंतु तरीही खर्च अधिक असेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. प्रेमाची भावना राहील. प्रेमसंबंधात गुळगुळीत बोलण्यापासून दूर रहावे. शब्द स्पष्टपणे मांडा.

मीन
आजचा दिवस थोडा कमजोर आहे. खर्च वाढेल. पण उत्पन्नही चांगले होईल. एखाद्या गोष्टीवरून तुमचेच कुणीतरी तुम्हाला अपमानित करण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे तुम्ही दु:खी व्हाल. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे. वैवाहिक जीवन कमजोर राहील. कामात खूप चांगले परिणाम मिळतील.