28 ऑगस्ट राशीफळ : शुक्रवारी ‘प्रबळ’ आहेत ‘या’ 6 राशीवाल्यांचे ‘ग्रह’, भाग्याची मिळेल ‘साथ’

पोलीसनामा ऑनलाइन

मेष
आजचा दिवस चांगला आहे. भाग्य तुम्हाला साथ देईल. कामात यश मिळेल. कामाशी संबंधित प्रयत्न यशस्वी होती. चांगले परिणाम मिळतील. मित्र होतील. त्यांच्याकडून काही फायदा मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेमासह तणाव देखील असेल. प्रेमसंबंधासाठी दिनमान चांगले आहे. प्रिय व्यक्तीची बुद्धिमत्ता पाहून आनंद होईल.

वृषभ
आत्मविश्वास असेल, ज्यामुळे दिवस चांगला जाईल. धार्मिक कार्यात मन लागेल. कामात चढ-उतार असतील. कठोर परिश्रम करत रहा. उत्पन्न वाढेल. घरात पैसा येईल. घरातील वातावरण चांगले राहील. वैवाहिक जीवनात तणाव असू शकते, काळजी घ्या. प्रेमसंबंधाबाबत कुटुंबाला सांगा.

मिथुन
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कामात चांगले परिणाम मिळतील. पदोन्नती मिळण्याची किंवा पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तीलर चांगली भेट द्याल.

कर्क
आजचा दिवस सामान्य आहे. खर्च वाढेल. स्वत:साठी काही नवीन गोष्टी खरेदी करू शकता. वैवाहिक जीवनात तणावाची स्थिती उद्भवेल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला असेल, परंतु घाईघाईने बोलू नका, अन्यथा वाद होऊ शकतो. कामासाठी दिनमान मजबूत आहे. कामावर पकड मिळेल.

सिंह
आजचा दिवस चांगला आहे. मुलांकडून आनंद मिळेल. प्रेमसंबंधासाठी दिनमान चांगले आहे. लग्नाबद्दल विचार कराल. वैवाहिक जीवनसाठी दिवस चांगला आहे. हलका खर्च होईल. कामासाठी उत्तम दिवस आहे.

कन्या
आजचा दिवस थोडा कमजोर आहे. आरोग्य कमजोर होऊ शकते. घरची चिंता सतावेल. एखाद्या सदस्याची बिघडणारी तब्येत चिंतेचे कारण असू शकते. चिंता कामापासून दूर ठेवणे आवश्यक असेल, अन्यथा समस्या वाढेल. वैवाहिक जीवन प्रेमाने परिपूर्ण असेल. प्रेमसंबंधात मनातील गोष्टी प्रिय व्यक्तीसोबत शेयर कराल.

तुळ
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कामासाठी प्रवास कराल. मित्रांना भेटाल. मन प्रसन्न होईल. मनामध्ये आनंदाची भावना असेल. कामात यश मिळेल. वैवाहिक जीवनासाठी दिनमान चांगले आहे. जोडीदार काही चांगली गोष्टी सांगेल, जी उपयुक्त ठरेल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे.

वृश्चिक
आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबात आनंद राहील. आरोग्य मजबूत होईल. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या, अन्यथा आजारी पडू शकता. कामासाठी चांगले आहे. कामात टिकून राहण्यास सक्षम असाल. वैवाहिक जीवनात चढ-उतार येतील. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे.

धनु
आजचा दिवस चांगला आहे. स्वतःवरचा विश्वास कमी होईल. आरोग्य चांगले राहील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. जोडीदाराच्या महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये सामील व्हाल. प्रेमसंबंधासाठी दिनमान चांगले असेल. कामासाठी दिवस चांगला आहे. कामामुळे मनापासून आनंदी व्हाल.

मकर
आजचा दिवस सामान्य फलदायी आहे. मानसिक ताण वाढेल. आरोग्य कमजोर होऊ शकते. आजारी पडू शकता. अज्ञात चिंतेमुळे मन खूप अस्वस्थ होऊ शकते. खर्च वाढेल. कामासाठी दिनमान चांगले आहे. नोकरीवर लक्ष द्याल. वैवाहिक जीवन तणावपूर्ण असेल. प्रेमसंबंधासाठी दिनमान चांगले आहे.

कुंभ
आजचा दिवस सामान्य आहे. उत्पन्नात वाढ होईल, ज्यामुळे मनामध्ये आनंदाची भावना असेल. प्रेमसंबंधासाठी दिवस उत्तम आहे. प्रिय व्यक्तीशी खुपवेळ बोलाल. प्रेम वाढेल. वैवाहिक आनंद राहील. कामासाठी दिवस चांगला आहे.

मीन
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कामावर लक्ष द्या, ज्यामुळे चांगले परिणाम मिळतील. उत्पन्न चांगले होईल. आरोग्य देखील चांगले राहील. वैवाहिक जीवनात तणाव असेल. प्रेमसंबंधात नात्यात प्रामाणिकपणा असेल.