28 जानेवारी राशिफळ : आज गुरुपुष्य योग, या 6 राशींना होणार बंपर लाभ, इतरांसाठी असा आहे गुरुवार

मेष
आजकाल आपण परिवर्तनाबाबत विचार करत आहात, पण वेळ चांगली नाही. जोडीदाराशी बोलण्याने नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणचे वातावरण सुधारेल. अधिकारी आणि सहकारी सहकार्य करतील, एखादे नवीन काम केले तर यश मिळेल. शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील. परंतु ते आपल्या बुद्धीमुळे यशस्वी होणार नाहीत. एखाद्या परिचित व्यक्तीच्या मदतीने आर्थिक परिस्थिती सुधारेल.

वृषभ
आजचा दिवस दुसर्‍यांवर अवलंबून राहण्याचा नाही, जर असे केले तर नुकसान होऊ शकते, म्हणून काम स्वतः करा, इतरांवर सोडू नका. व्यवसायासाठीचा प्रवास लाभदायक ठरेल. व्यवसायात चांगला नफा मिळेल, परंतु पैशाचा व्यवहार विचारपूर्वक करा. विद्यार्थ्यांना आज चांगले ज्ञान आणि अनुभव मिळेल. कौटुंबिक जीवनात गोडवा असेल. मुलांना प्रगतीकडे जाताना पाहून आनंद होईल.

मिथुन
आज वडील आपल्या कौटुंबिक जीवनात आणि व्यवसायात सहकार्य करतील. काही लोक तुमच्या कामात अडथळा आणू शकतात. परंतु त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आणि आपले काम पूर्ण करा. कौटुंबिक जीवनासाठी आजचा दिवस शांततामय आहे. जोडीदाराच्या प्रगतीमुळे आर्थिक स्थिती चांगली होईल. संतती ज्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करेल त्यामध्ये फायदा होईल. आज कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर जोडीदाराशी आणि त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींचा सल्ला घ्या, अन्यथा नुकसान होऊ शकते.

कर्क
सामाजिक केल्याने तुमची कीर्ती वाढेल. कुटुंबात लहान सदस्य आल्यामुळे कौटुंबिक वातावरण आनंदी होईल. व्यस्त असूनही प्रेमसंबंधासाठी वेळ काढाल. प्रामाणिकपणे काम केले तर अनेक संधी मिळतील, ज्याचा फायदा होईल. भविष्यासाठी बचत करू शकाल, काही गुंतवणूक फायद्यात राहतील. भाऊ-बहिणीच्या सहकार्यातून व्यवसाय वाढेल, त्यांच्या विचाराने सकारात्मक वातावरण वाढेल. दबदबा वाढेल. सर्व कामे पूर्ण होतील.

सिंह
कार्यक्षेत्रात आजपर्यंत जेवढे प्रयत्न केले ते आता यशस्वी होतील आणि आर्थिक स्थिती मजबूत करतील. सहकार्‍यांशी उदारपणे वागाल आणि त्यांच्या चुकां क्षमा कराल. आज जीवनाबात काही निर्णय घ्यायचा असेल तर वडील मार्गदर्शन करतील. जोडीदाराच्या सर्व इच्छांचा आदर करा, ज्यामुळे आपले नाते दृढतेने पुढे जाईल. परदेशासंबंधित कार्य करत असाल तर आजचा दिवस शुभ आहे.

कन्या
मित्र आणि प्रियजनांबद्दल चिंतेत असाल. स्वतःबद्दल अधिक विचार करावा लागेल. कामकाजाची स्थिती अनुकूल होत आहे. रोजगाराच्या क्षेत्रात पद आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. विद्यार्थ्यांना इच्छित क्षेत्रात शिक्षण मिळेल. विवाहासाठी इच्छूक असणार्‍यांसाठी चांगले प्रस्ताव येतील. कौटुंबिक वातावरण खूप आनंददायक असेल. अनावश्यक खर्च टाळा आणि दिखावा टाळा. व्यवसायात केलेला उपक्रम सकारात्मक परिणाम दर्शवेल.

तुळ
आजचा दिवस संश्रित आहे. कामात इतरांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. कामात दुसर्‍यांच्या भरवशावर अवलंबून राहू नका. कधीकधी स्वत: हिंमतीवर देखील काम केले पाहिजे. आजचा दिवस परदेशात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी घेऊन येईल. प्रेमसंबंधात मानसिक शांती मिळेल. कुटुंबात एखादी समस्या असेल तर ती संयमाने सोडवू शकाल. आज मालमत्ता खरेदी करण्याचा विचार केला असेल तर योग्य वेळ नाही. राजकारणात सेवा करत असाल तर जबाबदारी वाढेल.

वृश्चिक
नोकरी करणार्‍या जातकांसाठी आजचा दिवस चांगली बातमी घेऊन येईल. वडिलांच्या आशीर्वादाने भविष्य उज्ज्वल करण्याचा मार्ग मिळेल. नवीन मित्र मिळतील, ज्यांच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवीन स्त्रोत समजतील. काही आनंदाचे क्षण येतील. कुटुंबातील सर्व सदस्य पूर्ण पाठिंबा देतील. कार्यक्षेत्रात अधिकारी वर्ग पाठिंबा देईल, ज्यामुळे प्रोजेक्ट पूर्ण होतील.

धनु
आजचा दिवस उत्तम आहे. खुप दिवसानंतर आज एखादी चांगली माहिती मिळू शकते. एखादे महत्वाचे काम होण्यासाठी चांगल्या अधिकार्‍यांची भेट होईल. पुढील काळही उत्साहात जाईल. अडकलेले पैसे असतील तर ते आज मिळतील. कामाचा भार आणखी वाढेल. परंतु लक्ष्य साध्य झाल्यामुळे मन प्रसन्न होईल. जे काही प्रयत्न कराल त्यामध्ये जोडीदार सहकार्य करेल. कौटुंबिक स्थिती तुमचे बाजून येण्यास सुरूवात होईल.

मकर
आज अनेक अडचणीत गुंतलेले राहाल. एकीकडे, प्रिय व्यक्ती किंवा आप्तासाठी भेट वस्तू खरेदीची घाई असेल, तर दुसरीकडे कामाच्या ठिकाणी दबाव देखील जास्त असेल. भावंडांशी संबंध सुधारतील. संतती संबंधित समस्या दूर झाल्याने मनावरील ओझे हलके झाल्यासारखे वाटेल. राजकारणात क्षेत्रात आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. कोर्ट-कचेरीच्या प्रकरणातील निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. वडिलांचे सहकार्य प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करण्यास मदत करेल.

कुंभ
आजचा दिवस संमिश्र आहे. कार्यक्षेत्रात घेतलेले निर्णय आज योग्य सिद्ध होतील. कष्ट आणि ज्ञानाच्या बळावर सर्व समस्यांपासून मुक्त व्हाल. परंतु वडिलांशी असलेले संबंध थोडेसे तणावपूर्ण होऊ शकतात. कौटुंबिक जीवन देखील थोडे तणावपूर्ण असू शकते. खोट्या आरोपांचा सामना करावा लागू शकतो. प्रेमसंबंधात सहकार्य मिळेल, सुखप्राप्ती होईल. विद्यार्थ्यांसाठी मेहनत करण्याचा दिवस आहे.

मीन
आज आई-वडीलांचा आशीर्वाद मिळेल. ते चांगल्या जीवनासाठी मार्गदर्शन करतील, ज्यामुळे भविष्यात योग्य आणि अचूक निर्णय घेण्यास सक्षम व्हाल. जोडीदाराच्या नवीन व्यवसायात यश मिळेल. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लग्नाचे चांगले प्रस्ताव येतील. रोजगाराच्या क्षेत्रात महिलांच्या सहकार्याचा फायदा होईल. शासकीय योजनांमधूनही लाभ मिळेल. एखाद्या नवीन स्रोताकडून सुद्धा उत्पन्न मिळेल. संतती कार्यक्षेत्रात प्रगती करेल, हे पाहून मन आनंदित होईल.