28 मे राशी : गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल ? ‘यश’ मिळणार की हाती येणार ‘निराशा’, जाणून घ्या

मेष
आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी आहे. वैवाहिक जीवनात तणाव राहील. जोडीदार एखाद्या गोष्टीवरून रागावू शकतो. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमचे कुटुंब तुमच्यासोबत आनंदाने वेळ घालवेल. आईवर खूप प्रेम कराल. कुटुंबासोबत सुख आणि शांती मिळेल. कामात चांगले परिणाम मिळतील.

वृषभ
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मानसिक ताण वाढेल. कामात यश मिळेल. पण विलंबामुळे कभी खुशी, कभी गम, अशी स्थिती होईल. कुटुंबातील लहानांसोबत चांगले संबंध राहतील. त्यांच्याबरोबर वेळ घालवणे आवडेल. कामासाठी दिवस सामान्य आहे. प्रेमसंबंधात तणाव कमी होईल. विवाहितांचे जीवन चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी बोलल्याने मन हलके होईल.

मिथुन
आजचा दिवस उत्तम आहे. पैसा आल्याने आनंद वाढेल. कुटुंबासमवेत वेळ घालवल्याने चांगले वाटेल. वैवाहिक जीवन तणावमुक्त राहील, आनंद वाढेल. कामात यश मिळेल. मुलांकडून आनंद मिळेल. समाधानी व्हाल. उत्पन्नामध्ये वाढ होईल. शिक्षणात चांगले परिणाम मिळतील. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. मन फ्रेश राहील.

कर्क
आजचा दिवस खूप जबरदस्त आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहिल. जोडीदाराशी प्रेम आणि आकर्षण वाढेल. नवीन मालमत्ता खरेदी करण्यासाठी करार करू शकता. विरोधकांवर मात कराल. प्रेमसंबंधात यश मिळेल. कामात खुप मेहनत कराल. व्यवसायासाठी दिवस सामान्य आहे. आरोग्याची काळजी घ्या.

सिंह
आजचा दिवस फलदायी आहे. आरोग्य कमजोर राहिल. सर्दी होऊ शकते, काळजी घ्या. कामात अडचण येईल. मानसिक ताण वाढेल. उत्पन्न ठीक राहिल, त्यामुळे थोडा दिलासा मिळेल. विवाहितांसाठी दिवस सामान्य आहे. प्रेमसंबंधासाठी आज आनंदाचा दिवस आहे. विरोधकांच्या बाबतीत सतर्क रहा. मानसिक शांततेचा अभाव राहिल.

कन्या
आजचा दिवस उत्तम आहे. प्रयत्नांना यश लाभेल. मेहनतीचे फळ मिळेल. उत्पन्न वाढेल. कामात सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल. यामुळे कामात आनंद मिळेल. कामात चांगले परिणाम मिळतील. कुटुंबातील वडीलधार्‍यांचे प्रेम मिळेल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे, प्रिय व्यक्ती तुम्हाला आनंदी ठेवेल. विवाहितांसाठी दिवस आनंदाचा आणि प्रेमाचा आहे.

तुला
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. अनावश्यक कार्यात व्यस्त राहाल. दिवस कधी संपेल कळणारही नाही. थोडे अस्वस्थ व्हाल. मानसिक ताणतणाव वाढेल. कुटुंबातील सदस्यांकडून आनंद मिळेल. कौटुंबिक वातावरण समाधान देईल. मित्रांबरोबर बातचित होईल. वैवाहिक जीवन सामान्य राहिल. प्रेमसंबंधात स्वत: वर नियंत्रण ठेवा. चांगले वागा.

वृश्चिक
आजचा दिवस फलदायी आहे. खर्च जास्त होईल, परंतु आपण त्यांना घाबरणार नाही. इन्कम वाढेल. शरीरात सुस्तपणा किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. कुटुंबातील वडिलधार्‍यांचा आदर कराल. कामात चढ-उतार राहिल. कामात बदलीचे योग आहेत, यासाठी थोडे लक्ष द्या. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनात एकत्र बसून जोडीदाराशी बोलणे आवश्यक आहे.

धनु
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. वर्तणुकीवर आणि धार्मिक आचरणावर नियंत्रण ठेवा. काही प्रकारची गुंतवणुक हानिकारक ठरू शकते. कामात चढ-उतार राहिल. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस सामान्य आहे. आरोग्य बिघडू शकते. आजारी पडू शकता.

मकर
आजचा दिवस फलदायी आहे. व्यवसायात यश मिळेल. अधिक परिश्रम करण्याची गरज आहे. वैवाहिक जीवनात प्रेम आणि आपुलकी लाभेल. प्रेमसबंधात चांगले परिणाम मिळतील. प्रिय व्यक्तीशी मनातील गोष्टी बोलू शकता. यामुळे एकमेकांवरील विश्वास वाढेल. संबंध अधिक मजबूत होतील.

कुंभ
आजचा दिवस सामान्य फलदायी आहे. उत्पन्नात मोठी वाढ होईल. ज्यामुळे आनंद वाढेल. कार्यक्षमतेने आणि बुद्धिमत्तेद्वारे कामात यश मिळवाल. प्रेमसंबंधासाठी दिवस थोडा कमजोर आहे. वैवाहिक जीवनात चांगले परिणाम मिळतील. आजारी पडू शकता. आरोग्याची काळजी घ्या. खर्चात वाढ होईल.

मीन
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कामात स्वत: ला झोकून द्याल. कामात चांगले परिणाम मिळतील. कौटुंबिक वातावरण नवीन आनंद देईल. नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. प्रेमसबंधात आनंद मिळेल. प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळेल. वैवाहिक जीवनात थोडा तणाव राहिल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like